शेतीच्या विविध कामाकरिता हस्तचलित, पशुशक्तिचलित आणि ट्रॅक्टर अथवा इंजिन शक्तिने चालणारी औजारे। यंत्रे वापरण्यात येतात. कृषि शक्ती व औजारे विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे अनेक प्रकमची औजारे विकसित करण्यात आली असून काही महत्वाच्या निवडक अवजारांची माहिती येथे देण्यात आली आहे.
Table of Contents
१) पंदेकृवि खत व बी पेरणी यंत्र प्रचलित तिफणीच्या मूळ रचनेशी बरेच अंशी मिळते जुळते आणि बैलजोडीच्या सहाय्याने चालणारे हे तीन दात्याचे यांत्रिक पेरणी यंत्र असून दोन दात्यामधील अंतर ३० ते ४५ सें.मी. एवढे ठेवता येते. ज्वारी, उडीद, मूग, तूर, इ. पिकांकरिता हे उपयुक्त आहे. या अवजाराची बनावट संपूर्ण लोखंडी असून देखभालीस सोपे आहे. प्रचलित तिफण चालविणारा मनुष्य हे अवजार सहज चालवू शकतो आणि एका तासामध्ये ०.२० ते ०.२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करता येते.
२) हातकोळपे लहान क्षेत्रावरील पिकामध्ये दोन ओळीतील तण काढण्यासाठी
उपयुक्त असे हे साधन आहे. हलक्या लोखंडी पाईपपासून हे अवजार बनविले असून या अवजाराला १५ सें.मी. रुंदीची छोटी पास लावली जाते. त्यामुळे एका माणसाच्या सहाय्याने पिकाच्या दोन ओळीमधील तण सहज काढता येते. दोन ओळीतील अंतर कमी असलेल्या पिकाकरिता हे अधिक फायदेशीर आहे. या हातकोळप्यामुळे माणसाला उभे राहून दिवसाकाठी ०.१२ ते ०.१५ हेक्टर क्षेत्रावर काम करता येते. तसेच ते हलके असून चालविण्यास सोपे आहे.
३) ठिबक नळी वेटोळीकरण यंत्र ठिबक सिंचनाची गरज संपल्यावर उपनळ्या शेतातून काढून साठविताना येणाऱ्या अडचणीमुळे त्या अस्ताव्यस्त आणि बरेचदा निष्काळजीपणे ठेवण्यात येतात. त्यामुळे त्याला मोड पडून त्या निकामी होतात किंवा त्यांचे आयुष्य कमी होते. ठिबकनळी वेटोळीकरण यंत्राच्या सहाय्याने उपनळ्यांचे गोल गड्ढे तयार करता येतात.
(४) पं.कृ.वि. धानशेती तव्याचा नांगर पारंपरिक तव्याच्या नांगरामध्ये सुधारणा करून एक नवीन
ट्रॅक्टरचलित खाचेच्या तव्याचा नांगर विकसित केला आहे. धान शेतीची कडक जमीन तयार करण्याकरिता हा नांगर अधिक कार्यक्षम आढळून आला असून त्यामुळे १२ सें.मी. खोलीवर नांगरणी केली असता एका तासाला अंदाजे ०.११ हेक्टर क्षेत्रावर काम करता येते तसेच जमीन तयार करताना पारंपरिक तव्याच्या नांगराच्या तुलनेत लहान आकाराची डेकळे तयार होतात
५) धानलक्ष्मी दातेरी विळा भात किंवा गहू कापणीकरिता परंपरागत चालत आलेला विळा वापरला जातो परंतु विद्यापीठात गेल्या काही वर्षात केलेल्या संशोधनामुळे नवीन प्रकारचा ‘धानलक्ष्मी’ दातेरी विळा विकसीत केला आहे. या विळ्याने गहू, धान किंवा गवत चांगले कापले जाऊ शकते. पात्याला दिलेल्या विशिष्ट वाकामुळे हाताला चांगली पकड येऊन पीक कापताना बोटाला होणारी इजा टाळता येते. तसेच विशिष्ट रचनेमुळे पीक जमिनीलगतच कापणे शक्य होते. त्यामुळे जास्त चारा उपलब्ध होतो. हा विळा हलका असून त्याचे वजन अंदाजे १७५ ते २०० ग्रॅम असल्याने तो वापरायला चांगला आहे. विशिष्ट प्रकारचे पोलाद वापरल्याने त्याला वारंवार धार करावी लागत नाही
१६) रुंद वरंबा, सरी टोकण व आंतरमशागत यंत्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला विकसीत रुंद वरंबा, सरी पद्धतीवर विविध पिकांची पेरणी करण्याकरीता व सोचतच पिकांच्या आंतरमशागतीसाठी यंत्र विकसीत केलेले आहे. या यंत्राच्या सहाय्याने मुग, उडिद, सोयाबीन, ज्वारी. मका, भुईमूग, कपाशी व ४५ से. मी तासांमधील अंतर असलेली सर्व पिकांची पेरणी करणे शक्य आहे. विशिष्ट कोनात असलेल्या बोज प्लेटेच्या सहाय्याने पेरणी केल्या जाते व सोबत खत सुध्दा देवा
येते. रिजरच्या सहाय्याने मंद वरंबा व मरो निर्माण होते. या यंत्राने आंतरमशागत व आंतरपीक मुष्टा घेता येते उत्पादनात ३० टक्के वाढ व मजुरांची बचत होते. या यंत्राचे उत्पादन व प्रसारण होण्याकरिता महाराष्ट्र राज्य कृि महामंडळ मर्यादीत मुंबई यांच्याशी सामंल्य करार करण्यात आलेला आहे.
७) विविध पिकांच्या यांत्रिकीकरणासाठी ट्रॅक्टरवर मंद वरंबा व सरी पद्धतीवर पेरणी विविध पिकांच्या पांत्रिकीकरणासाठी ट्रॅक्टरच्या चाकांमधील अंतर १४० में.मी. व १९५ में मी. ठेवून रुंद वरंबा व सरी पध्दतीवर अनुक्रमे ४०-४०-६० सें.मी. व ४५-४५-४५-६० में. मी. अंतरावर पेरणी पध्दत वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे.
८) पीकेव्ही बेल बलीत कपाशी टोकण यंत्र कापसाची पेरणी करण्याकरिता बैल चलीत कपाशी टोकण यंत्र विकसीत करण्यात आले आहे. हे यंत्र कपाशीच्या अनेक जाती लागवडीकरिता उपयुक्त आहे. योग्य गियर स्प्रकिट वापरल्यास दोन झाडांमधील अंतर १५,३०,४५,६०,७५ आणि ९० सें.मी. ठेवू शकतो. पिकांच्या गरजेनुसार दात्यातील अंतर व पेरणीची खोली कमी अधिक करता येते. संपूर्ण लोखंडी बनावटीचे असल्यामुळे मजबूत, टिकाऊ व देखभालीस सोपे आहे. वजन चाकावर येत असल्यामुळे बैलाला ओढण्यास कमी शक्ति लागते. एक पुरुष एका तासात ०.३३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करू शकतो. या काच्या सहाय्याने पारंपारीक पध्दतीच्या तुलनेत वेळेची बचत ८१.५८ टक्के, मजुरांच्या खर्चाची बचत ९०.१७ टक्के व चालविण्याच्या खर्चाची बचत प्रति हेक्टर ७०.१६ टक्के आहे.
