Site icon krishimaha.com

फुलशेतीची संपूर्ण माहिती: गुलाब, शेवंती, गिलार्डिया, गेंदा, मोगरा व ग्लॅडिओलस लागवड

फुलशेतीची संपूर्ण माहिती

१) गुलाब

हवामान समशितोष्ण हवामानात गुलाबाची वाढ चांगली होते तसेच मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमान या पिकास चांगले मानवते

जमीन उत्तम निचरा होणारी, पोयट्धाची जमीन निवडावी क्षारयुक्त, चोपण जमिनीत गुलाब चागले बहरत नाही

जमिनीचा सामू (पी.एच) ६० ते ७.५ च्या दरम्यान असावा

अभिवृध्दी नौल गुलाबावर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात डोळे भरून करावी

पूर्वतयारी लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची आडवी उभी नागरणी करून हराळी व तणे वेचून काढावीत त्यानतर वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी नंतर जातीनुसार ६० x ६० सें मी. अंतरावर ५० x ५० x ५० से मी. आकाराचे खड्डे खोदून पावसाळ्यापूर्वी कुजलेले शेणखत, पालापाचोळा व गाळाची माती टाकून खड्डे भरावेत. त्यासाठी हेक्टरी २७,७७७ झाडे लागतात.

लागवड डोळे भरलेल्या कलमी गुलाबांची लागवड पावसाळ्यात करणे योग्य आणि सोयीचे ठरते लागवडीकरिता सप्टेंबर-ऑक्टोबर हा काळ सुध्दा उत्तम आहे. पुढे थंडीच्या काळात लागवड टाळावी.

खाते हेक्टरी एकूण ६०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद व २०० किलो पालाश खालील प्रमाणे विभागून द्यावे जून छाटणीनंतर १५० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश व त्यानतर एक महिन्याने १५० किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे नोव्हेंबर छाटणीनंतर सुध्दा वरील प्रमाणेच खते द्यावीत. बाजारातील मागणीप्रमाणे छाटणीची वेळ मागेपुढे करावी. ओलीत पावसाळ्यात पाणी नसताना १५ दिवसांनी, हिवाळ्यात १० ते १२ दिवसांनी आणि उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसानी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

जाती गुलाबाच्या अनेक जाती आणि प्रकार आहेत. तथापि लागवडीचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून योग्य जातीची निवड करावी.

लाल ग्लॅडिएटर, टोरो, पापा मिलांद, सोफिया लॉरेन्स, खिश्चम डायर, एव्हान, मिस्टर लिंकन, क्रिमसन ग्लोरी, इत्यादी

पिवळा लाडोरा, गंगा, किंग्ज रॅमसन, सनकिंग, समर सनशाईन, होकोटू, मावेला, डच गोल्ड इत्यादी.

गुलाबी फर्स्ट प्राईज, क्विन एलिझाबेथ, मारिया, फ्रेंडशीप, डॉ. बी. पी पाल मृणालिनी, पीटर फ्रैंकन फिल्ड.

पाडरा डॉ. होमी भाभा, जॉन एफ. केनेडी व्हिगों, जवाहर, व्हाईट मास्टर पीस, पास्कली, गार्डन पार्टी, लुशियाना

निळा व जांभळा ब्लू मून लेडो एक्स, निलांबरी, पॅराडाईज

केशरी समर हॉलिडे, फोकलोर, लारा, सुपर स्टार.

बहुरगी डबल डिलाईट, पीस, सी पर्ल, अमेरिकन हेरिटेज, लव्ह, अभिसारिका, टाटा सेनेटरी.

सुगंधित ओकलोहोमा, सुगंधा, क्रिमसन ग्लोरी, अॅवान, आयफेल टॉवर, परफ्यूम डिलाईट, फोकलोर, रेड मास्टर पीस

सुपरस्टार, ग्लॅडिएटर, पॅराडाईज, टोरो, हॉनर, लव्हस्टोरी, लांडोरा इत्यादी.

आतरमशागत नियमित खुरपणी करून तणे काढावीत. मुळ्याजवळील माती मोकळी करणे महत्वाचे आहे. तसेच

खुटावरील फूट वेळोवेळी काढावी. पावसाळ्यात आळ्यामध्ये पावसाचे पाणी साचू देऊ नये

काढणी फुले उमलण्यापूर्वीच सिकेटरने दांडीसहीत काढावी फुले काढून त्यांचा दांडा पाण्यात ठेवल्यानंतर १ सें. मी. चा

खालील भाग पाण्यातच कापावा.

