रेशीम शेती उद्योग

रेशीम शेती उद्योग : रेशीम शेती उद्योगाला संपूर्ण महाराष्ट्र तमेच विदधांत भरपूर वाव आहे. रेशीम शेती उद्योगातील निर्मित रेशीम धागा व त्यापासून वख तयार करतात रेशीम वाला देशात आणि आपल्या राज्यात प्रचंड मागणी आहेत दरवर्षी १६ ते २०% ने वाढत आहे स्वयंरोजगार निर्मितीची प्रचंड शक्ती या रेशीम शेतीत आहे. तुती लागवड किडी संगोपन धागा व वस निर्मिती मधून स्वयंरोजगार निर्मिती होते.

Table of Contents

विदर्भात गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या चार जिल्ह्यात जंगलातील ऐन / अर्जुनवर उद्योगाला वाव आहे. विशेषतः विदर्भात सिल्क आणि मिल्क ही संकल्पना एकत्रीतपणे राबविल्यास एकाएकी लागवडीपासून दर महीन्याला कोष विक्रीपासून पैसा, एका गायीपासून मिळणाऱ्या दुधाचा दररोज पैसा गायीला खाद्य म्हणून वापरल्यामुळे ३०% खाद्यातील बचत व दर्जेदार दुध ह्या जमेच्या बाजू आहेत. राज्य रेशीम एवं बडनेरा रोड, अमरावती येथे तुतीची लागवड, रेशीम किडींचे संगोपन, धागा निर्मिती ह्या सर्व बाबी एक मिळतात

विदर्भात अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलढाणा, वर्धा व नागपूर या जिल्ह्यात तुती रेशीम गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर या ४ जिल्ह्यात टसर रेशीम शेती योजनेस प्रोत्साहन दिले जाते. राज्य रेशीम संचालना नागपूर येथे असून एकूण २२ जिल्ह्यात रेशीम उद्योग राबविला जातो. रेशीम शेती योजने संबंधी तांत्रीक माहिती विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. बेबसाईट आयडी www.mahasilk.gov.in असा आहे.

रेशीम शेती उद्योग
रेशीम शेती उद्योग

हवामान: विदर्भात रेशीम शेती करीता हवामान पोषक आहे. रेशीम किडींच्या संगोपनाकरीता २० ते २५ सेल्सिअस तापमार व आर्द्रता ६५ ते ८५ टक्के आवश्यकता असते.

जमीन: तुती लागवडीसाठी हलकी, मध्यम व भारी, चांगला निचरा होणारी जमीन योग्य आहे. तुतीच्या लागवडोलगाएं जमिनीची ६० सेमी खोली व सामू (आम्ल व विम्ल निर्देशांक) ६.५ ते ७.८ दरम्यान असावा.

सिंचन : तुतीचे झाडास संरक्षित सिंचनाची सोय आवश्यक आहे.

तुतीचे वाण : तुतीचे अनेक वाण किंवा जाती उपलब्ध आहेत. तथापि योग्य वाणाची निवड ही रेशीम किटकांना चांगल्या प्रतिची पाने व अधिक उत्पादनासाठी खूप महत्वाची आहे. रेशीम शेती उद्योगातील ५५ ते ६०% खर्च तुती पानांच्या उत्पादना होत असल्याने तुती लागवडीसाठी योग्य वाणाची निवड केल्यास उद्योग आर्थिक दृष्ट्या अधिक फायदेशीर ठरतो

बागायती वाण व्ही-१: ही जात बारमाही बागायती असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असून रासायनिक खते व पाण्याचे योग्य नियोजन केल्यास एकरी २० ते २५ हजार किलो तुती पानांचे वार्षिक उत्पादन मिळते. तुती पाल्याचे उत्पादन जेवढे जास्त तेवढेच जास्त किटक संगोपन करून जास्तीत जास्त कोषाची निर्मिती करता येते. एस-३६ हो जात चांसे किटक संगोपनासाठी योग्य आहे. तुती बागेचे योग्य नियोजन केल्यास एकरी १६ ते १८ मे. टन पानांचे उत्पादन मिळते.

जिराईत/कोरडवाहू वाण : एस-१३ व एस-३४ वाण कोरडवाहू‌साठी योग्य आहेत. हे दोन्ही वाण बागायती जमिनीत लागवड केल्यास एकरी १७ ते १८ हजार किलो तुती पानांचे वार्षिक उत्पादन देतात. तसेच जिराईत/कोरडवाहू जमिनी लागवड केल्यास ६ ते ७ हजार किलो तुती पानांचे उत्पादन मिळते.