२) पंकृवी लिंबूवर्गीय फळतोडणी यंत्र लिंबू व संत्र्याच्या तोडणीसाठी यंत्र विकसीत करण्यात आले आहेत. दोन्ही यंत्रे पीव्हीसी बनावटीचे असून वजनास हलके आहेत. त्यामुळे काम करतांना येणारा ताण अत्यल्प आहे. लिंबू तोडणी यंत्राची क्षमता १५.६ कि./ तास असून संत्रा तोडणी यंत्राची क्षमता ५९ कि./तास आहे. फळे तोडल्यानंतर फळांसोबत थोडे देठ राहत असल्यामुळे फळांचा साठवणूक
कालावधी वाढतो. महिला मजूरांसाठी विशेष उपयुक्त.
१०) डिसइंटिग्रेटर यंत्र या यंत्राच्या सहाय्याने पीक कापणी तथा काढणीनंतर उरलेले पीक अवशेष बारीक करता येतात. या प्रकारचे बारीक केलेले पीक अवशेष गांडूळ तथा सेंद्रिय खत तयार करण्याकरीता योग्य ओलीवर ठेवल्यास ४५ दिवसात खत तयार होण्यास मदत होते. तीन अश्वशक्तीच्या सिंग अथवा थ्री फेज विद्युत मोटारीवर हे यंत्र चालते. यंत्राची पीक अवशेष बारीक करण्यासाठी क्षमता १८० ते २०० किलो प्रती तास आहे.
११) ऊस बेणे व कडबा पीकेव्ही कटर ऊस हे आपले नगदी पीक आहे. ऊसाचे बेणे तयार करण्यासाठी पीकेव्ही हे पायाने चालविता येणारे (पेडल चलीत) यंत्र विकसीत केले आहे. या यंत्राव्दारे ऊस बेणे तयार करतांना लागणारा वेळ, शारीरिक तापमान, हृदयाचे ठोके, रक्तदाब बेण्यांची संख्या या सर्व बार्बीचे अवलोकन करण्यात आले हे पंदेकृवि विकसित केलेल्या पीकेव्ही कटरवर कुट्टी तयार करतांना वाळलेला व ओला कडबा दोन्हीवर प्रयोग करण्यात आले असून कुट्टीची लांबी २५, ५०, ७५ व १०० मि.मी. घेऊन यंत्राची कार्यक्षमता तपासली आहे. ऊस लागवडीसाठी लागणारे बेणे तयार करण्यासाठी किंवा जनावरांसाठी कडबाकुट्टी बनविण्यासाठी ज्या पारंपारिक पध्दतीतील कोयत्याच्या ऐवजी जर पीकेव्ही कटरचा उपयोग केला तर ऊसाचे घेणे आणि कडबाकुट्टी तयार करण्यासाठी लागणारा खर्च व वेळेचे ३० ते ४० टक्के बचत होते तसेच यंत्र चालवतांना शरीरावर जास्त ताण पडत नाही.
१२) हळद काढणी यंत्र पिकेव्ही विकसित छोट्या ट्रॅक्ट्ररचलित हळद काढणी यंत्राची हळद काढणी कार्यक्षमता ही ९८.८७ टक्के एवढी आहे. हळद पिकाला काढतांना होणारे नुकसान हे १३२ टक्के एवढे आहे. या यंत्राची प्रति तास क्षेत्र क्षमता ०.१३ हेक्टर एवढी आहे. हळद काढणी खर्च २३५ रू
प्रति तास व १९९४ रु. प्रति हेक्टर असून सदर पंत्राच्या वापरामुळे हळद काढणी खर्चात जवळपास ३३.२८ टक्के बचत होते
१३) शिसेंटिग्रेटर यंत्र/ छोटे ट्रैक्टर चालीत स्लॅगर शेतातील गवत, झुडपे व उभे पीक अवशेष यांची विल्हेवाट लावून त्याचे लवकरात लवकर सेंद्रिय खत तयार करण्याकरीता स्तंशरचा उपयोग होतो. जमिनीच्या वर पीक अवशेष कापून बारीक करण्याकरीता उपयोग या यंत्रामध्ये पौक अवशेष जमिनी लगत कापून खालचे खोड आधी यंत्रात जाते व ७ फुटापर्यंत उंच असलेले कपाशी सारखे पौक बारीक करून शेतात टाकल्या जाते. या यंत्राची क्षेत्र क्षमता ०.३५ ते ०.४० हेक्टर प्रति तास असून खर्च रु. ५५०/- ते रू. ६००/- प्रति हेक्टर येतो.
१४) छोटा ट्रॅक्टरचलीत डवरणी /कोळपणी यंत्र डॉ. पं.दे.कृ.वि. विकसीत छोट्या ट्रॅक्टरचलीत डवरणी यंत्र हे विविध अंतराच्या दोन ओळीतून सुलभतेने कार्य करते. खरीप हंगामातील तण काढण्याकरीता अतिशय उपयुक्त असे हे यंत्र आहे. मजुरांची उपलब्धता, तण काढण्याकरीता लागणारा वेळ या सर्व बाबींचा विचार करून सुलभ असे हे यंत्र, या यंत्राव्दारे जमिनीच्या खोलीतून कार्य केल्या जाते व तणाची मुळे जमिनीतून काढून माती योग्य प्रकारे मोकळी होते. या यंत्राची कार्यक्षमता ११.९ टक्के एवढी आहे.
१५) मनुष्यचलीत रोपे प्रत्यारोपण यंत्र मनुष्यचलीत रोपे प्रत्यारोपण यंत्राची संरचना साधी असून ते वापरण्यासही सोपे आहे. या यंत्राचे वजन ५.८ कि.ग्रॅ. आहे. रोपे प्रत्यारोपण यंत्र वापरणाऱ्यास सोयीस्कर असून ते पुरुष व महिला दोघांनाही वापरता येते. या यंत्राने रोपे प्रत्यारोपण प्रक्रियेतील श्रम कमी होऊन वेळेची बचत होते. कामाच्या वर्गीकरणाचा संवर्ग ‘हलके’ असे आढळून आले.
(१६) छोट्या ट्रॅक्टरचलीत खत व बी पेरणी तथा आंतरमशागत यंत्र विविध पिकांच्या पेरणी व डवरणीसाठी छोट्या ट्रॅक्टरवर चालणारे यंत्र आहे. यंत्राची पेरणी कार्यक्षमता ०.४०३ हेक्टर प्रति तास एवढी आहे. पीक डवरणी करतांना क्षेत्रक्षमता ०.४२८ हेक्टर प्रति तास एवढी आहे. तण काढणी क्षमता ९०-९२ टक्के एवढी आहे. १८-२५ कमी अश्वशक्तीवर चालणारे हे यंत्र आहे. पेरणीसाठी व डवरणीसाठी प्रत्येकी रू. १८०० रूपये प्रति हेक्टरी एवढा खर्च येतो.
१७) पंदेकृवि पावर कटर लहान शेतकऱ्यांकरीता उस बेणे व कडबा कुट्टी तयार करणेसाठी उपयोग होतो. एका तासाला जवळपास १८०० कडव्यापासून बेणे तयार करता येते. या यंत्राव्दारे जवळपास एका तासाला १००-११० किलो कुट्टी तयार करता येते. यंत्राची निर्मिती स्थानिक स्तरावर पण करता येते. यंत्राची किंमत लहान शेतकऱ्यांच्या आवाक्यात आहे.
अधिक माहितीकरिता वरिष्ठ शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प कृषि औजारे व यंत्र, कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला (फोन: ०७२४-२२५८२०० विस्तारित क्र. १०२७) विभाग प्रमुख, कृषि शक्ती व अवजारे विभाग, कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला यांचेशी संपर्क साधावा.
