Site icon krishimaha.com

🌾 ज्वारी लागवड तंत्र (Sorghum Farming in Marathi) | खरीप व रबी ज्वारी उत्पादन मार्गदर्शन

ज्वारी हे महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील अत्यंत महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. ज्वारीची लागवड मुख्यतः धान्य आणि कडब्यासाठी केली जाते. योग्य ज्वारी लागवड तंत्र (Sorghum Cultivation Techniques) वापरल्यास उत्पादनात मोठी वाढ करता येते.

या लेखामध्ये आपण खरीप ज्वारी लागवड तंत्र, रबी ज्वारी लागवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Table of Contents

ज्वारी

ज्वारी हे विदर्भातील अन्नधान्याचे प्रमुख पीक असून त्याची लागवड मुख्यतः धान्य व कडब्यासाठी केल्ली। शिफारशित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ज्वारीचे उत्पादन वाढू शकते.

खरीप ज्वारीचे लागवड तंत्र.

जमीन व पूर्वमशागत: खरीप ज्वारी ही मुख्यत्वे करून कोरडवाहू पीक म्हणून घेतल्या जाते. त्यासाठी मध्यम ते खो भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. उन्हाळ्यात वखराच्या ३ ते ४ खोल पाळ्या देऊन जमिन चांगली पूर्वमशागत करावी. भरखते। खरीप ज्वारीला हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे व नंतर वखराची देऊन जमिनीत चांगले मिसळावे.

रासायनिक खते : खरीप ज्वारी रासायनिक खताला उत्तम प्रतिसाद देते. त्यामुळे ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. यापैकी ४० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश (२०० किलो सुफला २०:२०:००६७ कि म्युरेट ऑफ पोटॅश अथवा ८७ किलो युरिया २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) पेरणीसोब द्यावा व उरलेल्या ४० किलो नत्राची मात्रा (८७ किलो युरिया) ज्वारीचे पीक २५ ते ३० दिवसाचे असतांना द्यावी. वरख देताना जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून घ्यावी. जमिनीत उपलब्ध पालाशचे प्रमाण जास्त असेल पालाशची मात्रा देणे टाळावे.पेरणीची वेळ खरीप ज्वारीची पेरणी साधारणतः २५ जून ते १० जुलै या दरम्यान करावी. पेरणीस उशीर झाला मुरमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे झाडाची योग्य ती संख्या मिळत नाही.

बियाण्याचे प्रमाण : खरीप ज्वारीसाठी हेक्टरी ७.५ ते १० किलो बियाणे पुरेसे आहे. पेरणीसाठी दोन चाड्याच् तिफणीचा उपयोग करावा, जेणे करून पेरणीसोबतच खते देणे सोईचे होईल.

पीविरळणी: पेरणीपासून १२ ते १५ दिवसानी विरळणी करावी. त्यासाठी दोन झाडातील अंतर १० ते १२ सें.मी. इतके

ठेवावे व हेक्टरी झाडांची संख्या १.८० लाखापर्यंत ठेवावी.

ओलीत व्यवस्थापन : खरीप ज्वारी हे कोडवाहू पीक असल्यामुळे ओलिताची गरज भासत नाही. परंतु पावसाचा खंड पडून पिकाला ताण बसल्यास व ओलिताची सोय उपलब्ध असल्यास एखादे संरक्षक ओलीत द्यावे.

3) आंतरमशागत : खरीप ज्वारीच्या उत्पादन वाढीस आंतरमशागतीचे फार महत्त्व आहे. ज्वारीचे पीक ४० दिवसाचे होईपर्यंत.

२-३ कोळपण्या व खुरपण्या कराव्यात. तणांचा जास्त प्रादुर्भाव असल्यास आवश्यकतेनुसार निंदण करावे.

कापणी व मळणी: खरीप ज्वारी परीपक्व झाल्यावर ताबडतोब कापणी व मळणी करावी जेणे करून ज्वारी उशिरा येणाऱ्या पावसामुळे खराब होणार नाही. ज्वारी साठवणुकीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्के पेक्षा जास्त असू नये.

