Site icon krishimaha.com

🌿 हरितगृह तंत्रज्ञान (Greenhouse Technology in Marathi) | आधुनिक शेतीसाठी संपूर्ण मार्गदर्शन

हरितगृह तंत्रज्ञान

हरितगृह तंत्रज्ञान

आजच्या आधुनिक शेतीत हरितगृह तंत्रज्ञान (Greenhouse Technology) हे अत्यंत महत्वाचे आणि फायदेशीर तंत्रज्ञान मानले जाते. हवामानातील बदल, अनियमित पाऊस आणि वाढती मागणी यामुळे शेतकऱ्यांनी नियंत्रित वातावरणात शेती करण्याकडे वळणे आवश्यक झाले आहे.

या लेखामध्ये आपण हरितगृह म्हणजे काय, त्याचे फायदे, उभारणी पद्धत, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान आणि औषधी पिके लागवड याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

हरितगृष्ठ म्हणजे काय?।

हरितगृह हे फ्रेम बनवून त्यावर पारदर्शक प्लॅस्टिकचे आच्छादन टाकून उपारले जाते. यामध्ये विविध पिकांकरिता लागणारा योग्य सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता, कर्याम्ल वायू व हवेतील इतर घटक या बाबींवर नियंत्रण करन व्यापारीदृष्ट्या काही पिके घेता येतात.

हरितगृहात कोणती पिके घेता येतात ?

ज्याला बाजारात जास्त मागणी आहे किंवा ती उपलब्ध नाहीत असा भाजीपाला, फळे, फुले, शोभिवंत झाडे, याकरिता मुख्यत हरितगृहाचा व्यापारी दृष्टीकोनातून वापर करता येतो. हरितगृहात भाजीवर्गाच्या पिकांची वाढ दुप्पट पेक्षा जास्त दिसून आली आहे. महाराष्ट्रात पुणे, नाशिक येथे मोठ्या प्रमाणात हरितगृहात फुलांची शेती केली जाते.

हरितगृहाचे फायदे

१) पिकांना लागणारे नियंत्रित वातावरण तयार करता येते.

२) पिकांना खूप जास्त किंवा खूप कमी तापमानापासून व पावसाच्या माऱ्यापासून वाचविता येते.

३) झाडांची झपाट्याने वाढ होते. भाजीवर्गातील पिकांचे उत्पन्न काही पटीने वाढू शकते.

४) फळे व भाज्या यांची प्रत योग्य व्यवस्थापन केल्यास अधिक चांगली राहू शकते.

५) बाजारातील मागणी पाहून विशिष्ट पिकाचा हंगाम नसताना सुध्दा हरितगृहात पीक घेता येते व अधिक नफा मिळू शकतो.

६) किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो किंवा सहजरित्या नियंत्रित करता येते.

७) पाण्याची गरज कमी लागते.

हरितगृहाची उभारणी

हरितगृह बांधण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पिकांच्या वाढीसाठी अनुकूल असे वातावरण तयार करणे होय. यासाठी हरितगृहाची बांधणी सुलभ, वजनाने हलकी परंतु दीर्घकाळ टिकणारी असावी. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्याना सहज, सोपे व आर्थिकदृष्ट्या परवडतील अशी हरितगृहे उभारणे गरजेचे आहे. विदर्भातील हवामानाचा विचार केल्यास उन्हाळ्यातील सरासरी तापमान ३८० ते ४४° से. दरम्यान असून आर्द्रता २० ते २५ टक्के असते. पीक वाढीसाठी सर्वसाधारण तापमान दिवसा २८ ते ३२० से. व रात्री १५० ते १८० से आणि आर्द्रता ५५ ते ६५ टक्के असणे आवश्यक आहे तेव्हा हरित गृह उभारताना तापमान व आर्द्रता नियंत्रण करणे, कार्यक्षम वायुविजन, फॅन व पेंड, आकार या सर्व गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विदर्भामध्ये सुधारित अर्धवर्तुळाकार किंवा दोन्ही बाजूस छताचा कमी-जास्त उतार असणारी हरितगृहे योग्य ठरतात.

प्लॅस्टिक फिल्मचे आच्छादन वापरून हरितगृहे उभारताना पुढील मुद्दे विचारात घ्यावे .

१) हरित गृहाची दिशा एकच स्पॅन असलेले हरितगृह बाधावयाचे असल्यास दिशा पूर्व-पश्चिम ठेवावी, जेणेकरून त्यामध्ये जास्तीत जास्त सूर्यप्रकाश येण्यास मदत होईल परतु एकापेक्षा जास्त स्पॅन असलेले हरित गृह बांधणी करताना मात्र दिशा उत्तर-दक्षिण असावी. कारण दिवसाच्या कोणत्याही वेळेस झाडांची सावली एकमेकावर न पडता बाराही महिने भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध होण्यास मदत होते.