शेतीचे यांत्रिकीकरण: शेतीच्या यांत्रिकीकरणामध्ये ट्रॅक्टरचा मोठा सहभाग वाटत असला तरी कोरडवाहू शेतीमध्ये विविध पिकांच्या पद्धती प्रमाणे पेरणी ते कापणीकरिता ट्रॅक्टर अयोग्य ठरला आहे. पारंपरिक व प्रचलित पीक पद्धतीप्रमाणे काही प्रमाणात पेरणीची कामे होत असली तरी पावसाच्या अनियमितपणामुळे पिकाच्या पेरणीच्या बाबतीत ट्रॅक्टरवर विसंबून राहता येत नाही त्याच प्रमाणे ट्रॅक्टरच्या दोन चाकातील अंतर व टायरची रुदी यामुळे ट्रॅक्टरचा पेरणी केलेल्या शेतात सुद्धा आंतरमशागतीकरिता उपयोग करता येत नाही. पेरणी ते कापणी/काढणी ही अत्यंत महत्वाची कामे असून ते काटेकोरपणे करावी लागतात. बैलावर काटेकोर यंत्र चालवणे शक्य होत नाही म्हणून पेरणी ते पीक अवशेषांचे व्यवस्थापनापर्यंत सर्व कामे काटेकोररित्या होण्याकरिता ५ अश्व शक्की स्वयचलित यंत्राद्वारे चालणारे यंत्र विकसित केले आहेत. ते या ५ अश्वशक्ती स्वयंचलित यंत्राला आवश्यकतेप्रमाणे जोडता येतात.
अ) स्वयंचलित दुल बार हे यंत्र ६.५ पेट्रोल इंजिनवर चालत असून यामध्ये फ्रेम, दोन चाके, पो.टी. ओ. समोरील यंत्र जोडण्याची व्यवस्था, दोन टेन्शन क्लच, दोन डॉग क्लच व कंट्रोल लिव्हरचा समावेश आहे. इंजिनची शक्ती याकांना समोरील जोडणारे यंत्र चालविण्यासाठी दोन वेगळ्या टेन्शन क्लचचा उपयोग होतो.
१. ५ एव.पी. डिझेल एल ची मेक ३६०० आर पी एम वित्पासून गती पुरविण्याचे काम ही बेल्ट, चेन व चेरीत करतात २. एक टेन्शन क्लच चाकांना गती देवून मशीन जमिनीवर चालविण्याचे काम करते तर दुसरा टेन्शन क्लच समोर जोडलेले यंत्र चालविण्याचे काम करते
३. प्रत्येक चाकाला एक डॉग क्लच दिला आहे. ते डाव्या बाजूने किंवा उजव्या बाजूने वळविण्याचे काम करते
४. एका नट बोल्टने समोर कोणतेही यंत्र फोडता येते
हँडलवर सर्व लिवार लावल्यामुळे यंत्र आटोक्यात ठेवण्याचे काम सोपे होते तसेच रबर पेंडमुळे कंपणे कमी होतात.
५ ६ यंत्राचे एकूण वजन कमी असल्यामुळे ट्रॅक्टर व बैलाच्या मानाने जमिनीवर दाब कमी.
७. पावसाळ्यात पेरणी ते कापणी सारखे काम करण्यास सक्षम जे ट्रॅक्टरने होवू शकत नाही व बैल कापणी सारखे काम कर शकत नाही
८. दोन ओळीतील कोणत्याही अंतरात चालणारे
३) स्वयंचलित दुलधारवर चालणारे न्यूमॅटीक टोकण यंत्र: या यंत्रामध्ये भु-चक्र, दातेरी चक्राच्या जोडपा, बिज चकतों, न्युमॅटीक चकती, दाते, उच्च दाबाचा पंखा, फ्रेम व दुल बार ला जोडण्याची फ्रेम दिली असून या यंत्राच्या सहाय्याने विविध पिकांची (उदा. कपाशी, सोयाबीन, मका, शेंगदाणा, तीळ व इतर पिके) विविध दोन झाडातील व दोन ओळीतील अंतरावर पेरणी करता येते. वैशिष्ठयो:
१. दोन ओळीतील आवश्यक अंतर साध्य करता येते. कमीत कमी ३० सेंमी. व जास्तीत जास्त १२० सेंमी. दोन ओळीतील अंतर ठेवता येते.
२. न्युमॅटीक चकतीमुळे हवेच्या दाबाने ठराविक एकाच उंचीवरुन बीज चकतीच्या साहयाने बिज सोडल्या जाते. त्यामुळे दोन झाडातील योग्य अंतर एकसारखे ठेवता येते
३. भु-चक्र व विविध दातेरी जोडीच्या साहयाने व ६, १८ व ३६ छोद्रे असलेल्या बिजचकतीत योग्य चकतीच्या साहयाने २ सें.मी. ते १२० सें.मी. पर्यंत दोन झाडातील अंतर ठेवता येते.
४. विशिष्ठ प्रकारच्या दाताच्या साहयाने जमिनीत अरुंद ओळ काढल्या जाते व त्यामुळे बियाण्यावर माती सहज पडल्या जाते. तरीपण दात्याच्या टोकावर लावलेल्या विशिष्ठ प्रकारच्या बुट ने बियाण्यावर माती टाकल्या जाते.
५ हवेचा उर्ध्वदाब निर्माण करण्यासाठी पंख्याला ५००० ते ६००० फेरे दिल्या जातात व न्युमॅटीक चकतीवर फिरणाऱ्या विज चकतीला छिद्रात बियाण्याचा एक एक दाना चिटकतो व ते ठराविक उंचीवरुन सोडून दिल्या जातो यामुळे बियांना इजा होत नाही यामध्ये सर्व प्रकारचे बियाणे त्या पिकाच्या आवश्यक्तेनुसार टोकण किंवा पेरले जाते
६. या यंत्राची क्षेत्र क्षमता ०.२१ ते ०.३२ हेक्टर प्रति तास आहे.
७. डिझेल खपत २.५ ते ३.५ लिटर प्रति हेक्टर.
८. पेरणीचा खर्च रु. २५० प्रति हेक्टर
क) स्वयंचलित दुलबारवर चालणारे डवरणी/कोळपणी बंत्र या यंत्रामध्ये फुल स्विप, हाप स्विप व फोरबार लिंकेजची
विशिष्ठ प्रकारे फ्रेमवर मांडणी केली आहे. त्यामुळे विविध अंतराच्या दोन ओळीतून हे यंत्र सुलभतेने कार्य करते.
१. हाप स्विपच्या आतील बाजूस माती पडेल या प्रकारची ठेवण केल्याने अगदी उगवणीच्या दिवसापासून डवरणी /कोळपणी शक्य
२. पुल स्विप व हाप स्विप ठरविलेल्या खोलीतून कार्य करते व तणाची मुळे जमिनीतून काढून माती योग्य प्रकारे मोकळी केली जाते.
३ फोरबार लिंकेज व चाक यांच्या साहयाने स्विपस्ला ठराविक कोन दिल्या जातो व त्यामुळे स्विपला तण चिकटत नाही म्हणून कुसन काढायचे काम नाही.
४. हाप स्विपची बाहेरील बाजूस माती पडेल अशी व्यवस्था केली असता झाडांना भर देता येते.
५. या यंत्राची क्षेत्र क्षमता ०.२१ ते ०.३२ हेक्टर प्रति तास आहे. ६ डिझेल खपत २.२५ ते २.५ लिटर प्रति हेक्टर.
७. डवरणीचा खर्च रु. २२५ २५० प्रति हेक्टर ड
) स्वयंचलित बहुपीक कापणी यंत्र या यंत्राचा कटरबार एक मीटर लांब असून ३० से. मी. अंतरख्या चार ओळी ४५ व
६० सें.मी. च्या दोन ओळी कापल्या जातात. कमी उंच पीक जमिनी जवळून कापल्या जाते व हे कापलेले पोक पाठीमागे उंचावर नेऊन दोन्ही बाजूने लावलेल्या पोत्यात टाकल्या जाते. म्हणून हरभरा, सोयाबीन, उडीद, करडई सारखे पीक कापतांना काहीच वाया न जाऊ देता जमा केल्या जाते.