पीकेव्ही अश्विनी – (वाणी ११/६): हा वाण प्रचलित मलकापूर वाणीपेक्षा १० ते १२ दिवसांनी लवकर येणारा असून ८२ ते ८४ दिवसात याचा हुरडा तयार होतो. या वाणाचे हुरड्याचे उत्पन्न ४२ ते ४३ क्विंटल प्रति हेक्टर एवढे असून या वाणाच्या हुरड्यामध्ये शर्करेचे प्रमाण मलकापूर वाणीपेक्षा जास्त असल्यामुळे या वाणाचा हुरडा अधिक गोड व चवदार आहे सदर वाणाचा हुरडा मळणीस सुलभ असून लवकर येत असल्यामुळे मीज माशीस तो बळी पडत नाही.

पीडीकेव्ही हुरडा कार्तीकी – (वाणी १०३): हा वाण प्रचलित मलकापूर वाणी पेक्षा १० ते ११ दिवसांनी लवकर येणारा असून ८३ ते ८५ दिवसात याचा हुरडा तयार होतो. या वाणाचे हुरड्याचे उत्पन्न ४३ ते ४५ क्विंटल प्रति हेक्टर एवढे असून या वाणाच्या हुरड्यामध्ये शर्करेचे प्रमाण मलकापूर वाणी पेक्षा जास्त असल्यामुळे या वाणाचा हुरडा अधिक गोड व चवदार.

आहे. सदर वाणाचा हुरडा मळणीस सुलभ असून लवकर येत असल्यामुळे मीज माशीच तो बळी पडत नाही. गोड ज्वारीचा वाण : एकेएसएसव्ही-२२ : हा खरीपातील गोड ज्वारीचा वाण सध्याच्या इतर प्रचलित गोड वाणाच्या तुलनेत ८ ते १० दिवसांनी लवकर महणजे ११५ ते १२० दिवसात तयार होतो. धान्याचे हेक्टरी उत्पादन १३ ते १४ क्विटला असून धांड्यापासून रसाचे हेक्टरी उत्पत्र ११ ते १२ हजार लिटर एवढे मिळू शकते. सदर वाणापासून मिळणाऱ्या हिरव्या.धांडयाचे उत्पत्र ४०० ते ४१० क्विटल प्रति हेक्टर इतके आहे. रसातील एकूण शर्करेचे प्रमाण ११.५ ते १२ टक्के असून थोडयाच्या रसापासून १४५० ते १५०० लि./हे. व दाण्यापासून १८५० ते १८७० लि./हे. अल्कोहोल मिळू शकते. तसेच खोडकिडीला हा वाण बऱ्याच अंशी प्रतिकारक्षम असा आहे.

वैरण ज्वारी वाण सुधारित रामकेळ सुधारित रामकेळ हा वैरण वारीचा वाण एकेरी कापणीस योग्य असून खरीप व उन्हाळी हंगामात पेरणीस उपयुक्त आहे. या वाणाचे हिरव्या वैरणाचे उत्पादन ४००५०० किंटल प्रती हेक्टर आहे. बियाणे विजोत्पादन घेतल्यास धान्याचे उत्पादन हेक्टरी २५-२८ किंटल व कडव्याचे उत्पादन १५०-१६० किंटल मिळते.

नविन प्रसारीत वाण। एम.पी.एस. १६३५ एस.पी.एच. १६३५ हा वाण एकेएमएस ३० ए मादी वाण व एकेआर-४५६ या नर वाणाच्या संकरातून निर्माण करण्यात आला आहे. हा वाण खरीप हंगामात ११०-११५ दिवसात परिपक्व होतो अधिक धान्य व अधिक कडवा असे दुहेरी उदिष्ट साध्य करणारा हा वाण आहे. या संकरीत वाणापासून ४८ ते ५० क्विंटल धान्याचे व १२० ते १२५ क्विंटल कडब्याचे उत्पादन मिळते. या वाणाची वैरणीची व धान्याची प्रत उत्तम आहे.

पीडीकेव्ही कल्याणी हा खरीप सरळ वाण महाराष्ट्रासाठी २०१६ मध्ये प्रसारीत करण्यात आला. हा वाण ११५-१२० दिवसात परिपक्व होतो. या वाणाच्या धान्याची प्रत चांगली असून कडब्याचे ही उत्पादन अधिक देणारा वाण आहे. या वाणापासून ३५ ते ४० क्विंटल/हेक्टर धान्याचे व १४० ते १४५ क्विंटल/हेक्टर उत्पादन मिळते. हा वाण मुख्य किटी व रोगांना सहनशील आहे.

