किडींचे सर्वेक्षण

Table of Contents

एकीकृत कीड व्यवस्थापनामध्ये गरजेनुसार किडीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आठवड्यातून कमीत कमी एक वेळा पिकावरील किडीचे, परोपजीवी/परभक्षक किटकांचे तसेच किडवृध्दीशी निगडीत इतर बार्बीचे सर्वेक्षण

खालील पध्दतीचा अवलंब करून करावे.

शेतातील कमीत कमी १२ ते २४ झाडांची (रॅन्डम पध्दतीने) निवड करावी. रस शोषण करणाऱ्या किडीसाठी निवडलेल्या प्रत्येक झाडाच्या तीन पानावरील (वरचे, मधले व खालचे) मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, कोळी इत्यादींची संख्या मोजावी. सर्व पानावरील किडींच्या संख्येच्या बेरजेनंतर एका पानावरील किडींची सरासरी काढावी. आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच योग्य ती उपाय योजना करावी.

निवडलेल्या प्रत्येक झाडावरील एकूण किडग्रस्त कळ्ळ्या, पात्या, फुले, शेंगा/बोंडे इत्यादीचे मोजमाप करून त्याची नुकसानीची टक्केवारी काढावी. ही टक्केवारी आर्थिक नुकसानीच्या मर्यादा पातळीपेक्षा जास्त असली तर त्वरितउपाययोजना करावी,

शेतात पिकाची पाहणी केल्यावर पोंगेमर (भात), शेंडेमर (ज्वारी, ऊस), शेंडेअळी (कपाशी) यांचे प्रमाण जर आर्थिक नुकसानीच्या मर्यादा पातळीचेवर आढळून आले तर नियंत्रणाचे योग्य उपाय योजावेत.

सर्वेक्षण करताना परोपजीवी/परभक्षी किटकांचे प्रमाण वाढत असल्याचे किंवा व्यवस्थापणाचे दृष्टीने योग्य * असल्याचे आढळले तर रासायनिक किटकनाशकाचा वापर करणे थोडे पुढे ढकलावे किंवा आवश्यक असेल तर सुरक्षीत किटकनाशकांचा वापर करावा.

किडींचे सर्वेक्षण
किडींचे सर्वेक्षण

सर्वेक्षणासाठी ४-५ लिंगाकर्षण (प्रलोभन) सापळे एक हेक्टर क्षेत्रासाठी लावावेत. हे सापळे पिकापेक्षा एक फूट उंचीवर काठीच्या आधाराने लावावेत, म्हणजे त्यातून निघणारा गंध शेतात पसरेल. सापळ्यामधील फेरोमोनयुक्त काकडी (लूर) दर तीन आठवड्यानी बदलावी. सापळ्यात अडकलेल्या नर पतंगाची दररोज सकाळी नोंद घेऊन त्यांचा नाश करावा. पतंगाची संख्या जर सतत ३-४ दिवस आर्थिक नुकसानीच्या मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास नियंत्रणाची उपाययोजना करावी. परंतु यासाठी प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या शेतात सापळे लावणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या किडींसाठी ठराविक लिंगाकर्षण सापळे असतात. उदा. अमेरिकन बोंडअळी हेलिल्यूर, हेक्झालूर, ठिपक्याची बोंडअळी – व्हिटाल्यूर, शेंदरी बोंडअळी गॉसिप्लूर इत्यादी.

जीवो जीवस्य : जीवनम्’ या तत्वानुसार निसर्गामध्ये एका जिवावर जगणारा दुसरा जीव हा असतोच. याप्रमाणे विविध पिकांच्या किडींवर जगणारे किटक निसर्गामध्ये आहेत परंतु किडीचे नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांचा अवास्तव वापरामुळे मित्र किटक मारल्या जातात आणि निसर्गाचा समतोल बिघडतो त्यामुळे किडींचा उद्रेक होण्याचा धोका संभवतो. आपल्या भागात पिकांच्या विविध किडींवर जगणारे सर्वसाधारण ७० मित्र किटक आढळल्याची नोंद आहे. त्यामुळे निवडक अशा मित्र किटकांची आपणास ओळख असणे अत्यंत आवश्यक आहे.