२) हरित गृहाची बांधणी हरितगृहाची टिकावू क्षमता वाढविण्यासाठी लाकूड किंवा बांबूच्या सांगाड्यापेक्षा लोखंडी पाईप किंवा चौरस पाईप तयार केल्यास कमीत कमी २५ ते ३० वर्षापर्यंत सांगाडा टिकू शकतो.

३) छताचा वापर योग्यप्रकारे सूर्यप्रकाश आत येण्यासाठी व हरितगृहातील फिल्मच्या आतील भागावर जमा झालेले पाण्याचे थेंब पिकावर न पडता सरळ घसरुन आतील भिंतीच्या भागाद्वारे जमिनीवर पडावे यासाठी छताचा सर्वसाधारण उतार २० ते २७ अंशाचा असावा४) पलस्टिक पट्टी। नीलकिरणे प्रतिरोधक फिल्म सांगाड्यावर आच्छादन करण्यापूर्वी सांगाडधास प्लॅस्टिक फिल्मची पट्टी गुंडाळावी किंवा फोमच्या पट्ट्या किंवा लाकडी पातळ पट्टी प्रथम सांगाड्यास जोडावी त्यामुळे प्लॅस्टिक फिल्म व लोखंडी सांगाडा यांचा संपर्क टळतो जमिनीमध्ये चारही बाजूनी ५-६ इंच रुंदीची व साधारण ९-१० इंच खोलवर खोदून त्या। फिल्म दाबून चांगली बसवावी.

५) वयापासून संरक्षण वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी हरितगृहाचा योग्य असा आकार निवडून हरितगृहाच्या बाजूने २५ ते ३० मी. अंतरावर शेवरी किंवा सरूचा ताटवा करुन झाडे लावावी, म्हणजे वाऱ्यापासून संरक्षण होण्यास मदत होईल.

६) वातावरण नियंत्रण हरितगृहात वातावरण नियंत्रण करण्यासाठी शेवटी उंची ३ ते ३.५ मी. व मध्यभागी ५ ते ६ मी. ठेवावी तसेच नैसर्गिक वायुविजनासाठी हरितगृह क्षेत्रफळाच्या २० ते ३० टक्के क्षेत्र दोन्ही बाजूनी सोडावे. जेणेकरुन हवा खेळती राहून वातावरण नियंत्रणावर फरक पडतो.

७) हरित गृहाचा सांगाडा सांगाडा तयार करताना त्याचा पृष्ठभाग अणकुचीदार किंवा खडखडीत नसावा, म्हणजे फिल्मचे आच्छादन करताना फिल्मला इजा होणार नाही व जास्त काळ टिकेल. तसेच लोखंडी सांगाड्याला पांढरा रंग मारावा म्हणजे जास्त उन्हामुळे गरम होऊन आतील तापमान वाढणार नाही. कमी वाऱ्याच्या वेगाच्या ठिकाणी उंच व जास्त वाऱ्याच्या वेगाच्या ठिकाणी थोडी कमी उंचीचे हरित गृह बांधावे सांगाडा तयार करताना कमीत कमी लाकूड किंवा लोखडाचा वापर करावा, जेणेकरून प्रकाश किरणे अडविली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

८) फिल्मची पारदर्शकता वातावरणातील बारीक धुळीचे कण फिल्मच्या बाहेरील भागावर जमा होऊन त्याची पारदर्शकता कमी होते व योग्य सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. म्हणून फिल्म बाहेरुन वेळोवळी पाण्याचा फवारा मारुन स्वच्छ धुवून घ्यावी.

२) हरित गृहाची जागा पिकांसाठी हरितगृहातील जास्तीत जास्त जागेचा वापर व्हावा यासाठी जमिनीपासूनच अर्धगोलाकार हरितगृहापेक्षा थोडे सरळ, उंच व गोलाकार घेतल्यास जागेचा योग्य वापर करता येईल तसेच हरित गृहाच्या आच्छादनातून हवेची गळती होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

१०) पन्हाळ्याचा (गटर) उत्तार एकापेक्षा जास्त स्पॅन असलेल्या हरितगृहावरील पावसाचे पाणी गटरद्वारे योग्य प्रकारे वाहून जाण्यासाठी उतार गटरच्या साधारणपणे १२ टक्के असावा व पावसाचे पाणी गटरमधून मोठ्या टाक्यामध्ये जमा करण्यासाठी सोय असावी, जेणेकरुन तेच पाणी ठिंबक संचाद्वारे पिकांना देण्यास मदत होते.