नविन प्रसारीत वाण सी.एस. व्ही. ३४ राष्ट्रीय स्तरावरील खरीप सरळ वाण २०१७ मध्ये प्रसारीत करण्यात आला असून हा वाण ११० ते ११२ दिवसात परिपक्व होतो. या वाणाच्या धान्याची प्रत चांगली असून कडवा उत्पादन सुध्दा अधिक मिळते. या सरळ वाणापासून ३८ ते ४० क्विंटल/हे. धान्याचे व १३५ ते १३८ क्विंटल/हे. कडब्याचे उत्पादन मिळते. तसेच मुख्य किडी व रोगांना बऱ्याच अंशी प्रतिकारक्षम असा आहे.रबी ज्वारीचे लागवड तंत्र विदर्भात रबी ज्वारीची लागवड कोरडवाहू व ओलिताखाली केली जाते.

जमीन व पूर्वमशागत रबी ज्वारीच्या पेरणीकरिता मध्यम ते खोल / भारी व जास्त जलधारणा असलेली, पाण्याचा बांगला

रासायनिक खते :

कोरडवाहू रवी ज्वारीकरिता ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद व २५ किलो पालाश (११० किलो युरिया

१५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट ४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) हेक्टरी या खत मात्रेची शिफारस केलेली आहे. कोरडवाहू रबी ज्वारीला खताची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळीच द्यावी. परंतु जर रबी ज्वारी ओलिताखाली घ्यावयाची असेल तर ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश (२०० किलो सुफला २०:२०:०० ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश अथवा ८७ किलो युरिया २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) हेक्टरी द्यावे. यापैकी ४० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीसोबतच द्यावे व उरलेली ४० किलो नत्राची मात्रा (८७ किलो युरिया) पोक २५ ते ३० दिवसाचे असतांना द्यावी. वरखत देताना जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून घ्यावी. मृद चांचणीत आवश्यकता भासल्यास पालाशची मात्रा द्यावी.निचरा होणारी जमीन निवडावी. खरीपातील उडीद किंवा मूग काढल्यावर वखराच्या ३ ते ४ खोल पाळ्या देऊन जमिनीची चांगली पूर्वमशागत करावी.

भरखते रबी ज्वारीला हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे व नंतर वखराची पाळी

देऊन जमिनीत चांगले मिसळावे.

पेरणीची वेळ : रबी ज्वारीची पेरणी साधारणतः २५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या दरम्यान संपवावी. पेरणीस उशीर झाला तर मुरमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते व त्यामुळे झाडांची योग्य ती संख्या मिळत नाही.

वियाण्याचे प्रमाण व पेरणीची पध्दत खरीप ज्वारीसाठी प्रति हेक्टरी ७.५ ते १० किलो बियाणे पुरेसे आहे. पेरणी ४५ सें.मी. (१.५ फूट) च्या तिफणीने करावी. पेरणीसाठी दोन चाड्याच्या तिफणीचा उपयोग करावा, जेणे करून पेरणीसोबतच खते देणे सोईचे होईल.विरळणी पेरणीपासून १५ ते २० दिवसानी विरळणी करावी. त्यासाठी दोन झाडातील अंतर १५ ते २० से.मी. इतके ठेवावे व हेक्टरी झाडांची संख्या १.५० लाखापर्यंत ठेवावी. विरळणी करताना खोडमाशीग्रस्त रोपे काढून टाकावीत.ओलीत व्यवस्थापन: रबी ज्वारीला ओलिताची अत्यंत आवश्यकता असते, कारण रच्ची हंगामात पावसाचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाच्या खालील अवस्थेत पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

(पेरणीनंतर)

३५ ते ४० दिवस

पीक पोटरीत येण्याचा काळ

(पेरणीनंतर)

६० ते ६५ दिवस

पीक फुलोऱ्यात येण्याचा काळ

(पेरणीनंतर)

७० ते ७५ दिवस

दाणे भरण्याचा काळ

(पेरणीनंतर)

८५ ते ९५ दिवस

आंतरमशागत : वेळोवेळी आंतरमशागत करून पीक ४० ४५ दिवसाचे होईपर्यंत २-३ कोळपण्या द्याव्यात व १-२ वेळा खुरपणी करावी.

