शेतकरी शेतीचे अर्थशास्त्र व ताळेबंद

आज मुक्त कृषि अर्थ व्यवस्थेच्या अनुषंघाने जागतिक संघटनेच्या पार्श्वभूमिवर कृषि व्यवसायात शेती हिशेबाचे महत्व निर्विवादपणे सिद्ध होत आहे. शेती व्यवसायातील आदानांचा व कृषि निविष्ठांचा वापर या दोन बाबी जमा खर्चाचा हिशेब ठेवण्यासाठी पूरक आहेत.

Table of Contents

शेतकरी स्वतःच्या शेतात निरनिराळ्या प्रकारची पिके घेत असतात त्या पिकांच्या उत्पादनाकरिता लागलेल्या मजूरांची व साधन-सामुग्रीच्या तपशीलवार माहितीची नोंद उदा. पूर्वमशागत, पेरणी, कंपोस्ट व रासायनिक खते देणे, निंदण, डवरणी, औषध फवारणी, आंतरमशागत, ओलितावरील खर्च, कापणी, मळणी इत्यादी पिकानुसार, पिकांच्या जातीनुसार व शक्य असल्यास भूखंडानुसार करून ठेवावी या सर्व माहितीचा उपयोग पीक उत्पादनाचा खर्च काढण्याकरिता होतो.

शेतीचे नियोजन म्हणजे काय ?

१ निरनिराळ्या पर्यायी उत्पादनाविषयी शेतकऱ्यांना माहिती मिळते.

२ सध्याच्या उत्पादन पद्धतीमधील त्रुटींचे ज्ञान शेतकऱ्यांना मिळते.

३ शेतकऱ्याऱ्यांना आपल्या कर्जाच्या गरजेविषयी कल्पना येते.

४ शेतकऱ्यांना आपल्या अपेक्षित उत्पन्नाची कल्पना येऊन त्यावर शेतीतील पुढील गुंतवणुकीविषयीचे निर्णय शेतकरीरो घेऊ शकतात.

५ शेतीसाठी लागणाऱ्या महत्वाच्या निविष्ठांचा म्हणजे बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके इ. बाबींची गरज ठरविता येते. त्याचप्रमाणे या निविष्ठा मिळविण्यासाठी आवश्यक प्रयत्न शेतकरी करु शकतात.

६ उपलब्ध साधन सामुग्रीचा पुरेपूर वापर होतो.

शेतकरी

शेतीचा पर्यायी आराखडा कसा असावा ?

१ शेतकऱ्याजवळ असलेल्या जमीन, मजूर, पाणी, बैलजोड्या इ. साधन सामुग्रीचा कार्यक्षम वाप होऊ शकेल असा असावा.

२ पर्यायी पीक आराखडा / पीक योजना संतुलित असावी म्हणजे त्यात शेतकऱ्याच्या स्वतःच्या गरजा जनावराच्यागरजा आणि जमिनीची सुपिकता कायम ठेवणाऱ्या पिकांचा समावेश असावा.

३ पर्यायी पीक आराखडा लवचिक असावा जेणे करुन या आराखड्याची अंमलबजावणी करतांना काही अडचणी आल्यास त्या प्रमाणे आराखड्यात बदल करता येतील.

४ पर्यायी पीक आराखड्यात पिकांची योजना समाविष्ट करतांना या पिकांच्या विपणन व्यवस्थेचाही विचार करावा.

शेतावर प्रत्येक हंगामात घेण्यात आलेल्या पिकांची माहिती.

अ क्र
सव्र्व्हे/गट क्र. प्लॉट नं./नांव
पिकाचे नांव
पिकाची जात
क्षेत्र हे.
पेरणीची तारीख
झाडाची संख्या
वय
कापणीची तारीख
123456789

शेती मशागतीसाठी वापरलेली साधनसामग्री, मंजुरी व खर्च

पिकाचे नाव…………………..

जात………………………

क्षेत्र……………………..

हंगाम……………………

सर्वे गट क्रमांक…………………….