क्रायसोपाची अळी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, पिठ्या ढेकूण, किडोंची अंडी व लहान अळ्या यांचे भक्षण करते. क्रायसोपाचा पतंग पोपटी हिरवा निळसर झाक असलेला असतो. मादी पतंग पानांवर किंवा देठावर एक एकटे अंडी घालते. अंडे हिरव्या रंगाचे असून पांढऱ्या तंतुच्या टोकावर चिकटलेले असते. अंड्यातून ४८ तासात अळी बाहेर पडते व भक्ष्याच्या शोधात फिरते. अळी दोन्ही बाजूच्या तुलनेत मध्यभागी रूंद असते.

ट्रायकोग्रामाची माशी अतीसुक्ष्म असते. ती दुसऱ्या किडीच्या अंड्यात आपली अंडी घालते. त्यामुळे अंडी अवस्थेतच किडीचा नायनाट होतो. असे ट्रायकोग्रामाची अंडी असलेली ‘ट्रायकोकार्ड’ आपणाला विकत मिळू शकतात.

अ.क्र पिकाचे / किडीचे नावआर्थिक नुकसानीची मर्यादा पातळी
१. ज्वारीः

खोडमाशी

खोडकिडा

मोजमाशी
१० टक्के मरग्रस्त झाडे किंवा १० टक्के रोपावर प्रत्येकी १ अंडे

१० टक्के झाडांवरील पानावर छिद्रे अथवा शेंडेमर

१-२ माशा प्रति कणीस
२. तूर आणि हरभरा :

शेंगा/घाटे पोखरणाऱ्या अळ्या
२ अळ्या प्रति मीटर ओळीत किंवा ५ टक्के शेंगाचे/घाट्यांचे नुकसान.
३. भुईमूगः

पाने गुंडाळणारी अळी
२ अळ्या प्रति झाड
४. सूर्यफूल :

तुडतुडे

घाटेअळी
एका पानावर सरासरी ३ तुडतुडे (पिल्ले) ०.५ ते १ अळी (सरासरी) प्रति झाड.
५. धान

अ) रोपवाटिका-

गादमाशी

खोडकिडा

तुडतुडे

ब) रोवणीपासून फुटवे येईपर्यंत

गादमाशो

खोडकिडा

तुडतुडे

पाने गुंडाळणारी अळी

क) फुटव्याची अवस्था (निम्मे फुटवे फुटल्यावर)

गादमाशी

खोडकिडा

तुडतुडे

पाने गुंडाळणारी अळी

ड) शेलपान येण्यापासून ओंबी निसवण्यापर्यंत

तुडतुडे

पाने गुंडाळणारी अळी

३) फुलोर अवस्थेपासून पुढे

तुडतुडे
एक चंदेरी पोंगा प्रति चौरस मिटर.

एक अंडीपुंज प्रति चौरस मिटर

१ ते २ तुडतुडे प्रति चौरस मिटर.

एक चंदेरी पोंगा प्रति चौ. मिटर नियमित व ५ टक्के पोंगे अनियमित किडग्रस्त क्षेत्रात.

५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पोंगे मर अथवा एक अंडीपूंज प्रति चौ. मिटर

१० तुडतुडे प्रति चुडा

१ किडग्रस्त पान प्रति चुडा

५ टक्के चंदेरी पोंगे प्रति चौ. मिटर

५ टक्के मरग्रस्त झाडे.

५ ते १० तुडतुडे प्रति चुडा.

१ ते २ किडग्रस्त पाने प्रति चुडा.

५ ते १० तुडतुडे प्रति चुडा

१ ते २ किडग्रस्त पाने प्रति चुडा.