तुती लागवडीकरीता नोंदणी : रेशीम संचालनालयातील जिल्हा रेशीम कार्यालयात दरवर्षी एप्रिल ते जून मध्ये गु लागवडीकरीता ईच्छूक शेतकऱ्यांची नोंद करुन अनुक्रमे बेणे व रोपे लागवडीकरीता अग्रीम रकमेचा भरणा केल्यास सवल दरात या कार्यालयातून बेणे / रोपे मिळू शकतात.

लागवडीचा कालावधी : पावसाचा अंदाज लक्षात घेवून जून ते सप्टेंबर पर्यंत लागवड करता येवू शकते.

तुतीची लागवड : रोपे व कलमाव्दारे करतात. तुतीच्या कलमांकरीता आठ महिने ते एक वर्षाच्या वयाची फांदी निवडावी. सकस सफांदीचे २० सेमी लांबीचे तुकडे करावेत. फांदीचा टोकाकडील हिरवा भाग बेणे म्हणून वापरु नये कलमांवर ४ ते ५ डोळे असावेत. साल निघालेले बेणे लागवडीसाठी वापरु नये. तुतीच्या कलमांना लागवडीपूर्वी बाविस्टन किया कैप्टन या बुरशी नाशकाचा १ टक्के द्रावणात ३० मिनिटे बुडून ठेवावीत. तसेच मुळे लवकर फुटाची म्हणून स्टेक्स किंवा कॉक्स संजिवक पवडारचा उपयोग करावा. इतर पिकाप्रमाणे जमीन तयार करावी. एक एकराकरीता साधारणतः पट्टा पद्धतीने (५ फुट ३ फुट २ फुट) अंतरावर लागवड केल्यास ५४५० कलमांची आवश्यकता भासते. पट्टा पद्धतीने लागवड केल्यामुळे तुतीची झाडे मोठी होईपर्यंत पहिल्या पाच महिन्यात भाजीपाला, मुग, सोयाबीन, कांदा इत्यादी पीके घेता येवू शकतात.

आंतर मशागत : तुतीची लागवड केल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर खुरपणी करून गवत काडी कचरा काढावा दूसरी खुरपणी दोन देव महिन्यांनी करावी. त्यानंतर प्रत्येक पानांच्या खुडणीनंतर आंतरमशागत करावी. तुतीच्या दर्जेदार पानाचे अधिक उत्पादनासाटो आंतरमशागत करणे आवश्यक आहे.

तुति झाडावरील रोग आणि किडी – तुतीचे झाडावर सर्व साधारणतः विदर्भातील हवामानामध्ये रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव सहर सीतथापि असा प्रादुर्भाव दिसल्यास (उंटअळी, पाने खाणारी अळी, पाने पिवळी पडणे) जिल्ह्यातील रेशीम विकास यांचा सल्ला घ्यावा.

पाण्याचे व्यवस्थापन व खतांचा वापर : तुती झाडाच्या पानांचा वापर हा पुढे रेशीम किटक संगोपनाकरीता खाद्य म्हणून असल्यामुळे ही पाने कोवळी, हिरवी, लुसलूसीत, प्रोटीनयुक्त राहावीत म्हणून तुती बागेचे इतर पिकाप्रमाणे खत आवश्यक प्रमाणात उपलब्ध असल्यास पाणी देवून बागेची निगा राखावी.

तुति लागवडीसाठी लागवडीसाठी खतांचा वापर : तुतीची वाढ योग्य होणेसाठी रासायनिक खते देणे महत्वाचे आहे. तुती कलमांची सागवड केल्यानंतर २ ते २.५ महिन्यात कलमांना मुळे फुटतात. तेव्हा पहीली मात्रा अडीच महिन्यानंतर, एकरी २४ किलो स रिंग पद्धतीने जमिनीत झाकून द्यावी. दुसरी मात्रा २४:२४:२४ किलो नत्र, स्फुरद व पालाश अशी द्यावी.

दुसऱ्या वर्षी तुतीच्या झाडांची मशागत व खतांची मात्रा ; दुसऱ्या वर्षी तुतीच्या झाडांची छाटणी जून महिन्यात केल्यानंतर ८ १० दिवसांनी उभी व आडवी नांगरणी करावी. ८ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत / कंपोस्ट खत झाडांमदेण्यात यावे. नंतर छारणी करावी. शेणखतामुळे मोठ्या प्रमाणात सुक्ष्म अन्नद्रव्ये मिळाल्यामुळे तुती पानांचा दर्जा सुधारतो व उत्पादन वाढते.