वैशिष्ठये
१ उंच पीक कापून दोन्ही बाजूला टाकल्या जाते किंवा एलीव्हेटरच्या सहाय्याने कापलेले पीक झोळखंडीत जमा करता येते. २. जंगलातील चारा पीक कापून मागे टाकल्या जाते. ३. क्षेत्र क्षमता ०.२५ ते ०.३ हेक्टर प्रति तास
४. कमीत कमी नुकसान ०.५ टक्के. ५. डिझेल खपत २.५ ते ३ लिटर प्रति हेक्टर. ६. कापणी खर्च रु. १७५ प्रति हेक्टर
ई) स्वयंचलित स्लंशर या यंत्रामधे झुलणारे १८ पाते असून ते वेगाने फिरवले जातात व त्यामुळे उभे पीक/गवत बुडापासून
कापून आतमध्ये बारिक करुन जमिनीवर सोडल्या जाते.
१. कापसासारखे उभे पीक जमिनीपासून कापून बारीक करून जमिनीवर टाकल्या जाते.
२. जंगली गवत, फळबागातील गवत कापून बारीक करुन जमिनीवर टाकले जाते.
३. उसाच्या पाचटा सारखे पीक अवशेष शेतातच बारीक केल्या जातात.
४. रुंद ओळीतील पिकामधील तण कापून बारीक करून टाकल्या जाते.
५. क्षेत्र क्षमता ०.१८ ते ०.२५ हेक्टर प्रति तास
६. खर्च रु. २२५ प्रती हेक्टर.
७. ६० ते ८५ टक्के खर्चात बचत होवून जमिनीची सुपीकता वाढते.
फ) स्वयंचलित टिलर व रुंद वरंबा सरी तयार करणारे यंत्र शेतीची आंतर मशागत करण्याकरिता दोन ओळी मधील ओल असताना तण काढण्याकरिता व भात खाचरात पडलींग करण्याकरिता या यंत्राचा उपयोग होतो. हे यंत्र स्वयंचलीत टूल बारला जोडले जाते व या यंत्राला असणारे ‘J’ आकाराचे सोळा पाते एका आसावर फिरविल्या जाते. मुलस्थानी जल संधारणा करण्याकरिता रुंद वरंवा व सरी पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. परंतु सद्यास्थितीत जल संधारण शेतीची मशागती शिवाय करणे कठीण आहे. म्हणुनच शेताची मशागत न करता ढेकळे न पडता सरी वरंबा तयार करण्याकरिता टीलरच्या पात्यामध्ये बदल करून दोन्ही बाजुने सरीतील माती बारीक करून वरंब्यावर फेकण्याची व्यवस्था केली असून सरी तयार होण्यासाठी दोन्ही बाजूला फाळ लावले दोन सरीतील अंतर कमी अधीक करून आवश्यक तेवढे अंतर ठेवण्याकरिता मार्कर दिले आहे. त्यामुळे आवश्यक त्या आकाराचे रुंद वरंबा व सरी तयार करता येते. या यंत्राने साधारणता १० ते १२ सें.मी. खोली पर्यंत मशागत केली जाते व क्षेत्र क्षमता ०-०९ हेक्टर प्रति तास असून खर्च हेक्टरी रूपये ३५० येतो.
ग) ट्रॅक्टर चलीत सॉशर शेतातील गवत, झुडपे व उभे पीक अवशेष असलेल्या शेतीत दुसरे पिके घेण्याकरिता जमीन अथवा शेत लवकर तयार करता येत नाही तसेच पैचा सारखे हिरवळीच्या खताचे पिक शेतात मिसळविणे कठीण जाते. त्याची विल्हेवाट लावून त्याचे लवकरात लवकर सेन्द्रीय खत तयार करण्याकरिता स्लॅशरचा उपयोग होतो. जमीनीच्या वर पिक अवशेष कापुन बारीक करण्याकरिता उपयोगात येणाऱ्या यंत्राला स्लॅशर असे म्हणतात. ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालणाऱ्या स्लॅशरमध्ये एका आसावर झुलते पोलादी पाते असुन खालील पाते समोरील दिशेने फिरतात. हे पाते जमीनीच्या वर ठरावीक उंचीवरून चालण्याकरिता मागील बाजुस दोन टायरची चाके दिलेली असतात ह्या यंत्रामध्ये उभे पिक अवशेष जमिनी लगत कापुन खालचे खोड आधी यंत्रात जाते व ७ फुटापर्यंत उंच असलेले कपाशी सारखी पीक बारीक करून शेतात टाकल्या जाते
ह्या यंत्राची क्षेत्र क्षमता ०-३५ ते ०-४० हेक्टर प्रति तास असुन खर्च रू.५५०/- ते रू. ६००/- प्रति हेक्टर पेतो.
कृषि प्रक्रिया उद्योग आर्थिक उन्नतीचा मार्ग
ग्रामीण भागात शेतातून पिकलेला माल उपलब्ध असून मजुरही बऱ्याच प्रमाणात मिळू शकतात. कृषि प्रक्रिया उद्योग
स्वयंरोजगारातूनही उभारता येतात कारण शेतीची कामे वर्षभर नसतात भूमिहीन आणि अल्पभूधारकही यात सामील होऊ शकतात. गरज आहे फक्त सुयोग्य तंत्रज्ञानाचो आणि यंत्राची. वे सुद्धा अलिकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध होत आहेत. अशा उद्योगाचे व्यवस्थापनही सोपे असते आणि भांडवलही फार कमी प्रमाणात लागते. सध्या बऱ्याच राष्ट्रीय आणि शासकीय बँका उद्योगासाठी कर्जाऊ भांडवल पुरवितात. तसेच बऱ्याच शासकीय योजनांतून अनुदान प्राप्त होऊ शकते
ग्रामीण उद्योगाचे फायदे।
१) कच्च्या शेतमालास भरपूर मागणी वाढून उत्पादन वाढविण्याकडे कल जातो.२) पिकाचा सर्व भाग तेथेच उपलब्ध असल्याने उपयोगात येतो.
३) कच्चा आणि पका माल यांचे वाहतुकीचा खर्च उपभोक्त्याला भोगावा लागत नाही.
४) शेतमालास चांगली किंमत मिळू शकते, तसेच पका माल किफायतशीर दरात उपलब्ध होतो.
५) कृषि प्रक्रियेचा पक्का माल प्रक्रियेतून निघण्यास कमी वेळ लागतो.
६) अशा उद्योगामुळे भरपूर फायदा मिळून शेतकऱ्याचे राहणीमान उंचावण्यास मदत होते.
मर्यादा।
१) शेतमाल विशिष्ट वेळेसच मिळतो. इतर वेळेस प्रक्रिया करण्यासाठी साठा करावा लागतो.
२) पिकात बदल झाल्यास उद्योग निकामी होण्याची जोखीम असते.
३) आधुनिक आणि सुयोग्य तंत्रज्ञान याबाबत तांत्रिक प्रशिक्षण असणे आवश्यक आहे.
४) बाजारात आवश्यक असणाऱ्या मालाची प्रत आणि संख्या यावाचत फारशी माहिती उपलब्ध नसते.
५) शेतमालाचे एकच वाण किंवा प्रत मिळत नसल्याने प्रक्रियेत वस्तुची प्रत कायम राखणे कठीण जाते.
यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक बाबी:
१ स्वतःवरील विश्वास कधीही ढळू देऊ नका.
२. ध्येय आणि नियोजन पक्के करून त्याप्रमाणे कामास लागा
३. आपल्या मित्र परिवारात बदल करून जास्तीत जास्त उद्योजक मित्रांसोबत रहा.
४. जास्तीत जास्त मित्र परिवार ठेवा.
