पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय

Table of Contents

गायीच्या जाती / उपयोगिता / वैशिष्ट्ये

विदर्भातील हवामान, पीक पध्दती व उपलब्ध संसाधने यांचा विचार करता उपयुक्त जातीवंत भारतीय गायींचा प्रसार होऊन निरूप्तादक गावरान गायींची संख्या कमी करणेसाठी उपयोगीतेनुसार शुध्द जातीचे सकर वापरणे योग्य.

१) जातीचे नावगौळावू
मुळस्थानविदर्भ (वर्धा जिल्हा)
दुध उत्पादन६०० किलो / वेत
उपयोगीताबैल नांगरणी, वखरणी, ओढकामासाठी अतिशय उपयुक्त.
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हे
बुलडाणा, अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपुर, वर्धा, वाशिम,
उपलब्ध बाजारपेठाआर्वी तहसील (वर्धा जिल्हा)
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय देवणी गाय
२) जातीचे नावदेवणी
मुळस्थानमराठवाडा (लातूर जिल्हा)
दुध उत्पादन९०० किलो / वेत
उपयोगीतागायी दुधासाठी चांगल्या व बैल शेतीकाम /ओढकामासाठी प्रसिध्द.
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हे
अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, वर्धा,
उपलब्ध बाजारपेठामराठवाडा (लातूर जिल्हा)
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय लाल कंधार
३) जातीचे नावलाल कंधार
मुळस्थानमराठवाडा (नांदेड जिल्हा)
दुध उत्पादन६०० किलो / वेत
उपयोगीताबैल शेती / ओढकामासाठी प्रसिध्द
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेअकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, वर्धा,
उपलब्ध बाजारपेठानांदेड जिल्हा कंधार, मुखेड, लोहा
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय खिल्लार
४) जातीचे नावखिल्लार
मुळस्थानसातारा, सांगली, सोलापूर, धुळे व जळगांव जिल्हा
दुध उत्पादन४०० किलो / वेत
उपयोगीताबैल शेती / ओढकामासाठी प्रसिध्द
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेअकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, वर्धा,
उपलब्ध बाजारपेठासातारा, सांगली, सोलापूर, धुळे व जळगांव जिल्हा
डांगी गाय
५) जातीचे नावडांगी
मुळस्थाननाशिक, ठाणे, अ.नगर, व सुरत
दुध उत्पादन६०० किलो / वेत
उपयोगीताबैल भातशेतीमध्ये चिखलगी, ओढकामासाठी प्रसिध्द गायी दुधासाठी उपयुक्त
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेभंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपुर
उपलब्ध बाजारपेठानाशिक, इगतपुरी, घोटी