रासायनिक खताची मात्रा : दुसऱ्या वर्षी पासून पुढे एकरी १४०:५६:५६ किलो नत्र, स्फुरद व पालाश या प्रमाणात देण्यासंबंध बेय रेशीम मंडळ, म्हैसूर यांनी खालील प्रमाणे शिफारस केलेली आहे.

अ. क्र. खताची मात्रा (किलो)महिनानत्र स्फुरदपालाशशेरा
पहिली जून २८ २८ २८ जून महिन्यात तुती बागेची छाटणी झालेनंतर त्वरीत आंतर मशागत करुन १५ दिवसांनी
दुसरी सप्टेंबेर २८ —-—-पहिले पीक घेतल्यानंतर (१ बंग युरीया)
तिसरी ऑक्टोबर२८ २८ २८ दुसरे पीक घेतल्यानंतर
चौथीडिसेंबर २८ —-—-तिसरे पीक घेतल्यानंतर (१ बंग युरीया)
पाचवीफेब्रुवारी २८ —-—-चौथे पीक घेतल्यानंतर (१ बंग युरीया)
एकूण रासायनिक खतांची मात्रा१४० ५६ ५६

त्यामध्ये दुसऱ्या व चौथ्या मात्रेच्या वेळी ५ किलो विपूल किंवा अन्य सुक्ष्म अन्नद्रव्ये, वर खतांची मात्रा मिसळून द्यावी. रासायनिक खताशिवाय गांडूळ खत, शेणखत, हिरवळीची खते वापरावीत. मुक्ष्म अत्रद्रव्ये मेरीबुम्टचाही वापर करावा त्यामुळे कोषाची गुणवत्ता व उत्पादन वाढण्यास मदत होते.

रेशीम
रेशीम

तुतीच्या बागेचे उत्कृष्ठ निगा व दर्जेदार पानांची निर्मिती हा रेशीम किडी संगोपनाचा अविभाज्य भाग आहे. शेतात तुतीची लागवड व घरात, झोपडीत किंवा स्वतंत्र संगोपनगृहात रेशीम किडीचे क्षमतेप्रमाणे संगोपन करता येते. रेशीम किडीच्या संगोपनाकरीता रेशीम किडीची अंडी (डि.एफ. एल.) ७५ टक्के अनुदानात जिल्हा रेशीम कार्यालयाकडे मागणी नोंदवून २५ टक्के रकमेचा भरणा करून मिळतात. राज्यात फांदी पद्धत व क पद्धतीचा संगोपनासाठी वापर करण्यात येतो. तुतीची वाढ चांगली झाल्यानंतर ऑक्टोबर/नोव्हेंबर महिन्यात रेशीम किटकांचे संगोपन सुरु करावे. तत्पूर्वी रेशीम संचालनालयाच्या जिल्हा रेशीम कार्यालयातील अधिकाऱ्याकडून देण्यात येणारे रेशीमा किटक संगोपनाचे प्रशिक्षण घ्यावे.

प्रामुख्याने २ रेशीम किडीचे वाण प्रचलीत आहेत.

१) कोलार गोल्ड कोलार गोल्ड जातीचे कोष सोनेरी पिवळसर रंगाचे असतात. एका कोषाचे वजन १.२ ते १.५ ग्रॅम

असते. एका कोषातून सलग ८०० ते ९०० मीटर धागा मिळतो.

२) सीएसआर-१८ x सीएआर-१९ किंवा डबल हायब्रीड सीएसआर जातीचे कोष पांढरे रंगाचे असतात, एका कोषाचे वजन १.५ ते १.९ ग्रॅम पर्यंत असते. एका कोषातून सलग ११०० ते १२०० मीटर धागा मिळतो.

वरील दोन्ही जाती विदर्भात घेता येतात. विदर्भातील वातावरणासाठी कोलार गोल्ड जातीच्या संगोपनासाठी वर्षेभर वापर करता येवू शकतो. कोषाचे यशस्वी पीक व उत्पादनही चांगले मिळते. तसेच सीएसआर-१८ x सीएसआर-२० जातीचे संगोपन ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत चांगले होते. कोलार गोल्डच्या तुलनेत सीएसआर जातीला अधिक देखभाल व अधिक पाला लागतो आणि ही जात रोगराईला जास्त बळी पडते.