५ वेळेचे नियोजन करा.
६ आपल्या वाचनात उद्योजकांच्या मुलाखती, आत्मकथा, उत्पादनांची माहिती, बँकांची माहिती इ. संदर्भातील पुस्तके ठेवा
७ घरातील व्यक्तींना आपल्या स्वप्नात सामील करून घ्या. त्यांचे सहकार्य व प्रेरणा मिळवा.
८. काही वेळेस चाकोरीबाहेर विचार करून कल्पकतेने प्रश्न सोडवा.
९. लोकांना मनापासून योग्य मोबदला घेऊन सेवा/मदत द्या.
१० लोकांची सेवा/मदत घेतांना योग्य मोबदला द्या
११. नेहमी सकारात्मक भूमिका ठेवा.
१२. चुका झाल्यास हरकत नाही, पण झालेली चूक पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्या.
१३. जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करा. कारण शेतीच्या उत्पादनात वाढ झाल्याने कच्चा माल
माफक दरात मिळू शकेल,
१४. सुयोग्य तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रशिक्षण जरून घ्या.
१५. कच्च्या मालाची उपलब्धता, यंत्राची उत्पादन क्षमता आणि प्रक्रिया केलेल्या वस्तुची मागणी यांचा योग्य समन्वय साधा.
१६ उपभोक्त्याची आवड, निवड, चव, रंग, आकर्षकता आणि मागणी या सर्व बाबीबद्दल व्यापारी आणि उद्योजकांमध्ये विचार विनिमय करा
उत्पादित वस्तुची बाजारी किंमत कमीत कमी राहील याकडे लक्ष द्या.
१७. कृषि प्रक्रिया उद्योगाची स्थापना करण्यासाठी सामाजिक, तांत्रिक आणि आर्थिक बाबी
१. कृषि प्रक्रिया का करावी? अ) कृषि प्रक्रिया केल्याने कच्च्या मालापेक्षा प्रक्रियोत मालास जास्त भाव मिळतो त्यामुळे उत्पत्र वाढते राहणीमानही उंचावते. ब) ग्रामीण उद्योजकता आणि रोजगार यासाठी विविध सरकारी योजना आहेत. त्यामधून भाडवल, कर्ज, कच्चा माल आणि पक्क्या मालास बाजारपेठ अशा प्रकारचे फायदे मिळू शकतात. ग्रामीण भागात प्रक्रिया केल्याने कमी भावात प्रक्रियीत पक्का माल उपलब्ध होऊ शकतो
२. प्रक्रिया कशावर करावी? आपण ज्यावर प्रक्रिया करणार आहोत त्या प्रक्रियीत मालास मागणी मिळणे आवश्यक आहे. कारण अलिकडे बाजारपेठेत बऱ्याच प्रमाणात चढाओढ आढळते. एका बाजूला महागाई आणि दुसन्या बाजूला चढाओढ यामध्ये उत्पादन खर्च आणि विक्रीची किंमत या दोन्ही गोष्टीची सांगड घालणे कठीण जाते, म्हणून बाजारात मागणी
असणाऱ्या पदार्थाचेच उत्पादन करणे हिताचे ठरते. ३. प्रक्रिया किती प्रमाणात करावी? जास्तीत जास्त मालावर प्रक्रिया म्हणजे भरपूर फायदा अमा आपण अंदाज बांधतो. परंतु प्रक्रियीत पदार्थासाठी असणारी मागणी ठराविक असल्याने किती मालावर प्रक्रिया करावी हे आधी ठरवावे लागेल
४. प्रक्रिया कशी करावी? विविध क्षेत्रात भरपूर प्रमाणात तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. काही कमी किंमतीची मुद्धा तंत्रेआहेत, जे ग्रामीण स्तरावर कमी भांडवलात प्रक्रिया करण्यासाठी वापरता येतात, उदा. कधान्यापासूनीयार कर तंत्र प्रक्रियेसाठी स्वयंचलित यंत्रे वापरल्यास भांडवत जास्त लागते. तसेच स्वयंचलित स्वयंचलित पंत्रास प्रथम एकदाच भांडवल लागते, मात्र मजुरी सतत सागत नाही. म्हणून आपण ठरविलेले तंत्रज्ञानपाि योग्य आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.
५. प्रक्रिया कोणी करावी? प्रक्रिया कोणीही करू शकतो. बहुतेक क्षेत्रात चढाओढ असल्याने अतिकडे प्रशि आवश्यक झाले आहे. खरे तर कुठलाही व्यवसाय करावयाचा असल्यास प्रकळ इच्छाशक्ती हे महत्वाचे भांडवात आहे ज्यांच्याकडे उपलब्ध असेल त्याने प्रक्रियेचा व्यवसाय जरूर करावा असे हे भांडवल प्रशिक्षणामधूनही मिळविता यामध्ये उत्पादकाने (शेतकरी) प्रक्रियक होणे आवश्यक आहे. तसेच विविध प्रकारे व्यवसाय करता येतो, दारवतःप्रक्रि होणे, सहकारी तत्वावर व्यवसाय करणे हैं.
६. प्रक्रियेची स्थापना कोठे करावी? सहसा ज्या भागात कल्चा माल तपार किंवा उपलब्ध होतो, अशा ठिकाणी प्रक्रिया व्यवसायाची स्थापना करता येईल. तसेच तयार प्रक्रियीत मालासाठी मागणीही (बाजारपेठ) असावी. अन्यथा मालाच्या वाहतुकीसा भरपुर खर्च होईल. शिवाय ज्या जागेवर उद्योग उभारावयाचा तिचीही व्यवस्थीत पाहणी करावी लागेल, उदा. विद्युत प्रवाह, पाचे मजूर आणि जवळपास कच्चा माल याची उपलब्धता, पुरेशी जागा, विकत घ्यावयाची असल्यास जागेची किंमत है.
७. आर्थिक बाब आणि बाजारपेठ कशा सांभाळाव्यात ? उद्योगासाठी वेगवेगळ्या संस्था किंवा बँकाकडून भांडवल उभारणी करणे, व्यवसायाचा हिशेब आणि नफातोटा याबाबत ज्ञान असणे, बाजारपेठेबाबतची सावधानता, प्रक्रियित मालाबाबत खात्रीची माहिती मिळविणे आणि त्यानुसार सावधानतेने निर्णय घेणे या गोष्टीची जाण आणि भान ठेवणे अतिशय आवश्यक आहे.
८. प्रक्रिया करावी किंवा नाही? उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे होकारात्मक असतील तर उद्योग करता येईल. त्यामाठी ते प्रथम शोधणे आवश्यक आहे,
कृषि प्रक्रिया उद्योगासाठी संपर्क कृषि प्रक्रिया उद्योगासंबंधी माहिती खालील पत्त्यांवर मिळू शकते. तसेच याबाबत प्रशिक्षणासंबंधीची माहिती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्रामध्ये उपलब्ध असते.
स्वयंरोजगारासाठी विद्यापीठाचे तंत्रज्ञान
स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विद्यापीठातील कापणी पश्चात तंत्रविज्ञान योजने अंतर्गत काही तंत्रज्ञान विकसित केले आहे त्या अनुषंगाने या तंत्रज्ञानाबद्दल माहिती खाली दिली आहे तसेच पुढे हे तंत्रज्ञान आणि उद्योगाबाबत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे पते दिलेले आहेत.