अ क्र
शेतीचे कामाचे विवरण
लागलेले मंजूरबैल जोड्यालागलेले निविष्ठ
1पूर्व मशागत
जमीन तयार करणे
अ) नांगरणी
ब) वखरणी
क) इतर
2शेण/सेंद्रीय खत टाकणेवाहतुक व पसरविणेपेरणी
3पेरणी
अ)दुबार पेरणी झाल्यास
4आतरमशागतअ)निंदन ब) डवरणे क) इतर
5रासायनिक खत टाकणेअ) पेरणीच्या वेळी ब) पेरणीनंतर
6पीक संरक्षणअ) किटकनाशके ब) तणनाशकेक)बुरशीनाशके ड) संजीवके इ) इतर
7ओलीतअ)पहिली पाळी य) दुसरी पाळी क)
ड)

8पिकाचे राखणकापणी
9वेचणी मळणी

तक्ता क्र २ मध्ये शेतकऱ्याने पीक उत्पादनाकरिता धरचे, साहित्य वापरले असल्यास उदा मजूर, बैलजोडी, बियाणे, शेणखत इ. प्रचलित दराप्रमाणे त्याचे मूल्य काढावे (शेती हिशेबाच्या दृष्टीने तक्ता क्र. २ अतिशय महत्वाचा आहे.) पीक मशागतीस लागलेल्या साधन सामग्रीचा, निविष्ठांचा, वापरलेल्या मजूराची नोंद व दिलेली मजूरी या तक्त्यामध्ये लिहावी

पिकांपासून मिळालेल्या उत्पन्नाची नोंद

अ क्र
सव्हें । गट क्र.
पिकाचे नांव
जातमिळालेले
उत्पन्नउत्पन्नाची किंमत (रुपये)

कृषिमुल्य आयोगाचे नविन परिष्यव पुढील प्रमाणे

पिकाच्या लागवडीसाठी झालेला खर्च.

पिकाचे नाव…………………..

जात………………………

क्षेत्र……………………..

हंगाम……………………

सर्वे गट क्रमांक…………………….

अ क्र
खर्चाची बाब
एकूण वापरकेलेला खर्च
1.रोजंदारीच्या मजुरीवरील खर्च
2.बैल जोडीवरील खर्च (भाड्याचे घरचे)३. यंत्रावरील खर्च (भाड्याचे / परचे)४. बियाणे खर्च५. सेंद्रिय / शेणखत व हिरवळी खत६. रासायनिक खते७. ओलितावरील खर्च८सूक्ष्म अत्रद्रव्ये/जैविक खते९. पिकसंरक्षणावरील खर्च१० निविष्ठे मिळविण्याच्या अनुषंगाने झालेला खर्च (इतर खर्च)११ औजारे व इतर यंत्र सामुग्री दुरुस्ती खर्च१२. पीकविमा हप्ता१३. वाढ नियंत्रके१४. तणनाशके१५.खेळत्या भांडवलावरील व्याज (द.सा.द.शे. ६% दराने)१६.घसारा शेतोपयोगी हिस्सा, गोठा, औजारे व यंत्राचा ई. घसारा (ओलिताखालील पिकासाठी ओलिताच्या साधनावरील घसारा)१७.शेतसारा२०२११८ परिव्यय “अ” (अ.क्र. १ ते १७ ची बेरोज)१९. प्रचलित पद्धतीनुसार भाडेतत्वावरील घेतलेल्या जमिनीचा खंडपरिव्यय “अ” (परिव्यय अ. अ.क्र. १९) (परिव्यय अ. अ.क्र. १९ व २० ची बेरीज)स्थिर भांडवलावरील व्याज (१० टक्के दराने)२२ परिव्यय “व, ” (परिव्यय अ+ अ.क्र. २१)२३प्रचलित पध्दतीनुसार भाडेतत्ववारील घेतलेल्या जमिनीचा खंड (एकूण उत्पन्नाच्या ६ वा हिस्सा वजा शेतसारा)२४.परिव्यय “ब” (परिव्यय व + अ.क्र. २३)२५एकूण कौटूंबिक मजुरावरील खर्च (प्रचलित दराप्रमाणे)२६ परिव्यय “क” (परिव्यय व अ.क्र. २५)२७. परिव्यय “क ” (परिव्यय व अ.क्र. २५)२८परिव्यय “क “चे १० टक्के२९. परिव्यय “क” (परिव्यय क अ.क्र. २८)अ) मुख्य उत्पन्न ब) दुय्यम उत्पन्न क) एकूण उत्पन्न (अब)३० उत्पन्न (रूपये)अ) मुख्य उत्पन्नब) दुय्यम उत्पन्नक) एकूण उत्पत्र३१ प्रति क्विंटल उत्पादन खर्च