११) हरित गृहाचे क्षेत्रफळ सर्वसाधारण शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या उपयुक्त होण्यासाठी हरितगृहाचे क्षेत्र कमीत कमी ५०० चौ. मी. असावे हरितगृहाचे दोन उभ्या खांबावरील अंतर ३ ते ४ मी ठेवावे जास्त स्पॅन असलेल्या हरितगृहाची लांबी साधारण २० ते २५ मीटर ठेवावी जेणेकरुन बाजूच्या भिंतीमधून व छताच्या झडपामधून कार्यक्षम वायुविजन होण्यास मदत.

होईल. एक स्पॅन हरित गृह करावयाचे असल्यास रुंदी साधारण ६ ते ८ मीटर असावी. २२) प्लॅस्टिक फिल्मची उभारणी फिल्म व्यवस्थित ताणून व फाटणार नाही अशा पध्दतीने लावताना हवेचे तापमान कमी व वाऱ्याचा वेग कमी असताना आच्छादनाचे काम करावे फिल्म लावताना शक्यतो सिंथेटीक वायरचा वापर करावा.

२३) तापमान व आर्द्रता नियंत्रण हरितगृहात घेण्यात येणारे पीक व वापर यांचा विचार करुन वातावरण नियंत्रणासाठी फॅन व पँड तसेच सूक्ष्म किंवा कृत्रिम धुक्याची (फॉगर्स) सोय करावी

१४) किटकनाशकांचा वापर हरितगृहातील पिकांवर किटकनाशके फवारताना पॉस्टिक विल्यावर जावू नये याची खाता घेणे आवश्यक आहे.

१५) हरितगृहातील सणांचा बंदो हरितगृहातील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी जमिनीवर पीक घेण्यापूर्वी त्यावर काळ्या प्लॅस्टिक फिल्मचा आच्छादन म्हणून वापर केल्यास फायदेशीर ठरतो.

१६) ऊर्जा आणि तिचा वापर घंड प्रदेशात किंवा विशेषकरन हिवाळ्याच्यावेळी रात्रीला बाहेरील तापमान अतिशय कमी असल्यामुळे आतील ऊर्जा वातावरणात जाण्यास मदत होते व रात्रीचे योग्य तापमान हरितगृहामध्ये न मिळाल्याने पिकाची वाढ व उत्पनात घट येऊ शकते, माणून अति थंडीमध्ये आवश्यकतेनुसार हरितगृहाच्या छतावर काळ्या रंगाची फिल्म टाकावी.

१७) हवाबंद बांधकाम – हरितगृह व बाहेरील वातावरणामध्ये बरीच तफावत असते व ती टिकून ठेवण्यासाठी हवाबंद बांधकाम असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्लॅस्टिक फिल्मचे आच्छादन अतिशय महत्वाचे असते. हरितगृह हवाबंद नसल्यास रात्रीचे वेळी जर बाहेरील हवा आत आली तर हरितगृहाची कार्यक्षमता साधारण २५ टक्क्याने कमी होते. हरितगृहासंबंधी मार्गदर्शन – हरितगृह है कमीत कमी १०० चौ. मीटर आकाराचेसुध्दा उभारता येते शासनातर्फे हरित गृह उभारणीसाठी जास्तीत जास्त ५०० चौ. मीटर पर्यंत अनुदान दिले जाते. हरितगृहाची उभारणी, पिकांची निवड, खर्चाचा आराखडा हरितगृहाचे व्यवस्थापन, अनुदान इत्यादी बाबींवर विद्यापीठाद्वारे सल्ला दिला जातो. त्यासाठी विभाग प्रमुख, कृषि स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधावा.

आधुनिक हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान

हायड्रोपोनिक्स म्हणजे काय माती विना फक्त पाण्याचा किंवा पोषणतत्वयुक्त पाण्याचा वापर करून ट्रे मध्ये धान्याची उगवण व अंकुरणापासून तयार झालेल्या हिरव्या चाऱ्याला हायड्रोपोनिक्स असे म्हणतात. जनावरांना आवश्यक त्या प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध होत नसेल तेव्हा हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून कमी दिवसात चारा निर्मिती करता येवू शकतो या तंत्राने चारा उत्पादनासाठी ५० ते ७५ टक्के क्षमतेचे शेडनेट, फॉगर सिस्टीम, टाईमर, प्लास्टिक ट्रे इ. साधनांची गरज असते. त्यासोबतच हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती सांगाड्याची उभारणी करावी लागते. चारा निर्मितीसाठी शुध्द चागल्या प्रतिचे बियाण्यांचा वापर करावा जनावरांना त्यांच्या आहारामध्ये आवश्यक त्या प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी हायड्रोपोनिक्स पध्दतीने चारा उत्पादन घेणे फायद्याचे ठरते. कमी दिवसात हिरवा चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान एक चांगला पर्याय आहे. या तंत्रज्ञानामुळे कमी जागेत, कमी वेळेत व कमी पाण्यावर आपणास हिरवा चारा निर्मिती करता येतो

हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती पध्दत

हिरवा चारा निर्मितीसाठी बियाणे चांगले असावे व त्याची उगवण क्षमता ८० टक्क्यांपेक्षा कमी नसावी.

