फळझाड लागवडीचे तंत्रज्ञान

जमीन : मध्यम काळी, सुमारे एक ते दीड मीटर खोल व त्याखाली कच्चा मुरूम असणारी, उत्तम निचऱ्याची जमीन निवडली. मोसंबीला संत्र्यापेक्षा काही प्रमाणात हलकी जमीन योग्य ठरते. जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्याच्यावर असू नये. लागवडीचा हंगाम : मुख्यत्वे पावसाळ्यात चौरस पध्दतीने, अंतर ६ x ६ मीटर (हेक्टरमध्ये २७७ झाडे), खड्‌डयाचा आकार १x१x१ मीटर.

जाती: संत्रा : नागपूर संत्रा, नागपूर सिडलेस, मुदखेड (कमी बियांचा), पिडीकेव्ही संत्रा-५

मोसंबी: कोटोल गोल्ड, न्यूसेलर

खूंट : रंगपूर किंवा जंबेरी खुंटावरील कलमे निवडावीत.

पाणी पुरवठा : दहा वर्षे व त्यावरील वयाच्या झाडांना दरवर्षी पाण्याच्या २८ ते ३० पाळ्या लागतात. दुहेरी आळे पध्दतीने पाणी द्यावे. पाणी टंचाईत दोन किंवा चार दांड पध्दत वापरावी. शक्य असेल तर ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. त्यामुळे ३०-४० टक्के पाण्याची बचत होते. ठिबक सिंचनाव्दारे पाणी देतांना दररोज बाष्पोपर्णात्संजनाच्या ८० टक्के पाणी द्यावे, त्यामुळे दर्जेदार उत्पादनात वाढ होवून ४० टक्के पर्यंत पाण्याची बचत होते. नागपूर संत्र्याकरीता (१० वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाचे) पाण्याची गरज प्रति दिवस (लिटर/पाणी/झाड) पुढील प्रमाणे दिलेली आहे.

महिनेपाणी (लिटर/दिवस/झाड)महिनेपाणी (लिटर/दिवस/झाड)
जानेवारी ५७ जुलै ६८
फेब्रुवारी ८० ऑगस्ट ५३
मार्च ११७ सप्टेंबर ६३
एप्रिल १६० ऑक्टोबर६४
मे १९८ नोव्हेंबर५८
जून १३५ डिसेंबर५१

ठिबक सिंचन पध्दतीव्दारे अन्नद्रव्यांचे व पाण्याचे व्यवस्थापनाकरीता १० वर्ष व अधिक वयाच्या संत्रा फळबागाकरीता बाष्पोपणर्णोत्सर्जनाच्या ९० टक्के पाणी व ८० टक्के खते, ९६०:३२०:३२० नत्र, स्फुरद व पालाश ग्रॅम झाड विद्राव्य खतातून द्यावे.

वळण व छाटणी: लहान वयाच्या झाडांना एक खोड पध्दतीने वाढवावे व त्यानुसार वळण द्यावे. मोठ्या झाडावरील सल दरवर्षी फळे उतरविल्यावर काढावी. पानसोट नेहमी काढावेत. सल काढल्यावर कापलेल्या भागावर बोर्डोमलम लावावा. आंतरपिके : सुरूवातीचे ३-४ वर्षे (फळधारणा होण्यापूर्वी)

आंतरपीक घ्यावे: पहिले वर्षी ठेंगणी, कमी कालावधीची भाजीपाला, हिरवळीची किंवा कडधान्याची पिके घ्यावीत. पुढे हिरवळीचे पीक घ्यावे. निंदण किंवा योग्य तणनाशक वापरून आळे स्वच्छ ठेवावेत. ज्वारी, कपाशीचे आंतरपीक घेऊ नये.

बहार धरणे : बहार धरण्यासाठी मृग/आंबिया फुलोरापूर्वी जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडाचे वय व ताकद पाहून ताण द्यावा. मृग बहाराकरिता मध्यम प्रकारच्या जमिनीत संत्र्याच्या झाडांना (२५ एप्रिल ते १५ जून) ५० दिवसाचा व आंबिया बहाराकरिता (१५ डिसेंबर ते १५ जानेवारी) ३० दिवसाचा ताण द्यावा.