भारतातील जाती

साहिवल गाय
१) जातीचे नावसाहिवाल
मुळस्थानमॉटगोमरी (पाकिस्तान) रावी नदीचे खोरे पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश
दुध उत्पादन३००० किलो / वेत
उपयोगीतागायो दुधासाठी सर्वोत्तम
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेसंपूर्ण विदर्भ प्रदेश
उपलब्ध बाजारपेठापंजाब, जालंधर, गुरुदासपुर व कर्नाल, हिस्सार, मथुरा, दुर्ग
थारपरकर गाय
२) जातीचे नावथारपारकर
मुळस्थानमॉटगोमरी (पाकिस्तान) रावी नदीचे खोरे पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश
दुध उत्पादन१६००-१८०० किलो / वेत
उपयोगीताबैल शेती / ओढ कामासाठी प्रसिध्द, गायी दुधासाठी उत्तम
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेअमरावती, अकोला, बुलडाणा, वर्धा, यवतमाळ, नागपुर, वाशिम
उपलब्ध बाजारपेठाजोधपूर, अजमेर (राजस्थान) बनसर्कठा, आनंद, (गुजरात)
लाल सिंधी
३) जातीचे नावलाल सिंधी
मुळस्थानकराची, हैद्राबाद, (पाकिस्तान)
दुध उत्पादन१७०० – २००० किलो / वेत
उपयोगीतागायी दुधासाठी उत्तम व बैल शेती / ओढकामासाठी उपयुक्त
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेसंपुर्ण विदर्भ प्रदेश
उपलब्ध बाजारपेठाकर्नाल, बंगलोर
हरियाणा गाय
४) जातीचे नावहरियाणा
मुळस्थानपंजाब व हरियाना राज्य
दुध उत्पादन९००-११०० किलो / वेत
उपयोगीताबैल शेती / ओढ कामासाठी प्रसिध्द, गायी दुधासाठी उपयुक्त
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेयवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, अकोला, बुलडाणा, वाशिम, गोंदिया
उपलब्ध बाजारपेठारोहतक, गुडगांव, हिस्सार (हरियाना)
गीर गाय
५) जातीचे नावगीर
मुळस्थानकाठेवाड गीर जंगल (गुजरात)
दुध उत्पादन१६०० किलो / वेत (५% फॅट)
उपयोगीतागायी दुधासाठी उत्तम व बैल शेती/ओढकामासाठी उपयुक्त
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेसंपुर्ण विदर्भ प्रदेश
उपलब्ध बाजारपेठाअहमदाबाद, आनंद, खेडा जिल्हा गुजरात राज्य
काँक्रेज गाय
६) जातीचे नावकाँक्रेज
मुळस्थानकच्छचे आखात, महाराष्ट्र (गुजरात)
दुध उत्पादन१६०० किलो / वेत
उपयोगीतागायी दुधासाठी उत्तम व बैल शेती/ओढकामासाठी प्रसिध्द
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेसंपुर्ण विदर्भ प्रदेश
उपलब्ध बाजारपेठाअहमदाबाद, खेडा, (गुजरात)
राठी गाय
७) जातीचे नावराठी
मुळस्थानजयपुर, भरतपुर, अप्पर (राजस्थान)
दुध उत्पादन१२०० किलो / वेत
उपयोगीताबैल नांगरणी/वखरणी शेती/ओढकामासाठी उपयुक्त,
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेअकोला, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, नागपुर, अमरावती
उपलब्ध बाजारपेठाअल्वर, पुष्कर, अहमदाबाद, जयपुर (राजस्थान)

संकरित विदेशी गाईंच्या जाती

जर्सी गाय
१) जातीचे नावजर्सी गाय
मुळस्थानइंग्लीश खाडीतील जर्सी बेट (४.५% फॅट)
दुध उत्पादन४००० किलो / वेत
उपयोगीता गायी दुधासाठी विदर्भात सर्वोत्तम/वेल ओढकामासाठी/शेतीसाठी उपयुक्त
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेसंपूर्ण विदर्भ प्रदेश
उपलब्ध बाजारपेठाकरनाल, हिसार, बंगलोर, लोणी, लोहा
होलस्टिन फ्रेसीयन
२) जातीचे नावहोलस्टिन फ्रेसीयन
मुळस्थानहॉलंड
दुध उत्पादन६००० किलो / वेत
उपयोगीता गायी दुधासाठी सर्वोत्तम (चांगले व्यवस्थापन),बैल शेती/ओढकामासाठी उपयुक्त
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेसंपूर्ण विदर्भ
उपलब्ध बाजारपेठाकरनाल, हिसार, बंगलोर, लोणी, लोहा