रेशीम किडीचे संगोपनाकरीता ब्लॅक बॉक्सींग, अंडी उबविणे, सुक्ष्म अळ्यांना पाला कापून देणे, अळ्यांच दुसऱ्या अवस्थेपर्यंत काळजी घेणे आवश्यक असते. रेशीम किडीची वाढ ही खाद्य पाल्याचा दर्जा, तापमान व आर्द्रता यावा अवलंबून असते. तसेच संगोपनाच्या सर्व अवस्थेत संगोपनगृहात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. संगोपनाच्या प्रत्येक अवस्थे अळ्या कात टाकत असतांना दर्जेदार चुना पावडर किंवा बाजारात मिळणारे विजेता, अंकुश इत्यादी निर्जंतुकाचा गादीक वापर करावा.

रेशीम किटक संगोपन शास्त्रीय पद्धतीने केल्यास तसेच किटकांवर येणारे ग्रासरी व फ्लॅचरी या रोगाचे वेळोवेळ तज्ञांचा सल्ला घेवून नियंत्रण केल्यास १०० अंडीपुंजापासून पहिल्या वर्षी ५० किलोग्रॅम व दुसऱ्या वर्षापासून ५० ते ८ किलोग्रॅम कोषाचे उत्पादन घेता येते. दुसऱ्या वर्षापासून एकावर्षात ८ पिके घेता येतात. आणि या ८ पिकापास सर्वसाधारण ४०० किलो कोषाचे उत्पादन मिळते. रेशमाची शास्त्रोक्त शेती व अनुभवाच्या आधारावर उत्पादनामध्ये आपण वाढ करू शकतो कोलार गोल्ड व बायव्होल्टाईन या जातीच्या कोषाला सर्वसाधारण ‘अ’ दर्जा मिळतो.

रेशीम कोषाची कर्नाटक, तामीळनाडू, आंध्रप्रदेश येथील व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी समुहाने विक्री केल्यास चांगल नफा मिळू शकतो.

अ. क्र. तपशिलपहिली अवस्थादुसरी अवस्थातिसरी अवस्थाचौथी अवस्थापाचवी अवस्था
दिवस३.५ ते ४२ ते ३३ ते ४४ ते ५६ ते ७
२ तुतीची पाने (कि. ग्रॅम)५ ते ६१३ ते १६६० ते ८०२२५ ते २५०१२०० ते १४५०
३ तुतीच्या फांद्या (कि.ग्रॅम)५ ते ६१३ ते १६११५ ते १४०३८५ से ४६०२४०० ते २८८०
किटक संगोपनासाठी जागा (वर्ग फुट)४ ते १४१४ ते ४५४५ ते १६०१६० ते ३००३०० ते ६००
तापमान (अंश सेल्सिअस)२७ ते २८२७ ते २८२५ ते २६२५२४ ते २५
सापेक्ष आर्द्रता (टक्के)८५८० ७५ ते ८०७० ते ७५६५ ते ७०
कात टाकण्याचा कालावधी (तास)२०२४२४ ते ३०२४ ते ३०—–
किटक संगोपनाच्या वेळी स्वच्छताएक वेळएक वेळएक वेळएक वेळएक वेळ
रेशीम किटक संगोपनाच्या कालावधीत वापरावयाचे निर्जंतूक औषध (विजेता/अंकुश/अमृत/आर. के. ओ. पावडर)७२ ग्रॅम प्रथम कात टाकल्यानंतर१४४ ग्रॅम दुसरी कात टाकल्यानंतर५४० ते ६०० ग्रॅम तिसरी कात टाकल्यानंतर१.४ किलो चौथी कात टाकल्यानंतर२.१ ते २.५ किलो पाचव्या अवस्थेत पाचव्या दिवशी

टिप : किटक संगोपनगृहात २५ ते २८ सेल्सीअस तापमान राखणे सहज शक्य आहे.

१५ फुट x २० फुट आकाराचे संगोपनगृह, बांबू, तुराट्या, गवत ईत्यादीचा वापर करुन कमी खर्चात तयार करता येते. आणि आवश्यकतेनुसार आधुनिक संगोपनगृह, जिल्हा रेशीम विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उभारता येवू शकते. या सर्व बाबींची माहिती रेशीम पार्क, अमरावती येथे प्रत्यक्ष भेटीत मिळू शकते. रेशीम शेती योजनेसाठी शासनाच्या सवलती.