आंबिया बहार : आंबिया बहारातील फळांची गळ ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात होते. ती कमी करण्यासाठी या काळात प्रत्येक महिन्यात एनएए १० पीपीएम (१० मिलीग्रॅम संजीवक प्रति लिटर पाणी) अधिक युरिया १टक्का (१० ग्रॅम युरिया प्रति लिटर पाणी) या तीव्रतेच्या संजीवकाचा फवारा द्यावा. फळधारणा होण्याच्या कालावधीत बागेची खोल मशागत करू नये.

खोडाला मलम लावणे : जून व ऑक्टोबरमध्ये झाडाला १ मीटर उंचीपर्यंत बोडोंमलम (१:१:१०) लावावा.

आंबिया बहार : फुलोरा : जाने, फेब्रु. व काढणी: नोव्हेंबर-डिसेंबर.

मृग बहार : फुलोरा : जून-जुलै व काढणी: फेब्रुवारी-मार्च, उन्हाळ्यातील फळगळ कमी करण्याकरिता बागेत आच्छादन करावे.
उत्पादन : ५ ते ८ वर्षे, संत्रा-१५० ते ४०० फळे, मोसंबी-१०० ते ३०० फळे प्रति झाड. ९ वर्षे व पुढे, संत्रा ८०० ते १००० फळे, मोसंबी ४०० ते ६०० फळे प्रति झाड.

आर्थिक आयुष्य : १८ ते २५ वर्षे.

दहा वर्ष व त्यावरील झाढाकरीता खालील प्रमाणे नियोजन करावे. संत्रा पिकाचे अधिक दर्जेदार उत्पादनाकरीता शिफारसीत मात्रा ५० किलो शेणखत ९०० ग्रॅम नत्र ३०० ग्रॅम

१. स्फुरद + ३०० ग्रॅम पालाश प्रति झाड यासह ५०० ग्रॅम व्हॅम + १०० ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जिवाणू १०० ग्रॅम अझोस्पीरीलम + १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति झाड देण्यात यावे. खते देतांना शेणखत नत्राची अर्धी मात्रा स्फुरद व पालाश ची पूर्ण मात्रा तसेच जीवाणू खते व संवर्धने (शेणखता सोबत मिसळून) बहारासाठी पाण्याचा ताण तोडतांना देण्यात यावी. नत्राची शिल्लक अर्धी मात्रा फळे वाटाण्या ऐवढी झाल्यावर देण्यात यावी.

जस्त सल्फेट ०.५ टक्के लोह सल्फेट ०.५ टक्के बोरॉन ०.१ टक्केच्या फवारण्या आंबिया फळाकरीता जुलै-ऑगस्ट आणि मृगाच्या फळाकरीता ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये द्याव्यात.

. संत्रा पिकाचे अधिक दर्जेदार उत्पादनाकरीता शिफारसीत मात्रा ५० किलो शेणखत ७.५ किलो निंबोळी डेप ८०० ग्रॅम नत्र + ३०० ग्रॅम स्फुरद ६०० ग्रॅम पालाश प्रति झाड यासह ५०० ग्रॅम व्हॅम १०० ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू + १०० ग्रॅम अॅझोस्पीरीलम १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति झाड देण्यात यावे. खते देतांना शेणखत निंबोळी ढेप नत्राची अर्धी मात्रा स्फुरद व पालाश ची पूर्ण मात्रा तसेच जीवाणू खते व संवर्धेने (शेणखता सोबत मिसळून) बहारासाठी पाण्याचा ताण तोडतांना देण्यात यावी. नत्राची शिल्लक अर्धी मात्रा फळे वाटाण्या ऐवढी झाल्यावर देण्यात यावी.

अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी गांडूळखत ६० किलो सहा वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या संत्रा फळ झाडाकरीता सेंद्रिय ट्रायकोडर्मा हरजीयानम ४० मि.ली. अँझेंडारेक्टीन १ टक्के डब्ल्यु. डब्ल्यु. ४ मि.ली. प्रति लिटर सुडोमोनस प्ल्युरोसन्स ४० मि.ली. प्रति झाड द्यावे.