५ ते १० तुडतुडे प्रति चुडा

लेडीबर्ड बिटल या परभक्षक किटकाचे प्रौढ भुंगे व त्यांच्या अळ्या प्रामुख्याने मावा किडीवर जगतात. लेडीबर्ड बिटलबी अंडी रंगाने पिवळसर व आकाराने लांबुळकी असून समुहाने परंतू उभी घातलेलो असतात. अळी ६ ते ८ मि.मी. लांब असून रंगाने करडी व त्यावर पांढरके ठिपके असतात. प्रौढ तुरीच्या दाण्यासारखे पण खालून चापट व वरून फुगीर असतात. प्रौढ रंगाने पिवळसर, बदामी किंवा लालसर असून त्यांच्या समोरच्या पंखावर काळ्या रेषा किंवा ठिपके असतात. काही प्रजातीमध्ये ते नसतात. अळी प्रति दिवशी २५ मावा तर प्रौढ भुंगा ५६ मावा खाऊन टाकतो. पिकांवर मावा किडीसोबत लेडीबर्ड बिटल आढळून आल्यास किटकनाशकांचा वापर टाळावा.

ही सुद्धा मावाकिडीचा महत्वाचा भक्षक किटक आहे. या माशीची अळी रंगाने हिरवट असून तोंडाकडचा भाग टोकदार असतो. अळीला पाय नसतात. एक अळी दिवसभरात सर्वसाधारणपणे १०० मावा खाऊ शकते. माशी घरात आढळणाऱ्या माशी सारखी असून तिच्या पाठीवर लाल, काळे व पिवळे पट्टे असतात. माशीचे डोके लालसर असते.

कातीण हा कोळी वर्गातील असून त्याला आठ पाय असतात. विविध प्रकारच्या व आकाराच्या रंगीबेरंगी कातीन सर्वच पिकांवर पहायला मिळतात. सर्व प्रकारच्या कातीण आपल्या आकारमानाप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या किडींना खातात. त्यामुळे कातीण सुध्दा शेतकऱ्यांचा मित्र होय.

पेट्याटोमिड बेकूण हे ढालीच्या आकाराचे काळपट कध्या रंगाचे असून सर्व पिकांवर पाहायला मिळतात. हे ढेकूण आपली सोड बोंडअळ्या, उंट अळ्या तसेच इतर अळ्यांच्या शरीरात खुपसून शरीरातला द्रव शोषन करतात. परिणामी अळी मरते.

हे ढेकूण छोटे काळपट रंगाचे असून त्यांना सोंड असते. हे ढेकूण फुले तसेच पानांच्या बोचक्यात लपून बसतात. पिल्ले चकचकीत पिवळसर रंगाचे असतात. प्रौढ व पिल्ले मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी, किडींची अंडी तसेच लहान अळ्या मध्ये आपली सोंड खुपसून आतील द्रव शोषण करतात त्यामुळे किडी मरतात.

वेगवगळ्या प्रकाराच्या गांधील माशा अळ्यांच्या शोधात आपल्याला विविध पिकांवर आढळून येतात. गांधील माशी अळ्या गोळा करून घरट्यामध्ये घेऊन जातात. त्यांचा नंतर खाद्य म्हणून वापर करतात.

या माशा पाऊस येण्यापूर्वी आपल्याला उडतांना दिसतात. ह्या विविध प्रकारच्या अळ्यांना खातात.

ह्या किटकाचे समोरचे दोन्ही पाय भक्ष पकडण्यासाठी तोंडा समोर जोडून ठेवतात. त्यामुळे हा किटक हात जोडून प्रार्थना करत असल्याचे दिसते, म्हणून याला प्रार्थना किटक असे म्हणतात. हा किटक भुंगे, अळ्या, ढेकूण ई. किडॉना खातात.

हे ढेकूण काळपट लाल रंगाचे असून अळ्यांच्या शरीरात आपली सोंड खुपसून संपूर्ण द्रव शोषतात,त्यामुळे अळ्या मरतात.