१. कचरा ज्वलित शुष्कक खरीप हंगामातील पिकांच्या कापणीच्या वेळेस वातावरणामध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते.तसेच आकाश निरभ्र व उन तीव्र नसल्यामुळे उन्हामध्ये धान्य वाळविणे कठीण जाते. यावर उपाय म्हणून शेतक-यांकडे भरपूर प्रमाणात असलेल्या इंधनांचा (उदा. पनहाट्या, तुन्हाट्या, धसकटे इ.) वापर करून धान्य वाळविण्याकरिता कचरा ज्वलित शुष्कक विकसित केले आहे. हे शुष्कक साधारणतः ६ किंटल ज्वारी, ४ किंटल भुईमुगाच्या शेंगा तसेच २.५ किंटल ज्वारीची कणसे वाळविण्यास उपयुक्त आहे. धान्य वाळविण्याच्या कोठीमध्ये थोडे फेरबदल करून त्या शुष्ककामध्ये २ विंटल ओली लाल मिरची सुद्धा वाळविता येते
२. पंकृवि पिनी दाल मील सर्वत्र कमी भांडवल उभारणीतही सर्व प्रकारच्या डाळी तयार करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या पंकृवि मिनी दाल मील चा वापर करता येतो. यामध्ये सफाई-प्रतवारी-पॉलीशर यंत्र (एक अश्वशती) व पंकृवि मिनी दाल मील (तीन अश्वशक्ती) ही दोन यंत्रे आहेत. या दाल मिलची क्षमता दर दिवसाला (८ तास) तुरीकरिता ८ ते १० किंटल, ७२ ते ७५ टक्के उताऱ्यासह तसेच मूग व उडीदाकरिता १० ते १२ किंटल, ८२ ते ८५ टक्के उतारा आहे. या सयंत्रामध्ये भुसा आणि पावडर, चुरी, डाळ, गोटा आणि दाणे अशा चार भागात यांत्रिकतेने विभाजन करण्याची व्यवस्था असल्यामुळे धूळविरहीत वातावरण ठेवण्याची क्षमता आहे. तसेच तेल व पाण्याच्या प्रक्रियेची व्यवस्था सुद्धा यंत्रातच आहे. म्हणून हे सयंत्र ग्रामीण स्तरावर घरगुती उद्योग म्हणून स्वयंरोजगारास उत्कृष्ट आहे. या मिनी दाल मिलचा सध्याचा एमरी रोलर बदलून ८० क्रमांकाचा एमरी रोलर टाकल्यास या दाल मिलचा उपयोग काळ्या ज्वारीला चकाकी आणण्याकरिता करता येतो. पावसामूळे अंशतः खराब झालेल्या मुगाला स्वच्छ करून चकाकी आणण्याकरिता तसेच गहु स्वच्छ करण्यासाठी पी.के.व्ही. मिनी दाल मिलची लेदर रोलर वापरुन उपयोगिता वाढविता येते.
३. पंकृषि मिरची बीज निष्कासन यंत्र विद्यापीठाने २ अश्वशक्तीवर चालणारे पंकृवि मिरची बीज निष्कासन यंत्र विकसीत केले आहे. त्याची क्षमता तासी १०० ते १२५ किलोग्राम असून मिरचीतील ९४ ते ९९ टक्के वियाणे निघते. त्याचबरोबर बियाण्याच्या उगवण शक्तीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. यंत्र पूर्णपणे बंदीस्त असल्याने चालकाच्या अंगाचा दाह आणि एकसारख्या शिंका येण्याचे प्रमाण खूप कमी होते.
४. बाष्पकीय शीतक साठवण गृह फळे व भाजीपाला अल्पकाळ साठविण्याकरिता बाष्पकीय शीतक साठवण गृह विकसित केले आहे. त्याची क्षमता संत्र्यासाठी २ ते ४ टन असून ही पद्धत हाताळण्यास सोपी, सुलभ व शीतगृहाच्या तुलनेत कमी खर्चाची आहे. शीतकालीन तापमान बाहेरील तापमानापेक्षा १८ ते २० डिग्री सेल्सीअसने कमी आणि सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९५ टक्के मिळते. यामध्ये उन्हाळ्यात संत्र्याची साठवणूक केली असता साधारणतः २० ते २१ दिवस संत्रा चांगल्या स्थितीत राहतो. हे गृह शेतावर, बाजारात इ. ठिकाणी बांधता येते.६. पंकृषि कांदा बीज निष्कासन यंत्र विद्यापीठाने १ अश्वशक्तीवर चालणारे पंकूवि कांदा बीज निवा विकसीत केले आहे. या यंत्राच्या सहाय्याने तासो १०० किलोग्रॅम कांद्याच्या गोंड्यापासून जवळजवळ ५४ किलोमि बियाणे तयार करता येते. यंत्राच्या वापरामुळे बियाण्याच्या उगवणशक्तीवर अनिष्ठ परिणाम आढळत नाही.
७. पंकृवि बिया फोडणी यंत्र विद्यापीठाने अर्ध्या अश्वशक्तीवर चालणारे पंकृवि विवा फोडणी यंत्र विकसीत केले आहे. सदर यंत्राचा वापर करून तासी ४ ते ५ किलोग्रॅम विवे फोडून ४०० ते ५०० ग्रॅम गोडंबी मिळविता येते. संक्रा वापरामुळे मजुरांचा शारिरीक त्रास वाचतो व प्रति मजुर बिबा फोडण्याची क्षमता वाढते.
८. लाल अंबाडी फुल-पाकळ्या वेगळे करण्याचे साधन विद्यापीठाने मानवचलित लाल अवाडी फुल पाकळ्या ग करण्याचे अत्यंत सोयीचे छोटे हाताने चालवण्याजोगे साधन विकसीत केले आहे. सदर साधनांचा उपयोग करुन हामी किलोग्रॅम अंबाडी फुलापासून पाकळ्या अलगदपणे व पूर्ण आकारात वेगळ्या करता येतात.
९. सिताफळ गरापासून बीज वेगळे करण्याचे यंत्र विद्यापीठाने अर्ध्या अश्वशक्तीवर चालणारे सिताफळ गरापासून बीज के करण्याचे यंत्र विकसीत केले असून सदर यंत्राचा वापर करून तासी ५० किलोग्रॅम सिताफळ गरातून बीज वेगळे केले जातात
१०. पंकृवि सतत उच्ण वायू झोत पफिंग यंत्र विद्यापीठाने बाजारात मिळणारे कच्चे फ्रायुम्स, मका, साबुदाना बॉल्य कच्या बटाटा चिप्स इत्यादी पासून तेलाचा वापर न करता खाण्यास तयार असे पदार्थ बनविण्यासाठी पंकृवि सतत उष्ण वा झोत पफिंग यंत्र विकसीत केले आहे.
११. पंकृवि गव्हांकूर भुकटी यंत्र विद्यापीठाने गव्हांकुर सुकवून त्यापासून गोड, अतिशय उच्च दर्जाचे व अतिसूक्ष्म कणों भुकटी तयार करण्यासाठी पंकृवि गव्हांकूर भुकटी यंत्र विकसीत केले आहे. सदर गव्हांकूर भुकटी शरिरासाठी गुणकारी आहे १२. पशुखाद्य निर्मिती सयंत्र विद्यापीठाने दालमिलच्या उपपदार्थांपासून पशु खाद्य तयार करण्यासाठी लघु (तामी १५ प्र किलोग्रॅम) क्षमतेचे पंकृवि पशु खाद्य निर्मिती संयंत्र विकसीत केले आहे.