संत्र्यांच्या जुन्या झाडांचे (१५ वर्षे वयापेक्षा जास्त) शास्त्रीय उपाययोजना करून पुनरुज्जीवन करता येते व अशा झाडांचे आयुष्य वाढून त्यापासून चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते. त्याकरिता खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.

१. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (पाऊस सुरू होण्यापूर्वी) झाडावरील सर्व वाळलेल्या व रोगट फांद्या काढून टाकाव्यात. मध्यम व मोठ्या वाळलेल्या फांद्या आरीने कापून काढाव्यात. हिरव्या फांद्या सुध्दा शेंड्यापासून ४५ सें.मी. लांबीच्या छाटाव्यात.

२. वरीलप्रमाणे छाटणी केल्यानंतर झाडावर कीटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी.

. झाडाच्या बुंध्याला व छाटलेल्या जागी बोर्डोमलम (१:१:१०) लावावा.

३ ४. छाटणीनंतर प्रत्येक झाडाला ५० किलो शेणखत ७.५ किलो निंबोळीची ढेप झाडाच्या परिघात मातीत मिसळून द्यावी.

५. ऑक्टोबर महिन्यात या झाडांना प्रत्येकी ५०० ग्रॅम नत्र ५०० ग्रॅम स्फुरद द्यावा.

६. पुढील वर्षापासून शिफारसीनुसार खताच्या मात्रा देऊन कीटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी.

७. संत्र्याच्या जुन्या झाडांचे पुनरूज्जीवनाकरीता झाडाची छाटणी एकदाच करावी. (दरवर्षी करू नये.)

८. संत्र्याच्या जुन्या (१५ वर्षाच्यावर वय असलेले) झाडाची छाटणी करावी. (नवीन झाडाची छाटणी करू नये.)

१. वाळत असलेल्या संत्रा झाडाच्या हिरव्या फांद्या ३० ते ४५ सें.मी. शेंड्यापासून काढून टाकाव्यात.

२. वाळलेल्या फांद्याचा हिरवा भाग २ ते ३ सें.मी. घेऊन छाटावा.

३. छाटणी केल्यानंतर लगेच १ लिटर पाण्यात १ ग्रॅम कार्बेन्डझिम टाकून फवारणी करावी.

४. संत्रा झाडाचा संपूर्ण वाफा खोदन मुळ्या उघड्या कराव्यात सडलेल्या मुळ्या काढून टाकाव्यात आणि वाफा ५ ते ७दिवस उघडा ठेवावा.

५. १ लिटर पाण्यात २ ग्रॅम मेटेलॅक्झीन टाकून त्याचे २० लिटर द्रावण वाफ्यात शिंपडावे (डेचिंग करावे) किया संत्र्यावरील डिक्या रोगाचे व्यवस्थापनासाठी झाडाचे बुंध्यावर बोर्डो मलम (१:१:१०) दोन वेळा पावसाळ्यापूर्वी (मे) व पावसाळ्यानंतर (ऑक्टोबर) लावून, रोग दिसताचक्षणी ट्रायकोडर्मा हरझियानम अधिक ट्रायकोडर्मा व्हीरीही अधिक सुडोमोनास फ्ल्युरोसन्स १०० ग्रॅम प्रत्येकी प्रति झाड १ किलो शेणखतात मिसळून झाडाचे परोधात जमिनीतून द्यावा व संपूर्ण झाडावर फॉसिटील ए.एल. (०.२ टक्के) फवारणी करावी.

प्रति झाडास ५० किलो शेणखत ७.५ किलो निंबोळी ढेप १ किलो अमोनियम सल्फेट + १ किलो ७. सिंगल सुपर फॉस्फेट १/२ किलो म्युरेट ऑफ पोटॅशचे मिश्रण टाकावे व खोदलेला वाफा मातीने चांगला झाकावा. १५ दिवसानी पुन्हा ०.६ टक्के बोडोंमिश्रणाचे (६:६:१००) २० लिटर द्रावण वाफ्यात शिंपडावे. या बोडों मिश्रणाची

६.झाडावर सुध्दा फवारणी करावी.