कापणी व मळणी: रबी ज्वारीचे पीक परीपक्व झाल्यावर ताबडतोब कापणी व मळणी करावी, जेणे करून ज्वारी खराब होणार नाही. ज्वारी साठवणुकीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्याच्या वर असू नये.पीक संरक्षण :

१) खोडमाशी खोड माशी लहान आणि करड्या रंगाची असते. अळीचा रंग पांढरा असतो. अधुन-मधून पाऊस पडत असल्यास या किडीचा प्रादु‌र्भाव झपाट्याने वाढतो. या किडीची अळी पोंग्यात प्रवेश करून रोपाच्या वाढीच्या खालचा पाग खाऊन नष्ट करते.

व्यवस्थापन: ज्वारीची वेळेवर पेरणी करावी (२५ जून ते ७ जुलै) पेरणी करावी. पिकाची उगवण झाल्यानंतर १० ते १२ दिवसांनी खोडमाशीचा प्रादुर्भाव झालेली रोपे काढून नष्ट करून विरळणी करावी. पेरणीच्या वेळी काब्र्क्युफ्युरॉन ३ टक्के दाणेदार, ३३ कि. प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे. खोडमाशीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रीड ४८ टक्के १२ मि.ली. प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया आणि त्यानंतर १५ दिवसांनी क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२) खोडकिडा : खोडकिड्याचे पतंग मध्यम आकाराचे असतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे कोवळ्या पानावर आडव्या रेषेत लहान छिद्रे पडलेली आढळून येतात. वाढणाऱ्या शेंड्याला अळीने इजा केल्यामुळे ‘पोंगेमर’ होतो. किडीचा प्रादुर्भाव साधारणतः पीक एक महिन्याचे झाल्यापासून कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेपर्यंत होऊ शकतो. अळी झाडात शिरल्यानंतर आती गाभा खाते, त्यामुळे ताटे आणि कणीस वाळतात.

व्यवस्थापन: ज्वारीच्या पानावरील अंडीपुंज पानासहीत तोडून त्यांचा नायनाट करावा. पिकाची फेरपालट करावी. किडग्रस्त झाडे काढून त्यांचा अळीसह नायनाट करावा. ज्वारीवरील खोडकिडीचे जैविक पध्दतीने व्यवस्थापन करण्याकरीता ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी किटकांची अंडी १.५ लाख प्रति हेक्टरी पीक उगवणीनंतर ३० आणि ४० व्या दिवशी सोडावीत. प्रादुर्भाव दिसताच कार्बुफ्युरॉन ३ टक्के दाणेदार ८.३ किलो प्रति हेक्टरी पोंग्यामध्ये द्यावे.

३) मावा : ज्वारीवरील विविध प्रकारच्या माव्यांचा प्रादुर्भाव होतो. मावा रंगाने निळसर किंवा पिवळसर किंवा हिरवा असतो. निळसर रंगाच्या माव्याचे पाय काळे असतात. पिवळसर रंगाचा मावा जुन्या पानाच्या खालच्या बाजूवर आढळून येतो. हिरवा मावा पिकाच्या सुरूवातीच्या काळात पोंग्यात दिसून येतो. मावा पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडून कालांतराने वाळतात.

४) तुडतुडे : तुडतुडे अनेक पिकांवर आढळून येतात. या किडींचा प्रादुर्भाव सुध्दा पीक वाढीच्या अवस्थेत असतांना दिसून येतो. या किडीचे प्रौढ व पिल्लं झाडाचे पोंग्यात तसेच पानावर आढळून येतात आणि समूहाने अत्ररस शोषण करतात. तसेच तुडतुडे आपल्या शरिरातून चिकट द्रव्य बाहेर टाकतात, नंतर त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे झाडांची वाढ खुंटते व उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

मावा आणि तुडतुडे व्यवस्थापन ज्वारी पिकाची शिफारसीत अंतरावर पेरणी करावी. रासायनिक खतांच्या मात्रा

शिफारसीप्रमाणे द्याव्यात. अधिक नत्र देण्याचे टाळावे.