१३. फळ प्रतवारी यंत्र: विद्यापीठाने १ अश्वशक्तीवर चालणारे पंकृवि फळ प्रतवारी यंत्र विकसीत केले असून सदर यंत्राच्या सहाय गोलाकार फळांची आवश्यकतेनुसार प्रतवारी करता येते. या यंत्राची तासी १० क्विंटल फळाची प्रतवारी करण्याची क्षमता आहे
१४. तात्पुरते धान्य झाकण्याचे आवरण अवकाळी पावसात भिजल्याने होणारे धान्याचे नुकसान टाळण्यासाठी वकास
हलके, ने-आण करण्यास सोईचे एकच मनुष्य ज्याची उघड-झाक करू शकतो असे तात्पुरते धान्य झाकण्याचे आवा विद्यापीठाने विकसीत केलेले आहे. या साधनांचा वापर करून ८० क्विंटल पोत्यात भरलेले धान्य किंवा ४० क्विंटल मोकले धान्य त्वरीत झाकता येते
१५. कोहळ्यापासून भुकटी व मुल्यवर्षीत पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान विद्यापीठाने कोहळ्यापासून भुकटी व त्यापासून मुल्यवधीत पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया तसेच कोहळ्यापासून चेरी/टूटीफुटी बनविण्यश्चे तंत्रज्ञान विकसीत केले आहे.
१६. आंबील भुकटी तसेच सांडोळी आणि बिबळी तयार करण्याचे तंत्रज्ञान विद्यापीठाने त्वरीत आंबील करण्याकड शिजविण्यासाठी तयार आंबील भुकटी तसेच सांडोळी आणि विवळी या ज्वारी पापड तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसीत केले १७. कांटा व लसूनची भुकटी व कांद्याचे काप करून मुल्यवर्धन करण्याचे तंत्रज्ञान विद्यापीठाने कांदा व लसूर क
११ प्रक्रिया करून त्यांच्यापासून उत्तम प्रतिची भुकटी, काष व कांद्याचे वुर्तळाकार काप बनवून मुल्यवर्धन करण्याचे तंत्रज्ञान विकसीत केले आहे.
१८. सोधाचिनला मोड आणण्याकरीता अंकुरण मयंत्र विद्यापीठाने सोयाबीनला मोड आणण्याकरीता अंकुरण सबंध विकसीत केले आहे तसेच मोड आलेले सोयाबिनचे विविध पदार्थ वापरण्यासाठी शिफारस केली आहे.
१९. हस्तचलीत विवा फोडणी यंत्र विद्यापीठाने हस्तचलीत बिया फोडणी यंत्र विकसीत केले आहे.
२०. घेरी/ टूटीफूटी सयंत्र : कच्च्या कोल्यापासून/पपईपासून चेरो/ट्टीकुटी बनविण्याकरीता पीलर, कटर, स्लायमा क्युवरचा आंतरभाव असलेले पथदर्शक सयंत्र (१०० कि / दिवस) विकसीत करण्यात आले आहे.
२१. पापह कापणी यंत्र ज्वारीचे पापड कापण्याकरीता हस्तचलीत पापड कापणी यंत्र विकसीत करण्यात आले आहे.
५. कांद्याची साठवण मोठ्या प्रमाणात कांदा साठवणुकीसाठी नाशिक पद्धतीच्या कोठारामधील चाळीचे तळ जमिनीपासून ४५० मि.मी. उंच करून व यावर ५.० मी. x १.५ मी. आकारमानाच्या बांबुच्या ताटीपासून किंवा लाकडी पट्ट्यांपासून बनविलेल्या दोन चाळी असून मधोमध एक मीटर रुंदीचा रस्ता ठेवला आहे. चाळीमध्ये २५० मि.मी. व्यासाचे बांबूचे दंडगोल हवेच्या दिशेने ठेवल्यास कांदा ३ ते ४ महिने चांगला राहतो.२२. पंदेकृवि हळद काय यंत्र हळदीचे काप करण्याकरीता एक अधराक्ती सिंगल फेज विद्युत मोटर चलीत ३५०-४०० कि./तास क्षमता असलेले हळद काप यंत्र विकसीत करण्यात आले आहे. हळद वाळविण्याचा कालावधी कमी करण्यासाठी काप करणे आवश्यक ठरते. सदर यंत्रामध्ये विविध जाडीचे काप करता येतात.
२३. तूर चांगली भरडण्याकरीता विकरांची पूर्व प्रक्रिया तूर (वाण तारा) चांगली भरडण्याकरीता झायलेनेज, पेक्टीनेज व सेल्युलेज या विकरांचे २०१०१ या प्रमाणात मिश्रण करून त्याची ४५ ग्रॅम/क्विं. तूर प्रमाणे पूर्व प्रक्रिया विकसीत केली आहे.
२४. पंदेकृवि हिरव्या शेंगा सोलणी यंत्र एक अश्वशक्ती सिंगल फेज विद्युत मोटर चलीत २५ कि. / तास क्षमता असलेले तूरीच्या हिरव्या शेंगा सोलणी यंत्र विकसीत करण्यात आले आहे. या यंत्रामध्ये श्वर रोलरवर सच्छिद्र खरबडीत केलेला स्टेनलेस स्टीलचा पत्रा लावून तसेच चाळण्या बदलून हिरव्या वाटाण्याच्या शेंगा (क्षमता ३६ कि./तास) व हिरव्या हरभऱ्याचे गाठे (क्षमता २५ कि./तास) सोलणी करता येतात.
२५. पंदेकृवि सुधारीत सिताफळ बिज विलगीकरण यंत्र अधिक गर निष्कासन कार्यक्षमता आणि पाकळ्यांच्या प्राप्तीसाठी अर्ध्या अश्वशक्तीची सिंगल फेज विद्युत मोटर चलीत सुधारीत सिताफळ बिज विलगीकरण यंत्र (क्षमता ५० कि गर/तास) सिताफळ गरामधील बिया वेगळ्या करण्याकरीता विकसीत करण्यात आले आहे.
२६. पदेकृवि हळद सफाई पंत्र कच्चे हळद कंद सफाई करण्याकरीता २२५-२५० कि./तास क्षमता असलेले पंदेकृवि अविरत हळद सफाई यंत्र विकसीत करण्यात आले आहे.
२७. पंदेकृषि हिरवा हरभरा गाठे तोडणी यंत्र हिरवा हरभरा गाठे तोडण्याची गरज लक्षात घेऊन, पंदेकृवि हिरवा हरभरा गाठे तोडणी यंत्र (क्षमता ११ कि./तास) विकसीत करण्यात आले आहे. हे यंत्र १ अश्वशक्ती सिंग फेज विद्युत मोटारवर चालत असून या यंत्रामध्ये तोडणी रोलर, बहींव्दार व पंखा असे तीन भाग आहेत. हिरवा हरभरा गाठे तोडणी यंत्र ८४.७० टक्के कार्यक्षमतेसह समाधानकारक आढळून आले.
२८ एकात्मिक पिकेव्ही मिनी दाल मिल (३ अश्वशक्ती) मुग व उडीद यापासून फाडा दाळ तयार करण्यासाठी, हरभऱ्याची चांगल्या प्रतिची दाळ करण्यासाठी तसेच तुरीचा गोटा फोडून सहजतेने सफाई व प्रतवारीसाठी एकात्मिक पिकेव्ही मिनी दाल मिल (३ अश्वशक्ती) विकसीत करण्यात आली आहे. विकसीत करण्यात आलेली एकात्मिक पिकेव्ही मिनी दाल मिल बहुतांश कडधान्याची दाळ करण्यासाठी उपयुक्त असल्याचे आढळून आले. एकात्मिक पिकेव्ही मिनी दाल मिल हरभऱ्याची दाळ करण्यासाठी रोलर शेलर पध्दतीने रोलरची फिरण्याची गती ९०० प्रति मिनिट ठेवून एमरी रोलर क्र. २४०३० (११) चा वापर केल्यास समाधानकारक काम करते. मुग व उडीदाची फाडा (सालीसकट) दाळीचा उतारा अनुक्रमे ९७.७ टक्के तसेच ९६.३ टक्के आढळला.