८. झाडाच्या बुंध्याला १ मीटर उंचीपर्यंत बोडोंमलम लावावा.

९ साल खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणाकरिता झाडावरील अळीने खाल्लेला भाग तरटाने साफ करून छिद्रात तार टाकून छिद्र मोकळे करावे व त्या छिद्रात पिचकारीच्या साह्याने मोनोक्रोटोफॉसचे द्रावण (१४ मि.ली. १० लिटर पाणी) सोडावे व छिद्र ओल्या मातीने बंद करावे.

निर्यातक्षम संत्रा उत्पादनाकरिता खालील नमूद केलेल्या बाबींचे व्यवस्थापन करणे जरूरी आहे.

१. फळधारणेपासून ते तोडणीपर्यंत किटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची योग्य वेळी व योग्य प्रमाणातच फवारणीकरावी.

२. जरुरीपेक्षा जास्त (१५०० ते २०००) फळे एका झाडावर घेऊ नये. विरळणी करून शेवटी ७०० ते १००० फ्ले घेाला यावी.

३. नत्र, स्फुरद, पालाश, शेणखत व निंबोळी ढेप इत्यादी योग्य वेळी, योग्य प्रमाणात द्यावे.

४. संत्रा बागेत कपाशी, गहू ज्वारी ही आंतरपिके घेऊ नयेत.

५. फळे तोडणीच्या १० ते १५ दिवस आधी पाणी देणे बंद करावे.

६. तोडणीपूर्वी कार्बेन्डाझिम ०.१% च्या (१० ग्रॅम + १० लिटर पाणी) दोन फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने कराव्यात.

योग्य जमिनीची निवड : पाण्याचा उत्तम निचरा होणारी, १ ते १.५ मीटर खोलीची, जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ क्षाराचे प्रमाण ०.१% पेक्षा कमी आणि उपलब्ध चुनखडीचे प्रमाण १०% पेक्षा जास्त नसावे.

ओलीत व्यवस्थापन: उन्हाळ्यात ८ ते १० व हिवाळ्यात १२ ते १५ दिवसाच्या अंतराने दुहेरी आळे पध्दतीने ओलीत करावे. ठिबक सिंचन पध्दतीने ओलीत केल्यास ३० ते ४० टक्के पाण्याची बचत होऊन फळांची प्रत सुधारते तसेच झाडावर सल कमी येते. ठिबक सिंचनाव्दारे खते देणे अधिक परिणामकारक आढळून आले आहे.

उन्हाळ्यात जमिनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता आणि तापमान संतुलित राहण्याकरिता ५ सें. मी जाडीचा गवताचा थर देऊन वाफा आच्छादित करावा. त्यामुळे फळांची गळ थांबून रसाचे प्रमाण वाढते.

विरळणी: उत्तम प्रतिची फळे मिळण्याकरिता प्रतिझाडास ७०० ते ९०० फळे ठेवावीत. फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर विरळणी करावी. ही विरळणी इथेपॉन ६०० पी.पी.एम. संजिवकाची (६०० मिलीग्रॅम प्रति लिटर पाण्यात) फवारणी करावी किंवा हाताने फळे तोडून टाकावी.

कारणी: फळधारणेपासून फळे तयार होण्यास २०० ते २४० दिवस लागतात. आंबिया बहाराची फळे ऑक्टोबर -नोव्हेंबर मध्ये तर मृग बहाराची फळे मार्च-एप्रिल मध्ये तयार होतात. फळांचा हिरवा रंग जाऊन पिवळसर नारंगी रंग येतो. मालीवर चकाकी येऊन तेलग्रंथी स्पष्ट दिसू लागतात. तोडणीपूर्वी कार्बेन्डाझिम ०.१% चे (१० ग्रॅम १० लिटर पाणी) दोन फवारे १५ दिवसाच्या अंतराने देण्यात यावे. त्यामुळे फळे साठवणूकीत टिकतात.