शेतकरी पिकांच्या उत्पादन खर्चाचा वार्षिक ताळेबंद

अ क्र
सव्हें । गट क्र.
पिकाचे नावजातहंगामएकूण उत्पन्नएकूण खर्चनिव्वळ नफा तोटा

शेती व्यवसायाशी निगडीत विविध बार्बीची नोंद जमाखर्चाच्या पद्धतीने करणे, यालाच शेतीचे हिशेब ठेवणे असे महणतात हे हिशेब शेती शिवाय इतर जोडधंदे याकरिता सुद्धा उपयोगात येतात अश्या प्रकारे शेतीचा जमा खर्च प्रत्येक शेतकऱ्याने ठेवल्यास त्यांची शेती फायद्यात आहे किंवा नाही हे समजू शकेल आणि त्याचा उपयोग पुढील वर्षातील शेतीच्या नियोजनासाठी होऊ शकेल.

शेतकऱ्यांनी कोणतेही पीक घेण्याआधी त्या शेताचे माती परीक्षण करून घेणे अति आवश्यक आहे जेणेकरून जमिनीची सुपीकता जाता येईल त्यासाठी येथे क्लिक करा.

शेतीचे हिशेब ठेवणे म्हणजे काय?

शेतीमध्ये आलेला खर्च आणि झालेला नफा याची बारकाईने नोंद ठेवणे म्हणजे शेतीचे हिशेब ठेवणे होय.

शेतीचे हिशेब ठेवणे का आवश्यक आहे?

यामुळे शेती फायदेशीर आहे की नाही, हे समजते आणि पुढील शेती नियोजनासाठी मदत होते.

हिशेब ठेवताना कोणकोणत्या बाबींची नोंद घ्यावी लागते?

बियाणे, खत, मजुरी, पाणी, औषध, यंत्रसामुग्री, विक्री उत्पन्न इ. बाबींची नोंद घ्यावी लागते.

शेतीशिवाय इतर कोणत्या व्यवसायासाठी हे हिशेब उपयुक्त आहेत?

दुग्धव्यवसाय, पोल्ट्री, माशांच्या शेतीसारखे जोडधंदे हिशेब प्रणालीने व्यवस्थापित करता येतात.

शेतीचे अर्थशास्त्र म्हणजे काय?

शेतीचे अर्थशास्त्र म्हणजे शेतीतील प्रत्येक खर्च आणि उत्पन्न याचा सखोल अभ्यास करून त्याचे तांत्रिक व आर्थिक विश्लेषण करणे, जेणेकरून शेती फायदेशीर कशी होईल हे ठरवता येते.

शेतीत पर्यायी आराखडा आखण्याचे फायदे काय आहेत?

पर्यायी आराखडा केल्यास उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर होतो, जमिनीची सुपीकता टिकते आणि बाजारपेठेचा विचार करून फायदेशीर पीके निवडता येतात.

शेती नियोजनात हिशेबाचा उपयोग कसा होतो?

हिशेब ठेवल्यास कोणते पीक फायदेशीर ठरले, कोणत्या निविष्ठांचा जास्त उपयोग झाला, याचा अंदाज घेता येतो. यामुळे पुढील हंगामाचे शहाणपणाने नियोजन करता येते.

शेती ताळेबंदाचे महत्त्व काय आहे?

ताळेबंदामुळे वर्षभरातील शेतीचा एकूण खर्च व उत्पन्न याचे संकलन करता येते. त्यामुळे शेती फायदेशीर होती की तोट्यात, हे स्पष्ट होते.

Leave a Comment