५) मिजमाशी ही माशी अतिश लहान असून तिचा पोटाचा भाग नारंगी आणि पंख पारदर्शक असतात. अळ्या बिजांडकोषावर उपजिविका करतात तयमुळे कंसातील दाणे भरत नाहीत.

व्यवस्थापन: मिजमाशीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के प्रवाही २० मि.ली. किंवा फोझेलॉन ३५ टक्के प्रवाही १५ मि.ली. ची प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात मिसळून फवारणी करावी.

६) लष्करी अळी या किडीचे पतंग करड्या रंगाचे तर अळ्या काळ्या चॉकलेटी रंगाच्या असतात. मादी पानाच्या देठाजवळ अगर जमिनीत समूहाने अंडी घालते. भरपूर पावसानंतर किंवा पावसाच्या ताणानंतर या किडीची वाढ झपाट्याने होते. अळ्या अधाश्यासारख्या ज्वारीची पाने खाऊन फक्त मध्यशीराच शिल्लक ठेवतात.

व्यवस्थापन: शेताच्या सभोवतालचे बांध स्वच्छ ठेवावीत. जमिनीला भेगा पडल्या असल्यास ओलित करावे.

ज्वारीवरील रोग नियंत्रण

१) पानावरील करपा । हा रोग दोन प्रकारच्या बुरशीमुळे होतो. हेलमिंथोस्पोरीयम या बुरशीच्या प्रादु‌र्भावामुळे पानावर

आकाराने लंबगोल आणि रंगाने पिवळसर किंवा राखी रंगाचे ठिपके दिसून येतात. हवेत आर्द्रता जास्त असल्यास असे ठिपके एकत्र मिसळून पानांवर मोठे-मोठे चट्टे पडतात. काही वेळेला संपूर्ण पान करपल्यासारखे दिसते. कोलोटोट्रिकम या बुरशीमुळे गोल राखी रंगाचे ठिपके पानावर आढळून येतात. परंतु अशा ठिपक्यांच्या मध्यभागी काळ्या रंगाचा ठिपका आहळतो. असे अनेक ठिपके एकत्र येऊन पाने करपतात. या रोगाचा प्रसार हवेतून होतो.

व्यवस्थापन : रोगाची लक्षणे दिसून येताच झायनेब ७५ डब्ल्यु.पी. किंवा मॅन्कोझेब ७५ डब्ल्यु.पी. १२५० ग्रॅम ७५० लिटर पाणी या प्रमाणात प्रति हेक्टरी फवारावे. आवश्यकता असल्यास २-२ आठवड्याच्या अंतराने दुसरी आणि तिसरी फवारणी करावी.

२) दाण्यावरील बुरशी: ज्वारीचे दाणे पक्व होतांना पीक पावसामध्ये सापडल्यास कणसातील दाण्यावर (बियाण्यावर) विविध बुरशींचा प्रादुर्भाव होऊन ते काळे नारंगी होतात व त्याची उगवणक्षमता कमी होते. दाणे वजनाने हलके होतात असे दाणे खाण्यास अयोग्य असतात व ज्वारीस बाजारभाव कमी मिळतो. रोगाचा प्रसार हवेव्दारे होतो.

व्यवस्थापन : दाण्यावरील बुरशीच्या नियंत्रणाकरिता पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी.

(१) थायरम ७५ डब्ल्यु. एस. ३ ग्रॅम (२) रोगप्रतिबंधक वाणांचा वापर करावा (३) ज्वारीची कापणी शारीरिक परिपक्वतेच्या अवस्थेत करावी. त्यामुळे ८-१० दिवस आधी कापणी शक्य होऊन त्यानंतर येणाऱ्या पावसापासून होणारे ज्वारीचे नुकसान टाळता येईल.

८) खडखड्या: रोगट झाडाचे खोड पोकळ होते आणि आत बुरशीच्या कोळशासारख्या काळ्या बारीक कणांनी वेष्टिलेले लांब धागे आढळतात. झाड हलल्यास खडखड असा आवाज येतो. वाऱ्याने अथवा धक्क्याने झाड आडवे पडते. यामुळे रोगट झाडावरील कणसात दाणे अर्धवट भरतात व उत्पन्नात घट येते. उत्तरार्धात कणसे बाहेर पडल्यावर पाण्याचा ताण पडल्यास या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. रोगकारक बुरशीचा प्रसार जमिनीद्वारे व बियाण्याव्दारे होतो.