म्हशीच्या जाती

मुऱ्हा म्हैस
१) जातीचे नावमुऱ्हा
मुळस्थानपंजाब हरियाना
दुध उत्पादन२००० किलो / वेत
उपयोगीता म्हशी दुधासाठी सर्वोत्तम
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेसंपूर्ण विदर्भ
उपलब्ध बाजारपेठादिल्ली, हिस्सार, रोहतक, गुडगाव
सुरती
२) जातीचे नावसुरती
मुळस्थानगुजरात राज्य
दुध उत्पादन२२०० किलो / वेत
उपयोगीता दुधासाठी सर्वोत्तम
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेसंपूर्ण विदर्भ
उपलब्ध बाजारपेठासुरत, आनंद, बडोदा, खेडा, (गुजरात)
मेहसाना म्हैस
३) जातीचे नावमेहसाना
मुळस्थानमेहसाना जिल्हा (गुजरात)
दुध उत्पादन१६००-१७०० किलो वेत
उपयोगीता दुधासाठी सर्वोत्तम
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेसंपूर्ण विदर्भ
उपलब्ध बाजारपेठामेहसाना, आनंद, अहमदाबाद
जाफ्राबादी म्हैस
४) जातीचे नावजाफ्राबादी
मुळस्थानगिरचे जंगल गुजरात
दुध उत्पादन२२०० किलो / वेत (९-१०% फॅट)
उपयोगीता दुग्ध पदार्थ निर्मितीसाठी दुध उपयुक्त
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेसंपूर्ण विदर्भ
उपलब्ध बाजारपेठासौराष्ट्र (गुजरात)
नागपुरी गोळवू
५) जातीचे नावनागपुरी (गौळावू)
मुळस्थाननागपुर, वर्धा जिल्हा
दुध उत्पादन११०० किलो / वेत
उपयोगीता दुधासाठी उपयुक्त
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेसंपूर्ण विदर्भ
उपलब्ध बाजारपेठानागपुर, वर्धा, (कारंजा तालुका)

६) जातीचे नावनागपुरी (पुर्णाधडी)
मुळस्थाननागपुर, वर्धा, यवतमाळ
दुध उत्पादन१००० किलो / वेत
उपयोगीता दुधासाठी उपयुक्त
संगोपनासाठी शिफारस करण्यात आलेले जिल्हेसंपूर्ण विदर्भ
उपलब्ध बाजारपेठानागपुर, वर्धा, अकोला

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय

उपलब्ध संसाधनावर (कडबा / काड / कुटार / भरडा) आधारीत गोपालन.

उपल्ब्ध बाजारपेठ व मागणी वर आधारीत दुग्धोत्पादन. (सहकारी संस्था गाय दूध, हॉटेल / दुग्धपदार्थ म्हैस दूध)

आहार (संतुलित), निवारा (अन्न/वारा/पाऊस यापासून संरक्षण) रोगराई (लसीकरण) व्यवस्थापन.

अधिक दुग्धोत्पादनासाठी संकरीत गायी (५०% विदेशी) पाळाव्या. (संकरीत गायींना संतुलीत आहार/निवारा /औषधोपचार अत्यावश्यक)

संतुलित / पोषक आहारात एकदल व व्दिदल पिकांचा योग्य प्रमाणात समावेश असावा.

खुराक घरचे घरीच तयार करून प्रति लिटर दूध उत्पादनाचा खर्च कमी करता येतो.

कोरडा चारा ३-४ किलो यामध्ये ज्वारी/मका/गवतवर्गीय पिकांची कुट्टी ३-४ किलो सोयाविन / उडीद/मुग/तुर या पिकांचे काड/ कुटार एकत्र द्यावे.

हिरवा चारा २५-३० किलो यामध्ये ज्वारी /मका / वाजरी / ओला गवतवर्गीय पिके २० किलो (कुट्टी) व चवळी / लुसर्न /बरसिम ५-१० किलो एकत्र करून द्यावे.

आलप घरचे घरी करावयाचा आलप-गहू / बाजरी/मका/ज्वारी-४० किलो सोयाबिन उडीद/मुग/तुर २० किलो + जवस /भुईमुग २० किलो सरकी २० किलो एकत्र करून १ लिटर दुध उत्पादनासाठी ४०० ग्रॅम प्रमाणे द्यावा.

दिवसभरातून ३५-४० लि. स्वच्छ पाणी पाजावे.गायीचा दुध देण्याचा कालावधी २८० ते ३०० दिवस असावा, भाकड काळ ४५ ते ६० दिवसाचा असावा.