भरपावसात किंवा उन्हात तोडणी करून फळे बागेतच ठेवू नयेत. फळ तोडणीच्या पिशवीतून फळे सरळ प्लॅस्टिकच्या क्रेटस्मध्ये भरावीत व सावलीत ठेवावी. फळे काढतांना फळाच्या सालीला इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

१) संत्र्याचा रंग कमीत कमी अर्ध्या भागावर पिवळसर नारिंगी असावा.

२) फळे बट्टीदार, गोल परंतु तोटी असलेली नसावीत.

३) फळांवर कोणत्याही किडीचे तसेच रोगाचे डाग, चट्टे नसावे.

४) फळांमध्ये कमीत कमी बिया असाव्यात.

५) फळांमध्ये ४०-५० टक्के रस असावा, शर्करा व आम्लाचे प्रमाण १३ ते १५ टक्के असावे.

६) फळांचा व्यास कमीत कमी ६.५ सें.मी. असावा.

७) पोला झालेली संत्रा फळे अयोग्य असतात.

८) फळांचा स्पर्श मऊ असावा व साल खरखरीत असू नये .

जर तुम्हाला नागपूर संत्रा आणि मोसंबी लागवडीसाठी जमीनचे माती परीक्षण करणे आवश्यक आहे येथे क्लिक करा

नागपूर संत्रा आणि मोसंबी लागवडीसाठी सर्वोत्तम जमीन कोणती आहे?

मध्यम काळी, 1 ते 1.5 मीटर खोल, उत्तम निचऱ्याची व मुक्त चुनखडीचे प्रमाण 10% पेक्षा कमी असलेली जमीन संत्रा आणि मोसंबीसाठी उपयुक्त आहे.

संत्रा व मोसंबीची लागवड कोणत्या हंगामात करावी?

मुख्यतः पावसाळ्यात, चौरस पद्धतीने 6×6 मीटर अंतरावर लागवड करावी.

कोणत्या जाती संत्रा आणि मोसंबीसाठी शिफारसीय आहेत?

संत्रा: नागपूर संत्रा, नागपूर सिडलेस, मुदखेड, पीडीकेव्ही संत्रा-5
मोसंबी: कोटोल गोल्ड, न्यूसेलर

पाण्याचा वापर आणि ठिबक सिंचनाची भूमिका काय आहे?

ठिबक सिंचन वापरल्यास 30-40% पाण्याची बचत होते. दरवर्षी 28-30 पाळ्या आवश्यक असतात.

संत्र्याला कोणत्या महिन्यात किती पाणी लागते?

उदा. मे महिन्यात 198 लिटर/झाड/दिवस, एप्रिलमध्ये 160 लिटर/झाड/दिवस. (संपूर्ण तपशीलासाठी पाण्याचा तक्ता पहावा.)

झाडांना वळण व छाटणी कधी आणि कशी करावी?

फळे उतरवल्यावर वाळलेल्या व रोगट फांद्या काढून टाका व बोर्डोमलम लावावे.

सुरुवातीच्या काळात कोणती आंतरपीक घेऊ नयेत?

ज्वारी आणि कपाशी टाळावीत. त्याऐवजी भाजीपाला, हिरवळीची व कडधान्ये घ्यावीत.

बहार धरण्यासाठी ताण कोणत्या काळात द्यावा?

मृग बहार: 25 एप्रिल ते 15 जून (50 दिवस ताण)
आंबिया बहार: 15 डिसेंबर ते 15 जानेवारी (30 दिवस ताण)

उत्पादन किती अपेक्षित आहे?

5-8 वर्षे वय: संत्रा – 150-400 फळे, मोसंबी – 100-300 फळे
9 वर्षांनंतर: संत्रा – 800-1000 फळे, मोसंबी – 400-600 फळे

संत्र्याच्या जुन्या झाडांचे पुनरुज्जीवन कसे करता येते?

शास्त्रीय छाटणी, योग्य खत व्यवस्थापन आणि कीटकनाशक फवारणी करून 15 वर्षांहून अधिक वयाची झाडे पुन्हा उत्पादनक्षम करता येतात.

Leave a Comment