छाटणी आपल्या वातावरणात प्रामुख्याने जून व ऑक्टोंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात छाटणी करावी

हेक्टरी उत्पादन गुलाबाचे जाती, वय व अंतरानुसार प्रति झाड प्रति वर्षी ५० ते ६० फुलाचे उत्पादन मिळते.

(२) शेवंती

जाती पीडीकेव्ही रागिनी, पीकेव्ही शुभ्रा राजा, पिवळी रेवडी, पांढरी रेवडी, सोनाली, तारा, बागो बिरबल सहानी,

आयआय एच आर ४ इत्यादी जमीन हलकी ते मध्यम पाण्याचा उत्तम निचरा होणारी

अभिवृष्टी काशा (सकर्स), फाटे कलम यांची मुळे बुरशीनाशकात बुडवून लावावीत

लागवडीचा हंगाम जून जुले लागवडीचे अंतर ३० x ३० सें.मी. सरी वरबा किंवा सपाट वाफ्यात

हेक्टरी झाडे १,११,१११ काशा

रासायनिक खताची मात्रा ३००:२०० २०० किलो नत्र स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी द्यावे त्यापैकी १/३ नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीचे वेळी व उरलेले नत्र दोन समान हप्त्यात विभागून एक महिन्याचे अंतराने द्यावे लागवडीपूर्वी हेक्टरी १५ ते २० टन शेणखत जमिनीत मिसळावे

फुले येण्याची वेळ हळव्या जाती सप्टेंबर-ऑक्टोबर,

गरव्या जाती नोव्हेंबर-डिसेंबर हेक्टरी उत्पादन ७ ते १० मे टन

(३) गिलार्डिया

जाती एकेरी पाकळ्याच्या पिडोकेव्ही रोहीणी, इंडियन चौफ, डॅझलर, टेस्टा फिएस्टा दुहेरी पाकळ्याच्या रिगॅलीस, सरमुनी, लॉरेन्त्रीयाना. ग्रंडीफ्लोरा पिक्टा मिक्स इत्यादी

जमीन हलकी ते मध्यम, उत्तम निचरा होणारी

लागवडीची वेळ जून-जुले सप्टेंबर-ऑक्टोबर, जानेवारी-फेब्रुवारी बियाणे गादी वाफ्यावर अनुक्रमे में ऑगस्ट

व डिसेंबरमध्ये पेरावे

अभिवृष्टी वियाण्यापासून रोपे तयार करून हेक्टरी बियाणे ५०० ते ७५० ग्रॅम

लागवडीचे अंतर ६० x ४५ सें. मी. सरी वरवा किंवा सपाट वाफ्यात

रासायनिक खताची मात्रा १००:५०:५० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रतिहेक्टर द्यावे सपूर्ण स्फुरद पालाश आणि अर्धे नत्र

लागवडीच्या वेळी व अर्धे नत्र एक महिन्याने द्यावे लागवडीपूर्वी हेक्टरी ८ ते १०न शेणखत जमिनीत मिसळावे गिलाडीया फुलाच्या अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी लागवडीनंतर ३० व ४५ दिवसांनी २०० पीपीएम सायकोसोलया संजीवकाची फवारणी करावी

फुले येण्याची वेळ लागवडीपासून दोन महिन्यानी हेक्टरी उत्पादन ५ ते ७ मे टन

४) अडू

जाती आफ्रिकन जाती (उच वाढणाऱ्या) केसरी, क्रैकरजॅक, यलो सुत्रिम हवाई अलास्का, पुसा नारंगी गेंदा, पुसा बसंती गेंदा. फ्रेंच जाती (बुटक्या जाती) पाईन अॅपल, क्रश कौन, बटरबॉल, रेड ब्रोकेड, पुसा अपीता (फ्रान्सीसी गेंदा)

जमीन हलकी ते मध्यम

लागवडीची वेळ जून-जुलै, जानेवारी फेब्रुवारी बियाणे गादी वाफ्यावर अनुक्रमे में व डिसेंबर मध्ये पेरावे

अभिवृध्दी बियांपासून रोपे करून, हेक्टरी बियाणे ७५० ते १२५० ग्रॅम

लागवडीचे अंतर ४५ x ३० किंवा ६० x ३० सें.मी. अंतरावर सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यात

रासायनिक खताची मात्रा (नत्र, स्फुरद, पालाश) १००-५०:२५ किलो प्रति हेक्टरी संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र लागवडीच्या वेळी तर उरलेले अर्धे नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे उपलब्धतेनुसार शेणखताचा वापर करावा.