१) सवलतीच्या दराने तुती, बेणे व अंडीपुंज यांचा पुरवठा.

२) शेतकरी प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन.

३) शासनाच्या हमी भावाने रेशीम कोष खरेदी.

४) रोजगार हमी योजनेद्वारे, तीन वर्षातून एकदा एकरा प्रमाणे अनुदान उपलब्ध करुन दिले जाते.

५) चॉकी किटक संगोपनासाठी प्रोत्साहन व सवलत.

६) रेशीम धागा निर्मिती व इतर उद्योजकता विकासासाठी विविध योजना.

१) शुट कटर २) लिफ कटर ३) प्लास्टीक ट्रे ४) अंडी उबविण्याची चौकट ५) फोम पेंड ६) थर्मामीटर ७) हायग्रोमीटर ८) पॅराफीन पेपर/प्लास्टीक पेपर ९) डस्टर १०) स्प्रे पंप ११) प्लास्टीक चंद्रीका/नेंत्रीका १२) नॉयलॉन जाळी १३) विजेता /अंकुश/रेशम ज्योती/रेशम संजिवनी/सुरक्षा/आरकेओ निर्जंतूक औषध/१४) सेनीटेक/अस्त्र / सेरीक्लोअर

रेशीम उद्योगामध्ये कुटूंबातील सदस्यांचा (लहानपासून ते वृध्दापर्यंत) सहभाग असला तर हा उद्योग जास्त फायद्याचा ठरतो. तसेच महीला बचत गट एकत्रीतपणे येवून पुढे कोषापासून धागा व वस्त्र निर्मिती शासनाच्या प्रशिक्षण, यंत्रसामुग्री, वित्तीय सहभागाद्वारे होवू शकते. पोचट बाद झालेले कोष महिलांना प्रशिक्षण देवून त्यापासून हार, गुच्छ तयार करन त्यापासूनही रोजगार मिळू शकतो. आशा माहिती साठी येथे क्लिक करा .

रेशीम शेती म्हणजे काय?

रेशीम शेती ही तुतीच्या झाडांची लागवड करून त्यावर रेशीम किडी संगोपनाची प्रक्रिया आहे. या किड्यांपासून मिळणाऱ्या कोषांपासून रेशीम धागा तयार होतो.

रेशीम शेती महाराष्ट्रात कुठे सुरू करता येते?

महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम, नागपूर तसेच गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्हे रेशीम शेतीसाठी पोषक आहेत.

रेशीम शेतीसाठी कोणत्या हवामानाची गरज असते?

रेशीम किडींच्या संगोपनासाठी २० ते २५°C तापमान आणि ६५ ते ८५% आर्द्रता आवश्यक असते.

तुतीच्या कोणत्या वाणांची लागवड फायदेशीर ठरते?

बागायतीसाठी व्ही-१, एस-३६ आणि कोरडवाहू जमिनीकरिता एस-१३, एस-३४ हे वाण उपयुक्त आहेत.

तुती लागवड कशी व केव्हा केली जाते?

तुतीची लागवड पावसाळ्यापूर्वी जून ते सप्टेंबर या कालावधीत केली जाते. रोपे किंवा कलमांनी लागवड केली जाते.

रेशीम शेतीसाठी किती गुंतवणूक लागते?

प्रारंभिक खर्च तुती लागवड, खते, सिंचन व किडी संगोपनासाठी येतो. मात्र एकदा उभारणी केल्यानंतर उत्पादन नियमित सुरू होते.

रेशीम शेतीतून किती उत्पन्न मिळू शकते?

योग्य नियोजन केल्यास एका एकरातून दर वर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. कोष विक्री व धागा निर्मिती यावर उत्पन्न अवलंबून असते.

रेशीम किडींचे संगोपन कुठे करावे लागते?

रेशीम किडी संगोपन घरात, झोपडीत किंवा स्वतंत्र संगोपनगृहात करता येते.

सरकारकडून कोणती मदत मिळते?

राज्य रेशीम संचालनालयामार्फत तांत्रिक मार्गदर्शन, अनुदान, प्रशिक्षण व लागवडीसाठी सवलतीत रोपे उपलब्ध करून दिली जातात.

रेशीम शेतीबाबत अधिक माहिती कोठे मिळेल?

अधिकृत माहिती व योजना तपशीलांसाठी www.mahasilk.gov.in या वेबसाइटला भेट द्या.

Leave a Comment