 हे ढेकूण काळपट लाल रंगाचे असून त्याचे डोळे शरीराच्या बाहेर आलेले दिसतात. हे ढेकूण मावा, तुडतुडे व लहान अळ्यामध्ये सोंड खुपसून त्यातील द्रव शोषतात त्यामुळे किडी मरतात.

याशिवाय विविध पिकांवर नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या किडींच्या शत्रु किटकांचे म्हणजेच शेतकऱ्यांच्या मित्रकिटकांचे सवर्धन करणे गरजेचे आहे. उदा. घाटे अळी व तंबाखूची पाने खाणारी अळीचा विषाणू, बोटी जीवाणू टॅकनिड माशी, रोगस, इंअरविंग, चारोपस, अॅपंन्टेलीस व विविध परोपजीवी बुरशी (मॅटरायझीयम, बॅव्हेरीया, नोम्युरीया, व्हर्टीसीलीयम ई.) वेगवेगळ्या किडींवर आपली उपजिविका करून पिकांवरील किडनियंत्रणात मदत करतात. म्हणून शेतकरी बंधूंनी आपल्या पिकांवरील किडींचे व मित्र किटकांचे किमान दर आठवड्याने सर्वेक्षण करून, मित्र किटकांची संख्या पुरेशी असल्यास किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक किटकांचा वापर टाळावा. आवश्यक असेल तर व किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यावरच रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा,

या सारख्या पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा

किडींचे सर्वेक्षण का आवश्यक आहे?

किडींच्या प्रादुर्भावाची वेळेवर माहिती मिळण्यासाठी आणि योग्य कीड नियंत्रणासाठी सर्वेक्षण आवश्यक असते.

किडींचे सर्वेक्षण कोणत्या पिकांसाठी केले जाते?

सर्व प्रमुख पिकांसाठी, जसे की कापूस, भात, सोयाबीन, हरभरा, आणि भाजीपाला पिके यासाठी सर्वेक्षण होते.

फेरोमोन सापळ्यांचा उपयोग कशासाठी केला जातो?

विशिष्ट किडींच्या नर किटकांना आकर्षित करून त्यांची संख्या मोजण्यासाठी फेरोमोन सापळे वापरले जातात.

कीड ओळखण्यासाठी कोणती साधने वापरली जातात?

भिंग, सापळे, फील्ड नोटबुक, आणि स्मार्टफोन अ‍ॅप्स वापरले जातात.

सर्वेक्षणाची वेळ आणि वारंवारिता कशी असावी?

आठवड्यातून एकदा तरी सर्वेक्षण करणे उपयुक्त ठरते, विशेषतः कीड प्रादुर्भावाच्या हंगामात.

सर्वेक्षण करताना कोणत्या गोष्टींची नोंद घ्यावी?

कीडीचे प्रकार, त्यांची संख्या, प्रादुर्भावाची टक्केवारी आणि झाडांचे नुकसान याची नोंद घ्यावी.

किडींचे सर्वेक्षण शेतकऱ्यांनी स्वतः करू शकतात का?

होय, थोडे प्रशिक्षण घेतल्यावर शेतकरी स्वतःही सर्वेक्षण करू शकतात.

परोपजीवी आणि मित्र किडकांचा सर्वेक्षणात काय उपयोग आहे?

हे नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी महत्त्वाचे असतात, त्यामुळे त्यांची नोंद उपयुक्त ठरते.

सर्वेक्षणाच्या अहवालाचा उपयोग काय आहे?

योग्य उपाययोजना करण्यासाठी आणि कृषी अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी अहवाल उपयोगी पडतो.

सर्वेक्षणासाठी कोणती अ‍ॅप्स वापरता येतात?

Plantix, CropIn, Kisan Suvidha अशा अ‍ॅप्सचा उपयोग सर्वेक्षणासाठी केला जातो.

Leave a Comment