व्यवस्थापन : खडखड्या रोगाच्या नियंत्रणासाठी (१) पिकाची फेरपालट करावी. (२) जमिनीत पालाश कमी असल्यास त्याची योग्य मात्रा खताव्दारे द्यावी. (३) पेरणी शिफारस केल्याप्रमाणे योग्य वेळीच करावी. (४) आंतरपीक अथवा मिश्रपीक घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी होते. (५) फुलोरा अवस्थेपासून पाऊस न आल्यास ओलीत करणे फायद्याचे ठरते.

धान (भात)

धान पीक प्रामुख्याने खरीप हंगामात आणि पाण्याची हमखास सोय असेल तर उन्हाळी हंगामात घेता येते. हंगाम: उच्च तापमान आणि आर्द्रता या पिकास पोषक असते. पुरेसा पाऊस व सिंचन सोय उपलब्ध असल्यास हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते.

पूर्वमशागत व भरखते : हंगाम अखेर कापणी झाल्यावर जमीन नांगरून शेतातील सर्व धसकटे, गवत, झुडुपे कापून जाळून टाकावीत. पूर्व मशागतीनंतर हेक्टरी २५ ते ३० गाड्या (१० टन) चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत घालावे. पावसाळा सुरू झाल्यावर शेतात पाणी साचले असताना उभी व आडवी नांगरणी करावी. धैंचा / बोरू सारखे हिरवळीचे पीक घेऊन चिखलणीच्या वेळी जमिनीत गाडावे. गिरीपुष्पाची पाने जमिनीत गाडावीत.

पेरणी जमीन नांगरून, ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी आणि १०० सें.मी. रुंद व १० सें.मी. उंच असे योग्य लांबीचे गादीवाफे तयार करावे. या गादीवाफ्यावर दर आर क्षेत्राला ३०० किलो चांगले कुजलेले शेणखत, १ किलो युरिया अधिक ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट जमिनीत टाकून मिसळावे. पेरणीसाठी बारीक जातीकरिता ३५ ते ४० किलो आणि मध्यम व ठोकळ जातीकरिता ५० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे. सह्याद्री या संकरित वाणाचे हेक्टरी २० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी बीज प्रक्रियेसाठी १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ (३ टक्के) या प्रमाणात द्रावण करून त्यात बी ओतावे द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके रोगयुक्त बी चाळणीने काढून जाळून टाकावे. तळातील निरोगी बी २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत २४ तास वाळवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम (३ ग्रॅम/किलो) बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी.

चिखलणी पूर्वमशागत केलेल्या धानाच्या शेतात लाकडी नांगर, पॉवर टिलर अथवा ट्रॅक्टरने चिखलणी करावी चिखलणीनंतर शेत समपातळीत येण्यासाठी पाटी (फळी) फिरवावी. चिखलणी करतांना स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खताची शिफारस केलेली पूर्ण मात्रा (५० कि. स्फुरद ५० कि. पालाश प्रति हे.) व नत्रयुक्त खताची निम्मी मात्रा (५० कि. नत्र प्रति हे.) शेतात मिसळावी. शेतात पाणी बांधून ठेवावे.

रोवणी रोपांचे वय २१ ते २५ दिवसांचे झाल्यावर रोवणी करावी. त्यासाठी रोपे काढण्याच्या दोन दिवस आधी वाफ्यातील पाण्याची पातळी थोडी वाढवावी. त्यामुळे मुळे न तुटता रोप काढण्यास मदत होते. रोपांची लावणी २० सें.मी. x १५ सें. मी. अंतरावर प्रत्येक चुडात २ ते ३ रोपे सरळ व उथळ म्हणजेच २ ते ४ सें.मी. खोलवर लावावीत. सह्याद्री या संकरित धानाची रोवणी २० x २० सें.मी. अंतरावर करावी व प्रत्येक चुडात एक रोप लावावे.