गाय म्हैस व्यायल्यानंतर ६० ते ९० दिवसात फळवावी.सामुहिक चराईपध्दतीमुळे होणारे शेतीचे नुकसान जातीवंत जनावरांचे गावरानीकरण व अत्यल्प दुग्धोत्पादन टाळण्यासाठी सामुहिक चराई बंदी ठाण बंद पध्दतीचा पुरस्कार.

कळपातील गावरान वळूचे खच्चीकरण करून त्याजागी जातीवंत सिध्द वळू वापरा वएक गाव एक जात” या संकल्पनेचा पुरस्कार करावा.

हिरव्या चाऱ्याच्या दूर्भिक्षावर मात करणेसाठी सामुहिक चारा पेढ्यांची निर्मिती करून बचतगटांच्या माध्यमातून “मुरघास निर्मिती व विक्री केंद्राची निर्मितीसाठी प्रोत्साहन.

सहकाराचे माध्यमातून निर्माण झालेल्या दूधसंकलन केंद्राचे पुर्नरूज्जीवन व बळकटीकरण करून दूध उत्पादकांना सहकारातुन चारा / खुराक / लसीकरण सुविधा उपलब्ध करणे.

गावपातळीवर दूधाचे शितकरण संयंत्र उपलब्ध करणे स्वच्छ दुध उत्पादनासाठी पुरस्कृत करणे.

अतिरिक्त दुधापासून समुहाने बाजारातील मागणीनुसार दुग्धपदार्थ निर्मिती केंद्र स्थापन करणे.

नियमित लसीकरण व तपासणी शिबिरांचे आयोजन करणे.

शेतकऱ्याने आपल्या शेताचे अर्थशास्त्र व ताळेबंद कसे करावे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .

गायीची कोणती जात दुधासाठी सर्वाधिक उपयुक्त आहे?

होलस्टिन फ्रेसीयन आणि जर्सी गाय या जाती दुधासाठी सर्वोत्तम आहेत.

विदर्भासाठी कोणत्या देशी गायीच्या जाती उपयुक्त आहेत?

गौळावू, देवणी, खिल्लार आणि डांगी या जाती विदर्भासाठी उपयुक्त आहेत.

बैल ओढकामासाठी सर्वाधिक उपयुक्त जात कोणती आहे?

खिल्लार, हरियाणा आणि थारपारकर जातीचे बैल ओढकामासाठी प्रसिद्ध आहेत.

सर्वाधिक दूध देणारी म्हशीची जात कोणती आहे?

जाफ्राबादी आणि सुरती या म्हशीच्या जाती सर्वाधिक दूध देतात.

विदर्भात म्हशीच्या कोणत्या जातीचा प्रसार केला जातो?

मुऱ्हा, नागपुरी आणि मेहसाना म्हशी विदर्भात मोठ्या प्रमाणावर आढळतात.

संकरीत गायी म्हणजे काय?

संकरीत गायी म्हणजे देशी आणि विदेशी जातींचा संगम – जसे जर्सी किंवा होलस्टिन फ्रेसीयन.

गायीच्या संगोपनासाठी कोणते जिल्हे शिफारसीय आहेत?

अकोला, वाशिम, बुलडाणा, वर्धा, नागपूर आणि अमरावती हे जिल्हे शिफारसीय आहेत.

काँक्रेज गायीची वैशिष्ट्ये कोणती?

ती शेती, ओढकामासाठी उपयुक्त असून दूध उत्पादनातही उत्कृष्ट आहे.

लाल सिंधी गायीचे दूध उत्पादन किती आहे?

लाल सिंधी गायीचे सरासरी दूध उत्पादन 1700–2000 किलो प्रति वेत आहे.

दूधासाठी सर्वोत्तम म्हैस कोणती आहे?

जाफ्राबादी म्हैस दुधासाठी आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी सर्वोत्तम मानली जाते.

Leave a Comment