सुरुवातीस बियाणे स्वच्छ धुवून वापरावे.

३४२ फुट आकाराच्या ट्रे करीता २ किलो धान्य लागते.

* धुतलेले बियाणे १२ ते २४ तास पाण्यात भिजत ठेवावे व नंतर पाणी काढून टाकावे.

बियाण्यास मोड येण्यासाठी गोणीत २४ ते ३० तास ठेवावे.

गोणीमध्ये २४ ते ३० तासानंतर धान्याला मोड येतात मोड आलेले धान्य ट्रे मध्ये समान पसरवून ते ट्रे रॅकच्या मांडणीवर ठेवावे.

दर २ तासाच्या फरकाने २ मिनिटांकरीता फॉगर अथवा झारीने पाणी द्यावे एका ट्रे करीता प्रति दिन २५० ते ३०० मि.ली.

पाणी वापरावे.

हायड्रोपोनिक्स चाऱ्याचे फायदे :

वर्षभर चारा उत्पादन घेता येते.

चाऱ्याची पाचकता देखील वाढते.

अतिशय कमी पाण्यात, कमी जागेत, कमी वेळेत चारा निर्मिती करता येते.

वेळेची व मनुष्यबळाची बचत होते.

चारा निर्मिती करीता मातीची आवश्यकता नाही

कोड, रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

पाण्याचा किफायतशीर वापर होतो.

चारा निर्मिती करतांना घ्यावयाची काळजी.

चांगल्या प्रतिच्या बियाण्याचा वापर करावा, उगवण चांगली असावी

चारा ट्रे मध्ये जास्त दिवस ठेवू नये.

शेड स्वच्छ असावे आणि शेडमध्ये नेहमी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

ट्रे मधून पाण्याचा निचरा होईल अशा पध्दतीने मांडणी करावी. शेवाळयुक्त पाण्याचा वापर करू नये

बियाणे चांगले धुवून घेवूनच पाण्यात भिजत ठेवावे.

* योग्य बियाण्याचा वापर करावा खराब बियाणे निवडून बाजूला काढावे.

हायड्रोपोनिक्स सांगाडा उभारणी हायड्रोपोनिक पध्दतीने चारा निर्मितीसाठी सूर्यप्रकाशाची जास्त गरज नसते. त्यामुळे हायड्रोपोनिक्स रॅक सावलीमध्ये ठेवल्यास उत्पादीत चाऱ्याला दर्जा चांगला मिळतो. युपीव्हीसी पाईपचा वापर करून विक्सीत केलेल्या पीडकेव्ही हायड्रोपोनिक सरचनेचा (आकरमान ३४ २ x ३ मी.) हिरव्या चाऱ्याच्या निर्मितीसाठी उपयोग करावा.

औषधी व सुगंधी पिकांचे लागवड तंत्र

औषधी वनस्पतीची लागवड करण्याअगोदर बाजारपेठेचा अभ्यास करणे जसे कोणकोणत्या औषधी व सुगंधी वनस्पतींना मागणी आहे, नेमका कोणता वनस्पतीचा भाग लागतो, त्याची प्रत व बाजार दर, मागणी किती आहे इत्यादी विषयी सखोल माहितीची प्रत्यक्ष खरेदीदाराशी संपर्क करून खात्री करावी शेतकरी गट / समुहाच्दारे मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास बाजारपेठेत पाठविण्यास सोपे तसेच योग्य दर मिळण्यास उपयुक्त ठरते विदर्भातील हवामान व जमिनीचा विचार करून व आर्थिक दृष्ट्या फायदेशीर राहू शकतील अशा औषधी व सुगंधी वनस्पतीच्या शाखशुध्द लागवड तंत्र विषयाची संक्षिप्त माहिती तक्ता क्र. १ व २ मध्ये दिलेली आहे. लागवड व प्रक्रिया विषयीच्या माहितीसाठी नागार्जुन वनौषधी उद्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे प्रत्यक्ष संपर्क करावा.

हरितगृह म्हणजे काय?

नियंत्रित वातावरणात शेती करण्यासाठी तयार केलेली संरचना.

हरितगृहात कोणती पिके घेता येतात?

भाजीपाला, फुले, औषधी वनस्पती.

हरितगृहाचे मुख्य फायदे काय आहेत?

उत्पादन वाढ, किड नियंत्रण, पाण्याची बचत.

हरितगृहासाठी किती खर्च येतो?

क्षेत्रफळ व प्रकारावर अवलंबून.

हायड्रोपोनिक्स म्हणजे काय?

मातीशिवाय पाण्यात शेती करण्याची पद्धत.

Exit mobile version