२९. पिकेव्ही मिनी दाल मिल (५ अश्वाशक्ती) उद्योजकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन, इच्छुक उद्योजक तथा शेतकऱ्यांच्या गरजेनुसार जास्त क्षमतेची ५ अश्वशक्ती ३ फेज इलेक्ट्रीक मोटारवर चालणारी पिकेव्ही मिनी दाल मिल विकसीत करण्यात आली आहे. यंत्राची क्षमता २५ ते ३.५ क्वि. / तास आहे. यंत्र उदवाहक, भरडण्याचा रोलर, चाळणी आणि स्कु कन्वेअर अशा चार भागात विभागण्यात आले आहे.
३०. पिकेव्ही मिनी टाल मिल (१ अश्वशक्ती) विविध महिला व प्रशिक्षकांच्या आवश्यकतेनुसार प्रत्येकाची गरज लक्षात घेऊन घरगुती उपयोगाकरीता लघु क्षमतेची पिकेव्ही मिनी दाल मिल (१ अश्वशक्ती) विकसीत करण्यात आली आहे या यंत्रामध्ये सुध्दा भरहण्याचा रोलर, शेलर, चाळणी, फटका यंत्र, उदवाहक आणि स्कू कन्वेहर असे भाग आहेत. यामध्ये दाळी तयार करण्याची पध्दत ही ३ अश्वशक्तीच्या मिनी दाल मिल सारखीच आहे. या दाल मिलची क्षमता ३५ ते ४० कि.ग्रॅ. प्रति तास आहे.
३९. पिकेल्ही मिनी दाल मिल (प्रयोगशाळा महिल) कडधान्याची दाळ बनवितांना जास्त कार्यक्षमता व उतारा मिळण्यासाठी विकरांची प्रक्रिया करण्यामध्ये समाविष्ट जैवतंत्रज्ञाः संस्थाकडून मिळणाऱ्यामिनी दाल मिलचे प्रयोगशाळा मॉडेल विकसीत करण्यात आले आहे. संपूर्ण स्टेनलेस स्टील (SS 304) चा वापर करून सदा मॉडेल विकसीत करण्यात आले आहे. मॉडेल हलविण्यास सोयीचे असून कमी जागा लागते, कडधान्याची दाळ बनविण्याच्या संशोधनामध्ये कार्य करणाऱ्या विविध प्रयोगशाळांमध्ये कमीत कमी कच्या मालाचे सॅम्पल वापरून जास्तीत जास्त प्रयोग घेण्याकरीता तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये दाखविण्याकरीता व प्रात्यक्षिकांसाठी उपयोग आहे.
३२. पिडीकेव्ही कांटा प्रतवारी यंत्र कांदा काढल्यानंतर त्याची मोठा, मध्यम आणि गोल्टी अशी प्रकारची प्रतवारी मजुरांच्या सहाय्याने करणे हे जिकरीच काम असतं. त्यासाठी मजुरही मिळत नाही. बाजारपेठांच्या आवश्यकतेनुसार व निर्यातीकरीता प्रतवारी करण्यासाठी कांदा प्रतवारी यंत्र विकसीत करण्यात आले आहे. यंत्राने कांद्याची ४० मि.मी. पेक्षा कमी, ४०-६० मि.मी. तसेच ६० मि.मी. पेक्षा जाड अशा प्रकारात प्रतवारी करता येते. इतर आकारामध्ये सुध्दा चाळणी बदलून प्रतवारी करता येईल. चाळणीसाठी विशिष्ट प्रकारची फुड ग्रेड रबर शीट व इतर ठिकाणी कुशनिंग केल्यामुळे प्रतवारी करतांना काद्यांला इजा होत नाही. यंत्राची प्रतवारीची अचूकता ९० ते ९५ टक्के आहे. त्याची क्षमता १५ ते २० टन प्रति दिवस आहे. २० टन कांद्याला हाताने प्रतवारी करतांना ३० कुशल मजुरांची आवश्यकता असते. या मशिनने प्रतवारी करण्यासाठी ४-६ अकुशल मजुर लागतात. हे यंत्र चार अश्वशक्ती विद्युत मोटारवर चालविण्यास सुलभ तसेच एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी चाकांची व्यवस्था केली आहे.
३३. जांभूळ गर निष्कासन यंत्र पिडीकेव्ही जांभूळ गर निष्कासन यंत्राची जांभूळगर काढण्याकरीता शिफारस करण्यात येत आहे. प्रमुख फायदे यंत्राची गर निष्कासन क्षमता ८० किलो प्रति तास. के गर निष्कासन कार्यक्षमता : १७.१३ ६ प्रतिशत के हे यंत्र अर्ध्या अश्वशक्तीच्या विद्युत मोटरवर चालते. * यंत्र चालविण्यास सुलभ आहे.
प्र ३४. रोपवाटीकेमधील पॉलीबॅगमध्ये माती भरण्यासाठी मातीभरण यंत्र। रोपवाटीकेमधील पॉलीबॅगमध्ये माती भरण्यासाठी पिडीकेव्ही मातीभरण यंत्राची शिफारस करण्यात येते. प्रमुख फायदे हे यंत्र मानवचलीत असून यंत्रास दोन मजूराची आवश्यकता आहे. * मातीभरण क्षमता १५० पॉलीबॅग प्रति मजुर प्रतितास या यंत्रामुळे पारंपारिक पध्दतीपेक्षा माती भरण्यासाठी ६६.६६ प्रति शेतमजूर वेळ कमी लागतात. * हे यंत्र चालविण्यास सुलभ आहे.
३५. बीटरूट पासून मऊ पोताचे बीट रूट जैम बनविण्याची पीडीकेव्ही प्रक्रिया पध्दत बीटरूट पासून मऊ पोताचे बीट रूट जैम बनविण्याची पीडीकेव्ही प्रक्रिया पध्दत, ज्यामध्ये बीट रूट प्रेशर कुकर मध्ये शिजवल्यानंतर मिक्सर मधून तयार ६ किलेल्या लगद्यामध्ये साखर, लिंबू, रस, पॅक्टिन व प्रिझर्वेटीव टाकून ३० ते ४० मिनिटे गरम करणेची शिफारस करण्यात येते उपरोक्त यंत्र औद्योगिक तत्वावर तयार करण्याकरीता उपलब्ध आहेत
शेतीचे यांत्रिकीकरण म्हणजे काय?
शेतीतील विविध कामे जसे पेरणी, आंतरमशागत, कापणी, काढणी आणि प्रक्रिया यासाठी आधुनिक यंत्रे व अवजारांचा वापर करण्यास शेतीचे यांत्रिकीकरण म्हणतात.
शेतीच्या यांत्रिकीकरणाचे मुख्य फायदे कोणते?
यांत्रिकीकरणामुळे वेळेची बचत, मजुरी खर्चात घट, उत्पादनात वाढ, कामाची अचूकता आणि शेतकऱ्यांची उत्पादकता वाढते.
लहान शेतकऱ्यांसाठी कोणती कृषी यंत्रे उपयुक्त आहेत?
पावर कटर, हातकोळपे, मनुष्यचलीत रोपे प्रत्यारोपण यंत्र, मिनी दाल मिल, कपाशी टोकण यंत्र आणि ठिबक नळी वेटोळीकरण यंत्र लहान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
कृषि प्रक्रिया उद्योगातून स्वयंरोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत?
मिनी दाल मिल, मिरची बीज निष्कासन यंत्र, कांदा प्रतवारी यंत्र, पशुखाद्य निर्मिती संयंत्र, फळ प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धित अन्नपदार्थ निर्मिती यांसारख्या उद्योगांमधून स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
कृषि यंत्रे आणि तंत्रज्ञानाबाबत अधिक माहिती कुठे मिळू शकते?
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील कृषि शक्ती व अवजारे विभाग, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच जिल्हा उद्योग केंद्रांमधून अधिकृत माहिती व प्रशिक्षण मिळू शकते.