रासायनिक खते जमिनीची तपासणी करून योग्य प्रमाणात रासायनिक खताचा वापर केल्यास शेती किफायतशीर होते. सर्वसाधारणपणे १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि नत्राची अर्धी मात्रा चिखलणीच्या वेळेस तर उरलेली नत्राची अर्धी मात्रा दोन समान हप्त्यात (फुटवे फुटण्याच्या वेळी आणि लॉबी येण्याच्या सुरूवातीस) विभागून द्यावी. कोरडवाहू घानाकरिता ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. सह्याद्री या संकरित वाणास रासायनिक खताची शिफारसीत मात्रा २५ टक्क्यांने वाढवून द्यावी.

पाणी व्यवस्थापन: धान लावणीनंतर रोपांची मुळे चांगली रूजेपर्यंत बांधीत पाण्याची पातळी २.५ सें.मी. (एक इंच) ठेवावी. यानंतर दाणा पक्व होईपर्यंत ही पातळी साधारणतः ५ सें.मी. (दोन इंच) पर्यंत वाढवावी. अधूनमधून पाण्याचा निचरा करावा. पीक निसवण्यापूर्वी १० दिवस व पीक निसवल्यानंतर १० दिवस पाण्याची पातळी १० सें.मी. (चार इंच) ठेवावी., त्यानंतर हळूहळू पाण्याची पातळी कमी करावी व कापणीपूर्वी १० दिवस अगोदर बांधीतील पाणी पूर्णपणे काढून टाकावे. पीक फुलोरा अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये.

आंतरमशागत: आंतरमशागतीची कामे पीक निसवण्यापूर्वी एक महिन्याअगोदर संपवावी. तणांच्या नियंत्रणासाठी धान रोवणीनंतर ५-६ दिवसांनी ४ लिटर बुटाक्लोर ५०० लिटर पाणी प्रति हेक्टरी या प्रमाणात वापरावे किंवा लावणीनंतर सुमारे १५ दिवसांनी कोळपणी व निंदणी करून त्यानंतर २-३ आठवड्यांनी पुन्हा एक कोळपणी व निंदणी करून पोक तणविरहीत ठेवावे

पेरीव धान पध्दत पूर्व विदर्भ विभागामध्ये हात रोवणीस पर्याय म्हणून पेरीव पध्दतीने घान लागवड जुलै महिन्याच्या १० तारखे पर्यंत करावी. त्याकरीता हेक्टरी १०० किलो बियाणे दोन ओळीत २० सें.मी. व दोन झाडातील १०-१५ सें.मी. अंतर ठेवून लागवड करावी. तसेच यामध्ये तण नियंत्रणासाठी पेन्डीमेथैलीन ३० टक्के प्रवाही १ लिटर प्रति हेक्टर क्रियाशील घटक याप्रमाणात पेरणीनंतर लगेचच फवारणी करून ३० दिवसांनी निंदण करावे.

पूर्व विदर्भात पेरीव धानाचे अधिक उत्पादन व आर्थिक मिळकती करीता जाड धानाचे ७५ किलो व बारीक धानाचे ५० किलो बियाणे प्रति हेक्टर व १२५:६२.५:६२.५ किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टर द्यावे.

धान पिकाचे सुधारित मशागत तंत्रज्ञान :

(अ) विद्यापीठ निर्मित सुधारित ‘श्री’ पध्दत (पीकेव्ही ‘श्री’)

‘श्री’ भात लागवडीचे सहा महत्वाचे मुझे ।

१) धान बांधीत जास्तीत जास्त सेंद्रिय खते व पिकांच्या अवशेषांचा वापर करावा.

२) ८ ते १५ दिवसांची रोपे लागवड करण्यात यावी.

३) भात रोपे तंतुमुळे न तुटता मातीसहीत, उथळ व सरळ लागवड करावी. त्यामुळे रोपे जमिनीत लवकर रुजतात, वाढ

चांगली होते आणि फुटल्याचे प्रमाण वाढते.

४) लवकर येणाऱ्या धान जातींची २०x२० में. मी. अंतरावर तसेच मध्यम व उशिरा कालावधीच्या वाणांची २५०२५ सें.मी. अंतरावर प्रति चुड एक रोप लावून लागवड करावी.

५) प्राथमिक अवस्थेत श्री धान लागवड पध्दतीमध्ये अधिक तणाचा प्रादुर्भाव होतो. त्याकरीता वरचेवर ताऊची गुरमा किंवा कोनोविडरचा वापर करावा अथवा हाताने निंदन करावे.