फुले येण्याची वेळ लागवडीपासून दोन महिन्याने हेक्टरी उत्पादन ७ से १० मे. टन.

(५) अॅस्टर

जाती फुले व्हाईट, फुले व्हायलेट, फुले पिंक, फुले पर्पल, रामकाठी, ऑस्ट्रीच प्लम, पावडरपफ, कॉमेट, आळंदी मिश्र कामिनी, पुर्णिमा, शशांक, फुले ब्लू.

जमीन मध्यम, उत्तम निचरा होणारी.

लागवडीची वेळ सप्टेंबरमध्ये बी पेरून, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रोपांची लागवड करावी.

अभिवृध्दी बियांपासून रोपे तयार करून. हेक्टरी बियाणे १ ते १५ किलो.

लागवडीचे अतर ३० x ३० सें मी अंतरावर सरी किंवा सपाट वाफ्यात

गमायनिक खताची मात्रा (नत्र, स्फुरद, पालाश) १५०-५०/५० किलो/हेक्टर सपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र लागवडीच्या वेळी तर उरलेले अर्धे नत्र कळ्या धरताना द्यावे लागवडीपूर्वी हेक्टरी ८ ते १० टन शेणखत जमिनीत मिसळावे

फुले येण्याची वेळ लागवडीपासून तीन महिन्यानी हेक्टरी उत्पादन ६ ते ८ मे. टन

(६) निशीगंध

जाती सिंगल (एकेरी पाकळ्याचा) रजत रेखा, श्रीनगर, प्रज्वल, फुले रजनी, डबल (दुहेरी पाकळ्याचा) सूवर्ण रेखा डबल-पलं, सुवासिनी, वैभव

जमीन मध्यम, उत्तम निचरा होणारी

लागवडीचा हगाम एप्रिल-मे. अभिवृध्दी कंदापासून

हेक्टरी बियाणे / कंद २५ लाख कद (२० ते ३० ग्रॅम वजनाचे)

लागवडीचे अंतर २०x२० सें. मी., सपाट वाफ्यात

रासायनिक खताची मात्रा (नत्र, स्फुरद, पालाश) २००:३०० २०० किलो प्रति हेक्टर. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि

१/३ नत्राची मात्रा लागवडीच्या वेळी आणि १/३ नत्र लागवडीनंतर ४५ दिवसानी व त्यानंतर १/३ नत्र ४५ दिवसानी द्यावे लागवडीपूर्वी हेक्टरी १५ ते २० टन शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीपूर्वी कद जिर्वेलिक अॅसिड-३ या सजीवकाच्या १२५ पीपीएम तिव्रतेच्या द्रावणामध्ये २४ तास बुडवून लावल्यास फुलदांडे व कंदाचे उत्पादन वाढते

फुले येण्याची वेळ कंद लागवडीनंतर ७५ ते ९० दिवसात फुलांचे दांडे पडू लागतात.

हेक्टरी उत्पादन ३ ते ४ लाख दांडीची फुले किंवा १० ते १२ मे. टन मोकळी फुले

७) मोगरा

जाती खोया, हजारी बेला, बेला, मोतिया बेला, गुंडूमल्ली, एकेरी पाकळ्याच्या तसेच दुहेरी पाकळ्याच्या.

जबीन मध्यम, उत्तम निचरा होणारी लागवडीची वेळ जून ते सप्टेंबर अभिवृध्दी छाट कलम (पक्व) तयार करून,

छाटणी डिसेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यात (जमिनीपासून ३० सें.मी. उंचीवर)

लागवडीचे अंतर १ x १ मीटर अंतरावर लागवडीकरिता ४५ x ४५ x ४५ सें.मी. आकाराचे खड्डे करावेत.

हेक्टरी कलमे १०,००० छाट कलम

रासायनिक खताची मात्रा (नत्र, स्फुरद, पालाश) १२०:२४०:१२० किलो/हेक्टर

संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र छाटणीचे अगोदर खंदणी करताना, उरलेले नत्र कळ्या धरण्याचे वेळी द्यावे

लागवडीपूर्वी हेक्टरी १० ते १५ टन शेणखत जमिनीत मिसळावे

फुले येण्याची वेळ मार्च ते जुलैले हेक्टरी उत्पादन ३ ते ५ मे. टन.