६) कमी खर्चात तणांचा बंदोबस्त करण्यासाठी रोवणीनंतर ३ दिवसांनी ब्युर्टक्लोर ५० ई.सी. ३.७५ लिटर ५०० लिटर पाणी प्रति हेक्टरी याप्रमाणात वापरावे. तसेच ३० दिवसांनी कोनोविडरने मशागत करावी.

७) प्राथमिक अवस्थेत धान बांधीत जमीन सतत ओली राहिल याप्रमाणे नियंत्रित पाणी द्यावे.

फायदे:

१) या पध्दतीच्या वापरामुळे बियाण्याची बचत होते. प्रति हेक्टरी ५ किलो बियाणे पुरेसे आहे.

२) पारंपरिक पध्दतीपेक्षा निम्मे पेक्षा अधिक पाण्याची बचत होते.

३) पिकास अधिक प्रमाणात फुटवे येऊन ओंबीची लांबी व दाण्यांची संख्या ओंबीमध्ये अधिक असते.

४) पीक जाती निहाय साधारणतः एक आठवडा लवकर तयार होते. रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

५) प्रचलित पध्दतीपेक्षा शाश्वत व २० ते ३० टक्के अधिक उत्पादन मिळते.

३) चारसूत्री भात लागवड पध्दत या लागवड पध्दतीमध्ये खालील बाबींचा अंतर्भाव आहे.

१) धान कोंडा आणि तणसाचा वापर

राखेचा वापर पेरणीपूर्वी करण्यात यावा. गाडावा रोपवाटिकेत प्रति चौरस मीटर क्षेत्रास १.० किलो धान कोंडा किंवा तुस चिखलणीच्या वेळी भाताची तणीस किंवा पेंढा प्रति हेक्टरी दोन टन जमिनीत.

२) हिरवळीच्या खतांचा मर्यादित वापर गिरीपुष्याचा अथवा गराडीचा पाला हेक्टरी १.५ टन रोवणीपूर्णी चिखलात गाडावा.

३) रोपाची नियंत्रित रोवणी भात रोपांची रोवणी १५ सें.मी. x २५ सें.मी. x १५ सें.मी. अंतरावर खुणा केलेल्या नायलॉन दोरीच्या सहाय्याने करावी. याव्दारे भात चुडांचा १५ सें.मी. अंतराचा चौरस तयार होऊन आडवे व उभे दोन ओळीतील अंतर २५ सें.मी. राहते.

४) युरिया, डिएपी ब्रिकेट्सचा वापर युरिया ६० टक्के आणि ४० टक्के डिएपी या मिश्रणातून ब्रिकेटींग मशिनच्या सहाय्याने २.७ ग्रॅम वजनाची गोळी (ब्रिकेट) करण्यात येते. लावणीनंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक रोपाच्या चौकोनात एक गोळी ५-६ सें.मी. खोल रोवण्यात यावी. याकरिता प्रति हेक्टरी १७० किलो ब्रिकेट्स लागतात व याव्दारे पिकास ५६ किलो नत्र अधिक २९ किलो स्फुरद प्रति हेक्टरी दिल्या जाते. त्यामुळे खताच्या वापरात ४० टक्के बचत होते. याव्दारे २०-३० टक्के प्रति हेक्टरी शाश्वत उत्पादनात वाढ होते. त्याचप्रमाणे रोग व किडींचा कमी प्रादुर्भाव होतो.

कापणी व मळणी: पीक निसवल्यानंतर साधारणपणे २५ ते ३० दिवसांनी लॉबीतील ९० टक्के दाणे पक्व झाल्यावर धानाची कापणी करावी आणि कडपा पूर्णपणे वाळल्यानंतर मळणी करावी.

ज्वारी पेरणीची योग्य वेळ कोणती?

खरीप: जून-जुलै, रबी: सप्टेंबर-ऑक्टोबर.

ज्वारीस किती खत द्यावे?

साधारणतः ८०:४०:४० (NPK).

ज्वारी कोरडवाहू पिक आहे का?

होय, कमी पाण्यातही उत्पादन देते.

ज्वारीतील मुख्य किड कोणती?

खोडमाशी, मावा, तुडतुडे.

ज्वारीचे उत्पादन कसे वाढवावे?

सुधारित वाण + योग्य खत + वेळेवर पेरणी.

Exit mobile version