(८) ग्लॅडिओलस

जाती पीडीकेव्ही रोशनी, पीडीकेव्ही गोल्ड, फुले गणेश, फुले प्रेरणा, फुले निलरेखा, फुले तेजस, पूनम, सपना, व्हाईट फ्रेंडशीप, नजराणा, सुचित्रा, यलोस्टोन, ब्लूबर्ड, डेबोनेर, सिलेक्शन वन, फिस्टर, संसरे, ऑस्कर, पुसा शुभम, पुसा

किरण, जमीन मध्यम, उत्तम निचरा होणारी लागवडीची वेळ ऑक्टोबर

अभिवृष्टी कद (३ ते ४ सें.मी. व्यासाचे) हेक्टरी कंद साधारणतः १,४०,००० ते १,५०,००० कंद.

लागवडीचे अंतर ४५ x १५ सें.मी., सरी वरंब्यावर तसेच ३० x २५ सें.मी. सपाट वाफ्यात

रासायनिक खताची मात्रा (नत्र, स्फुरद, पालाश) ५००:२००:२०० किलो प्रति हेक्टर. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि १७०

किलो नत्र लागवडीचे वेळी आणि पीक दोन व चार पानांवर असताना प्रत्येक वेळी १६५ किलो नत्र द्यावे. लागवडीपूर्वी हेक्टरी १० ते १५ टन शेणखत जमिनीत मिसळावे. ग्लॅडीओलस पिकामध्ये नत्रयुक्त रासायनिक खतांची मात्रा कमी करण्याकरीता कंदाना लागवडीपूर्वी अॅझोटोबॅक्टर २५ ग्रॅ / प्रति कि. आणि अॅझोस्पीरीलीयम जिवाणू खतांची प्रक्रिया करावी.

फुले येण्याची वेळ कंद लागवडीनंतर ६० ते ९० दिवसात. हेक्टरी उत्पादन साधारणतः १,४०,००० ते १,५०,००० फुलदाडे

(९) हंगामी शेवंती

जाती पौडीकेव्ही बिजली, एकेरी पाकळ्याच्या व दुहेरी पाकळ्याच्या स्थानिक जातो.

जमीन मध्यम, उत्तम निचरा होणारी लागवडीची वेळ

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात

अभिवृष्टी बियापासून रोपे तयार करून हेक्टरी बियायो

५०० ते ७५० ग्रॅम.

लागवडीचे अंतर ४५ x ३० किंवा ३० x ३० सें.मी. सपाट वाफ्यात

रासायनिक खताची मात्रा (नत्र, स्फुरद, पालाश) १००:५०:५० किलो/हेक्टर संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र लागवडीच्या वेळी तर उरलेले अर्धे नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे

फुले येण्याची वेळ लागवडीनंतर दोन महिन्यानी फुलांची तोडणी सुरु करावी

हेक्टरी उत्पादन १० ते १२ मे टन.

1. गुलाबाची लागवड करण्यासाठी कोणती जमीन योग्य आहे?

गुलाबासाठी उत्तम निचरा होणारी पोयट्याची जमीन योग्य आहे. क्षारयुक्त आणि चोपण जमिनीत गुलाबाची वाढ चांगली होत नाही. स्रोतामध्ये जमिनीचा pH 6.0 ते 7.5 दरम्यान ठेवण्याचा उल्लेख आहे.

2. शेवंतीची लागवड कोणत्या महिन्यात करावी?

दिलेल्या माहितीनुसार शेवंतीची लागवड जून-जुलै महिन्यात करता येते. लागवडीचे अंतर साधारण 30 × 30 सें.मी. ठेवले जाते.

3. गेंदा पिकाची लागवड कधी करावी?

गेंदाच्या लागवडीसाठी जून-जुलै हा हंगाम दिलेला आहे. तसेच जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लागवडीसाठी बियाणे गादी वाफ्यावर पेरण्याची माहिती दिली आहे.

4. निशीगंधाची लागवड कशी केली जाते?

निशीगंधाची लागवड एप्रिल-मे महिन्यात कंदांपासून केली जाते. लागवडीचे अंतर साधारण 20 × 20 सें.मी. असून स्रोतामध्ये 75 ते 90 दिवसांत फुलदांडे येण्याचा उल्लेख आहे.

5. ग्लॅडिओलसचे उत्पादन किती मिळू शकते?

दिलेल्या स्रोतामध्ये ग्लॅडिओलसचे हेक्टरी उत्पादन साधारण 1,40,000 ते 1,50,000 फुलदांडे दिले आहे. लागवड साधारण ऑक्टोबरमध्ये केली जाते.

Exit mobile version